घरी पोहोचण्यासाठी पायपीट करणाऱ्यांना टोलनाक्यावर अन्न-पाणी पुरवा : नितीन गडकरी
कोरोना विषाणु आणि देशभरात लागु करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर देशातील अनेक सेवा बंद केल्या आहेत. मात्र देशभरात कोरोना हॉटस्पॉट नसलेल्या ठिकाणी 20 एप्रिलपासून सवलत मिळण्याची शक्यता आहे. राज्यातील तसेच देशातील काही भागांमध्ये अटी शर्तींच्या अधीन राहून काही उद्योगधंद्यांना काम सुरु करण्याची परवानगी मिळण्याची शक्यता आहे. यामध्ये सर्व प्रकारच्या अत्यावश्यक तसेच इतर काही वस्तुंची देखील ने-आण करण्याची सशर्त परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे सहाजिकच मोठ्या प्रमाणात व्यावसायिक तसेच खासगी वाहने रस्त्यावर येण्याची शक्यता आहे. यामुळे 20 एप्रिलपासून सर्वांना प्रवास करताना टोल सुरु केला जाणार आहे.टोलमाफीचा निर्णय रद्द करा, आरटीआय कार्यकर्त्याची पंतप्रधानांकडे तक्रार
प्राधिकरणाच्या आधीच्या निर्णयानुसार 15 एप्रिलपासून ही टोलवसुली सुरु करण्यात येणार होती. मात्र त्यापूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 3 मे पर्यंत लॉकडाऊनची घोषणा केल्यामुळे 15 एप्रिलला पुन्हा टोल माफ करण्यासंदर्भातील अधिसूचना काढली होती.