एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
दिवाळीची आतषबाजी हैदराबादमधील 30 जणांच्या जिवावर
दिवाळीची आतषबाजी हैदराबादमध्ये 30 जणांच्या जिवावर बेतली आहे. आतषबाजीमुळे हैदराबादमधील 30 जणांच्या डोळ्यांना गंभीर इजा झाली आहे.
हैदराबाद : दिवाळीची आतषबाजी हैदराबादमध्ये 30 जणांच्या जिवावर बेतली आहे. आतषबाजीमुळे हैदराबादमधील 30 जणांच्या डोळ्यांना गंभीर इजा झाली आहे. यातील 6 जणांच्या डोळ्यांवर शस्त्रक्रिया करण्याची आवश्यकता आहे.
दिवाळीच्या निमित्त काल हैदराबादमध्ये मोठी आतषबाजी करण्यात आली. यावेळी जवळपास 30 जणांच्या डोळ्यांना गंभीर इजा झाली. यातील काहींना स्वत: फटाके फोडताना, तर काहींना दुसऱ्यांनी फटाके फोडताना गंभीर इजा झाली. जखमींमध्ये लहान मुलांची संख्या मोठी आहे.
जखमींवर हैदराबादमधीलच सरोजनी देवी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. यातील 6 जणांच्या डोळ्यांना गंभीर इजा झाली असून, त्यांच्यावर तातडीने शस्त्रक्रिया करण्याची आवश्यक्ता असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.
दरम्यान, या घटनेनंतर तेलंगणाचे वैद्यकीय आणि आरोग्यमंत्री सी.लक्ष्मी रेड्डी यांनी जखमींवरील उपचाराविषयी माहिती दिली.
रेड्डींनी सांगितलं की, “सरोजनी रुग्णालयात काल रात्री 30 जणांवर उपचार सुरु असून, त्यांच्या डोळ्यांना इजा झाली आहे. यातील 6 जणांच्या डोळ्यांना गंभीर इजा झाल्याने, त्यांच्यावर तातडीने शस्त्रक्रिया करण्याची गरज आहे.”
या सर्वांवर उपचार सुरु असून, त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भंडारा
महाराष्ट्र
महाराष्ट्र
करमणूक
Advertisement