मुंबई : सोशल मीडियावर कधी काय ट्रेंड होईल सांगता येत नाही. कोरोनामुळे जगभरातील अनेक देशांमध्ये लॉकडाऊन आहे. त्यामुळे लोकांना आत्ता वेळचवेळ आहे. परिणामी वेळ कसा घालवायचा म्हणून सोशल मीडियावर आता चॅलेंज देण्याचं प्रमाण वाढलं आहे. असाच एक ट्रेंड सोशल मीडियावर फेमस होत आहे. #MeAt20 मी 20 वर्षांचा असताना, असा हा ट्रेंड असून यामध्ये लोक सोशल मीडियावर 20 वर्षाचा असतानाचा फोटो पोस्ट करत आहे. जगभरात हा ट्रेंड सुरू असून भारतातही सर्वसामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेकांनी आपल्या विशीतले फोटो पोस्ट करत हे चॅलेंज स्वीकारले आहे. तर, या ट्रेंडमुळे मीम्सलाही उत आला आहे.


भारतात सोशल मीडिया वापरणाऱ्यांचे प्रमाण जगात सर्वाधिक आहे. लॉकडाऊनमुळे बहुतेक लोक हे घरातचं बसून आहेत. त्यामुळे मन रमवण्यासाठी आता सोशल मीडियावर नवनवीन ट्रेंड सुरू होताना दिसत आहे. अगदी लहानपणीचे फोटो टाकण्यापासून मुलापर्यंतचे. असाच एक ट्रेंड #MeAt20 सुरू झाला आहे. भारतीय क्रिकेट संघाचा माजी फलंदाज विरेंद्र सेहवागपासून कवी कुमार विश्वासपर्यंत अनेकांनी आपल्या विशीतले फोटो शेअर केले आहेत.




























Paper Bed | पेपर क्राफ्टपासून बनवला बेड, गुजरातच्या आर्यन पेपरचं भन्नाट संशोधन