Bhind Boat Accident : मध्य प्रदेशातल्या (Madhya Pradesh) भिंड (Bhind) जिल्ह्यातून वाहणाऱ्या सिंध नदीत एक नौका शुक्रवारी (28 जानेवारी) संध्याकाळी बुडाली. या नौकेत हिलगवा गावातील लोक होते. दुर्घटनेवेळी  नौकेत  12 जण होते. पोलिसांसह प्रशासन, होमगार्ड आणि एसडीआरएफचे पथकही घटनास्थळी पोहोचले. 12 जणांपैकी 10 जणांना वाचवण्यात आलंय. मात्र दोन लहान मुलं अजूनही बेपत्ता आहेत. या दुर्घटनेची काही दृश्य इतर  नौकेतील उपस्थितांच्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाली आहे. 

भिंडमधील नयागाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तेहंगूर येथे ही घटना घडली. हिलगाव गावातील काही लोक बोटीने सिंध नदी पार करून तेहंगूरला आले. परत जाताना सिंध नदीत त्यांची नौका बुडाली. 

अॅडिशनल एसपी यांनी सांगितलं की, या घटनेत नौकेतील दोन मुले अद्याप बेपत्ता आहेत. त्यापैकी एक 16 वर्षांचा तर दुसरा 13 वर्षांचा आहे. घटनेची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर नायगाव पोलीस ठाण्याचे पथक व रौण पोलीस घटनास्थळी दाखल झाले. दोन्ही मुलांचा शोध सुरू करण्यात आला. एसडीएमसह अॅडिशनल एसपी आणि इतर अधिकारीही घटनास्थळी पोहोचले. धीरज गोस्वामी गोलू देखील मदतीसाठी घटनास्थळी पोहोचले आहेत. या दुर्घटनेच्या व्हिडीओमध्ये नौका बुडत आहे, असं दिसत आहे. तसेच नदीच्या किनारी असलेले लोक नौका पाहुन ओरडताना दिसत आहेत. 

पाहा व्हिडीओ-

महत्त्वाच्या बातम्या:

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha