एक्स्प्लोर
नोटाबंदीनंतर 7 महिन्यात जन-धन खात्यांमध्ये 300 कोटीपेक्षा जास्त रक्कम जमा
जन-धन खात्यात आतापर्यंत 64 हजार 564 कोटी रुपये जमा झाले असून, यातील 300 कोटी रुपये हे नोटाबंदीनंतर सात महिन्यातील आहेत. माहिती अधिकारात ही बाब उघड झाली आहे.
![नोटाबंदीनंतर 7 महिन्यात जन-धन खात्यांमध्ये 300 कोटीपेक्षा जास्त रक्कम जमा 300 Crore Plus Cash Deposits In Jan Dhan Accounts In 7 Months After The Demonetization नोटाबंदीनंतर 7 महिन्यात जन-धन खात्यांमध्ये 300 कोटीपेक्षा जास्त रक्कम जमा](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/07/17032432/note1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
नवी दिल्ली : जन-धन खात्यात आतापर्यंत 64 हजार 564 कोटी रुपये जमा झाले असून, यातील 300 कोटी रुपये हे नोटाबंदीनंतर सात महिन्यातील आहेत. माहिती अधिकारात ही बाब उघड झाली आहे.
पंतप्रधान मोदींच्या महत्त्वकांक्षी योजनांमधील 'जन-धन' ही देखील एक आहे. याचा मुख्य उद्देश बँकिंग सेवा सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचवण्याचा आहे. या योजनेअंतर्गत शून्य रुपये बॅलेन्सवर बँकेत खाते उघडण्याची व्यवस्था आहे. पण नोटाबंदीनंतरच्या काळात जन-धन खात्यांमध्ये मोठी रक्कम जमा झाल्याचं समोर आलं आहे.
माहिती अधिकारात दिलेल्या माहितीनुसार, देशभरात 14 जून 2017 पर्यंत 28 लाख 90 कोटी जन-धन खाती उघडण्यात आली. यातील सरकारी बँकांमधील खात्यात 23 लाख 27 कोटी रुपये जमा झाले. तर स्थानिक ग्रामीण बँकांमध्ये 4 लाख 70 कोटी रुपये, आणि 92 लाख 70 कोटी रुपये खासगी बँकांमध्ये, असे एकूण म्हणजेच, 64 हजार 564 कोटी रुपये जमा झाले.
तर 16 नोव्हेंबर 2016 पर्यंत देशभरात 25 लाख 58 कोटी जन-धन खाती उघडण्यात आली. ज्यात एकूण 64 हजार 252 कोटी रुपये जमा असल्याचं अर्थराज्य मंत्री संतोषकुमार गंगवार यांनी लोकसभेत विचारलेल्या एका प्रश्नाला लिखित उत्तर देताना सांगितलं.
म्हणजेच, 16 नोव्हेंबर 2016 ते 14 जून 2017 पर्यंत जन-धन खात्यांवर एकूण 311.93 कोटी रुपये जमा करण्यात आले. विशेष म्हणजे, पंतप्रधान मोदींनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा चलनातून रद्द केल्या. यानंतर बँकांमध्ये जुन्या नोटा जमा करण्यासाठी सवलत देण्यात आली होती. याच काळात सर्वाधिक 300 कोटी रुपये जन-धन खात्यात जमा झाल्याचं समोर आलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
राजकारण
महाराष्ट्र
क्रिकेट
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)