एक्स्प्लोर
प्लास्टिकच्या पिशवीत डोकं-चेहरा गुंडाळला, चिमुकल्याचा गुदमरुन मृत्यू
हैदराबाद : हैदराबादच्या कुकटपल्ली परिसरात एका चार वर्षांच्या चिमुकल्याचा प्लास्टिकच्या पिशवीमुळे मृत्यू झाला आहे. या मुलाने खेळता खेळता पॉलिथीनच्या पिशवीने स्वत:चं डोकं आणि चेहरा गुंडाळला. मात्र श्वास गुदमरल्याने त्याला जीव गमवावा लागला.
रडण्याचा आवाज ऐकून आई मुलाजवळ पोहोचली
ही घटना बुधवार घडली आहे. चार वर्षांचा श्रीयान बेडरुममध्ये खेळत होता. खेळता-खेळता त्याने पॉलिथीनमध्ये डोकं आणि चेहरा गुंडाळला. यामुळे त्याला श्वास घेण्यास अडचण निर्माण झाली. त्याच्या रडण्याच्या आवाजाने आई बेडरुममध्ये पोहोचली. आईने पॉलिथीनची पिशवी काढण्याचा प्रयत्न केला, पण ती वाईट पद्धतीने अडकली होते. यामुळे श्रीयान बेशुद्ध झाला.
उपचारादरम्यान मृत्यू
कुटुंबीयांनी श्रीयानला रुग्णालयात दाखल केलं. त्याला व्हेंटिलेटवर ठेवण्यात आलं आणि ऑक्सिजन देण्याचा प्रयत्न केला. परंतु उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
यापूर्वीही घडल्या आहेत अशा घटना
याआधी मार्च महिन्यात मुंबईत अशाप्रकारे चार वर्षांच्या मुलाचा गुदमरुन मृत्यू झाला होता. मुलगा घराबाहेर खेळत होता. यावेळी तिथे उभ्या असलेल्या गाडीत तो घुसला आणि आत लॉक झाला. श्वास गुदमरल्याने त्याचा मृत्यू झाला होता. तर 2014 मध्ये भोपाळमध्ये कारमध्ये लॉक झाल्याने अडीच वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला होता.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
Advertisement