एक्स्प्लोर
अमरनाथ यात्रेतील भाविकांच्या बसवर दहशतवादी हल्ला, 7 भाविकांचा मृत्यू
![अमरनाथ यात्रेतील भाविकांच्या बसवर दहशतवादी हल्ला, 7 भाविकांचा मृत्यू 7 Amarnath Yatra Pilgrims Killed Many Injured After Terrorists Attacked Their Bus Latest Update अमरनाथ यात्रेतील भाविकांच्या बसवर दहशतवादी हल्ला, 7 भाविकांचा मृत्यू](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/07/10162328/amarnath-attack1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
फोटो सौजन्य: एएनआय
जम्मू-काश्मीर: जम्मू काश्मीरमधील अनंतनागमध्ये अमरनाथ यात्रेतील बसवर दहशतवाद्यांनी हल्ला केला असून यामध्ये तब्बल 7 भाविकांचा मृत्यू झाला आहे. तर 12 भाविक जखमी झाले आहेत. दहशतवाद्यांनी बातिंगूमध्ये पोलिसांच्या पथकावरही हल्ला केला.
जम्मू-काश्मीरमध्ये सध्या अमरनाथ यात्रा सुरु असून या यात्रेसाठी देशभरातील भाविक मोठ्या प्रमाणात राज्यात दाखल होतात. या यात्रेच्या सुरक्षेची जबाबदारी केंद्रीय राखीव दल अर्थात सीआरपीएफकडे असते. मात्र यावर्षी दहशतवादी हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर लष्कराकडे यात्रेच्या सुरक्षेची जबाबदारी सोपवण्यात आली होती
रात्री साडेआठच्या दरम्यान बसवर दहशतवाद्यांनी हल्ला केला. या बसमध्ये जवळजवळ 60 ते 70 भाविक असल्याची प्राथमिक माहिती समजते आहे. या हल्ल्यानंतर दहशतवादी फरार झाले आहेत.
दरम्यान, सुरक्षा दलांनी संपूर्ण परिसराला घेराव घातला असून दहशतवाद्यांचा कसून शोध सुरु आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
परभणी
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)