एक्स्प्लोर

भारतात 60 टक्के वाहनांचा विमा नाही!

मुंबई : भारतात रस्त्यावर धावणाऱ्या 60 टक्के वाहनांचा विमा नसल्याचं समोर आलं आहे. यामध्ये दुचाकींची संख्या अधिक आहे. तर मुंबईत 50 टक्के दुचाकींचा विमा काढलेला नाही, अशी माहिती जनरल इन्शुरन्स कौन्सिलने (जीआयसी) दिली आहे. भारतात 2015-16 या वर्षात 19 कोटी वाहनांची नोंदणी करण्यात आली. त्यापैकी केवळ 8 कोटी 26 लाख वाहनधारकांनी विमा काढला आहे, अशी माहिती जीआयसीचे सचिव आर चंद्रशेखरन यांनी दिली. 2012-13 मध्येही अशीच परिस्थिती होती. भारतात दुचाकी, चारचाकी आणि अवजड अशा सर्व प्रकारच्या 15 कोटी वाहनांची त्यावेळी नोंदणी करण्यात आली होती. मात्र केवळ 6 कोटी 2 लाख वाहनधारकांनीच विमा काढला होता. दरम्यान भारतातील अपघातांचा आकडा हा यापेक्षा भयानक आहे. 2015 मध्ये भारतात जवळपास 5 लाखांपेक्षा अधिक अपघात झाले, त्यापैकी 1 लाख 3 हजार अपघात हे जीवघेणे होते, तर 1 लाख 46 हजार जण या अपघातांमध्ये गंभीर जखमी झाले आणि पाच लाखांपेक्षा अधिक वाहनधारक या अपघातांमध्ये किरकोळ जखमी झाले. विशेष म्हणजे रस्ते अपघातांमध्ये दुचाकीधारकांची संख्या 29 टक्के आहे. तर कार 23 टक्के आणि बसेसचे 8 टक्के अपघात झाले आहेत. केवळ मुंबईमधील अपघातांमध्ये 611 जणांचा बळी गेला आहे. अपघातांची संख्या पाहता वाहनधारकाने विमा उतरवणं ही महत्वाची गरज असल्याचं वाहतूक तज्ञांचं म्हणणं आहे. अपघातात बळी पडणाऱ्यांची संख्या मोठी आहे, त्यामुळे विमा ही वाहनधारकाची प्राथमिक गरज असल्याचं वाहतूक तज्ञ सांगातात.

महत्त्वाच्या बातम्या

काही परकीय शक्तींकडून भारताला थांबवायचा प्रयत्न; तिरंगा रॅलीतून फडणवीसांनी सांगितली देशभक्ती, म्हणाले, तरुणाई थांबणार नाही
काही परकीय शक्तींकडून भारताला थांबवायचा प्रयत्न; तिरंगा रॅलीतून फडणवीसांनी सांगितली देशभक्ती, म्हणाले, तरुणाई थांबणार नाही
Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
Janardan Mishra Petrol : शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
Video: पावसासाठी चक्क मगरीच्या तोंडासमोर बसून पूजा; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल, कृष्णा नदीच्या काठावर आली होती मगर
Video: पावसासाठी चक्क मगरीच्या तोंडासमोर बसून पूजा; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल, कृष्णा नदीच्या काठावर आली होती मगर

व्हिडीओ

Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report
Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kisan Sabha Protest : नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
Janardan Mishra Petrol : शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला

Embed widget