एक्स्प्लोर
Advertisement
वादळी पावसामुळे देशभरात 35 जण दगावले, पण मोदींची फक्त गुजरातलाच मदत, काँग्रेसचा मोदींवर हल्लाबोल
महाराष्ट्रासह मध्यप्रदेश, गुजरात आणि राजस्थानमध्ये गेले 3-4 दिवस वादळी वाऱ्यासह पावसाने धुमाकूळ घातला आहे. मुसळधार पावसामुळे देशभरात आतापर्यंत 35 जणांनी प्राण गमावले आहेत.
भोपाळ : महाराष्ट्रासह मध्यप्रदेश, गुजरात आणि राजस्थानमध्ये गेले 3-4 दिवस वादळी वाऱ्यासह पावसाने धुमाकूळ घातला आहे. मुसळधार पावसामुळे देशभरात आतापर्यंत 35 जणांनी प्राण गमावले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेमुळे दुःख व्यक्त केले आहे. त्यानंतर मोदींनी केवळ गुजरातमधील पीडितांना मदत करण्याची घोषणा केली. त्यामुळे काँग्रेसने मोदींना लक्ष्य केले आहे. मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी ट्विटरद्वारे मोदींवर टीका केली आहे. कमलनाथ यांनी मोदींना उद्देशून म्हटले आहे की, "मोदीजी तुम्ही केवळ गुजरातचे नाही तर संपूर्ण देशाचे पंतप्रधान आहात."
देशभरात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे 35 हून अधिक लोक दगावले, शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान झाले आहे. महाराष्ट्रातही अनेक फळबागांचे आतोनात नुकसान झाले आहे. परंतु नरेंद्र मोदींनी केवळ गुजरातलाचा मदत घोषित केली आहे. याबाबत पंतप्रधान कार्यालयाने ट्वीट करुन म्हटले होते की, "गुजरातमध्ये मुसळधार पाऊस आणि वादळामुळे जीव गमवावा लागलेल्या लोकांच्या कुटुंबियांना पंतप्रधान मदत निधीमधून प्रत्येकी 2-2 लाख रुपये भरपाई म्हणून देण्यास मंजुरी देण्यात आली आहे. तसेच जखमींना 50-50 हजार रुपये भरपाई म्हणून देण्याची घोषणा केली."
VIDEO | यंदा सरासरीपेक्षा कमी पावसाचा स्कायमेटचा अंदाज | स्पेशल रिपोर्ट | एबीपी माझा
पीएमओ कार्यालयाचे ट्वीट पाहा
त्यानंतर मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी ट्विटरद्वारे मोदींना प्रत्युत्तर दिले आहे. कमलनाथ यांनी त्यांच्या ट्वीटमध्ये म्हटले आहे की, "मोदीजी तुम्ही केवळ गुजरातचे नव्हे तर संपूर्ण देशाचे पंतप्रधान आहात. मध्य प्रदेशात वादळ, मुसळधार पाऊस आणि वीजेमुळे 10 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. परंतु तुमची संवेदना केवळ गुजरातसाठीच आहे. मध्यप्रदेशात तुमचे सरकार नाही, परंतु या राज्यातदेखील माणसंच राहतात." VIDEO | 2019-20 या वर्षात दुष्काळ पडणार नाही : स्कायमेट | नवी दिल्ली | एबीपी माझा कमलनाथ यांचे ट्वीटPM @narendramodi approved an ex- gratia of Rs. 2 lakh each from the Prime Minister’s National Relief Fund for the next of kin of those who have lost their lives due to unseasonal rain and storms in various parts of Gujarat.
— PMO India (@PMOIndia) April 17, 2019
गेल्या तीन-चार दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे राजस्थानमध्ये 9 जण मृत्युमुखी पडले आहेत, तर मध्य प्रदेशात पावसाने 15 जणांचा बळी घेतला आहे. तसेच दिल्लीत एक, बिहारमध्ये एक आणि गुजरातमध्ये 9 जण दगावले आहेत. मध्य प्रदेश, राजस्थान आणि हिमाचल प्रदेशमध्ये हवामान खात्याने वादळाचा अलर्ट जारी केला आहे.मोदी जी , आप देश के पीएम ना कि गुजरात के। एमपी में भी बेमौसम बारिश व तूफ़ान के कारण आकाशीय बिजली गिरने से 10 से अधिक लोगों की मौत हुई है।लेकिन आपकी संवेदनाएँ सिर्फ़ गुजरात तक सीमित ? भले यहाँ आपकी पार्टी की सरकार नहीं है लेकिन लोग यहाँ भी बस्ते है।
— Office Of Kamal Nath (@OfficeOfKNath) April 17, 2019
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
ठाणे
विश्व
राजकारण
क्राईम
Advertisement