नवी दिल्ली : देशात आतापर्यंत 14 हजार 378 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यापैकी 4291 केसेस म्हणजे 29.8% पॉझिटिव्ह रुग्ण एकाच स्रोतापासून म्हणजे निझामुद्दीन मर्कज समूहातून निर्माण झाले असल्याचे आढळले आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. देशातील 23 राज्य आणि काही केंद्रशासित प्रदेशांमध्ये मर्कजच्या कार्यक्रमातील व्यक्तींना कोरोनाची लागण झाली आहे. यात सर्वाधिक तमिळनाडूमध्ये मर्कज कार्यक्रमातील कोरोना बाधित केसस सापडल्या आहेत. जिल्हा पातळीवर राबवलेल्या चांगल्या कार्यक्रमांमुळे कोरोना संसर्गाचा वेग मंदावल्याचेही आरोग्य मंत्रालयाने सांगितले.


दिल्लीतील निझामुद्दीन येथे तब्लिगी जमातचा कार्यक्रम पार पडला होता. हा कार्यक्रम देशातील अनेक भागात कोरोनाचा प्रसार करण्यात कारणीभूत ठरला असल्याची बाब समोर आली आहे. देशातील 14 हजार 378 कोरोना बाधितांपैकी 4 हजार 291 केसेस ह्या या कार्यक्रमातील व्यक्तींमुळे झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

तामिळनाडूत – 84 %
नवी दिल्लीत – 63 %
तेलंगणात - 79 %
आंध्र प्रदेश – 61 %
उत्तर प्रदेश – 59 % केसेस मर्कजशी संबंधित आहेत.

देशाचा मृत्यूदर 3.3 टक्के
0 ते 45 वय - 14.4 टक्के मृत्यू
45 ते 60 वय - 10.3 टक्के मृत्यू
60 ते 75 वय - 33 टक्के मृत्यू
75 वयापेक्षा जास्त - 42 टक्के मृत्यू
या सगळ्या मृत्यू झालेल्या लोकांपैकी 83 टक्के लोकांना उच्चरक्तदाब, मधुमेह, किडनीचे विकार आणि इतर गंभीर आजार होते.

'आमची टेस्ट करा पण आम्हाला मुंबईत येऊ द्या', समुद्रात अडकलेल्या कर्मचाऱ्यांची व्यथा

विदेशातील नागरिकांना दिलासा
विदेशातील जे रुग्ण भारतात अडकलले आहेत आणि ज्यांचा व्हिसा संपला आहे. अशांना त्यांच्या विनंतीनंतर 3 मे पर्यंत विनामोबदला व्हिसा दिला जाणार असल्याचं केंद्र सरकारने दिली. कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी प्रत्येक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात कंट्रोल रुम उभे करण्यात आले आहे. त्याशिवाय देशातील नागरिकांसाठी 112 हा हेल्पलाईन नंबर जारी करण्यात आला आहे. हा आपात्कालीन नंबर आहे. कोरोना संकट आणि लॉकडाऊनमध्ये देखील या सेवेचा अनेक नागरिकांनी लाभ घेतला. कोरोना व्हायरसमुळे रक्ताचा तुटवडा निर्माण होत आहे. त्यामुळे रुग्णालय प्रशासनाने रक्तादान शिबीर घ्यायला हवी. रक्तदान मोबाईल सेवेचाही वापर करण्यात यावा. यासाठी सामाजिक संस्थांची मदत घेण्याच्याही सूचना देण्यात आल्या आहेत.

Coronavirus | हायड्रॉक्सिक्लोरोक्वीनच्या पुरवठ्यानंतर ट्रम्प यांचा सूर बदलला; पंतप्रधान मोदींचे आभार मानले! 
देशातील 1992 लोक आतापर्यंत कोरोनामुक्त झाले आहेत. म्हणजे एकूण रुग्णांपैकी 13.85 टक्के रुग्ण बरे झालेत. तर काल 991 नवीन पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली. आतापर्यंत देशात एकून 14378 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. मागील 24 तासात 43 जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्हा पातळीवर करण्यात आलेल्या उपाययोजनांचा फायदा होताना दिसत आहे. 23 राज्यातील 47 जिल्ह्यांमधून सकारात्मक बातमी येत आहे. पाँडिचेरी, कर्नाटकातील एका जिल्ह्यात मागील 28 दिवसांपासून एकही कोरोना रुग्ण आढळला नाही. तर, 23 राज्यातील 45 जिल्ह्यामध्ये मागील 14 दिवसांपासून एकाही पॉझिटिव्ह केस आलेली नाही. यात बिहार, राजस्थान, जम्मू काश्मिर, आध्र प्रदेश, पश्चिम बंगाल सारख्या राज्यांचा समावेश आहे. देशातील मृत्यूदर हा 3.3 नोंदवण्यात आला असल्याची माहिती केंद्रीय मंत्रालयाने दिली.

Business Plan After Lockdown | लॉकडाऊननंतर उद्योग-व्यापारातील तोटा कसा भरून काढायचा? विकोचे संचालक संजीव पेंढारकर यांचा कानमंत्र!