वॉशिग्टन : अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हायड्रोक्सीक्लोरोक्वीन औषध अमेरिकेला पुरवल्याबाबत आभार मानले आहेत. यासंदर्भात अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी एक ट्वीट करून पंतप्रधान मोदींचे आभार मानले आहेत. तसेच त्यांनी ट्वीटमध्ये भारत-अमेरिका यांच्यातील मैत्रीचाही उल्लेख केला आहे.


काही दिवसांपूर्वी कोरोना व्हायरसमुळे बेहाल झालेल्या अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला धमकी दिली होती. भारताने हायड्रॉक्सिक्लोरोक्वीन (hydroxychloroquine) औषधाच्या निर्यातीवरील बंदी हटवली नाही तर आम्ही प्रत्युत्तर देऊ शकतो, असं ट्रम्प म्हणाले होते. दरम्यान, कोरोनाबाधितांवरील उपचारांसाठी हायड्रॉक्सिक्लोरोक्वीनचा वापर केला जात आहे. याआधी डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे औषधासाठी विनंती केली होती. परंतु आता हायड्रॉक्सिक्लोरोक्वीन औषध अमेरिकेला पुरवल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान मोदींची प्रशंसा केली आहे.



डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्वीटमध्ये लिहिलं आहे की, 'संकटाच्या काळात मित्रांना मदत करण्याची गरज असते. हायड्रॉक्सिक्लोरोक्वीन औषध पुरवण्याबाबत निर्णय घेतल्यामुळे भारत आणि भारताच्या लोकांचे आभार. ट्रम्प यांनी पुढे लिहिसं आहे की, आम्ही ही मदत कधीच विसरणार नाही. ट्रम्प यांनी मोदींना टॅग करत पुढे लिहिलं आहे की, कोरोन विरूद्धच्या या लढाईमध्ये मोदी फक्त भारताची नाहीतर मानवतेची मदत करत आहेत. यासाठी ट्रम्प यांनी मोदींचे आभार मानले आहेत.


पाहा व्हिडीओ : इटालियन लेखिका फ्रानसेस्को मेलॅंड्रींचं कोरोनावरील भावनिक पत्र, अभिनेत्री मुक्ता बर्वेकडून वाचन!



आम्ही प्रत्युत्तर देऊ शकतो : ट्रम्प


दोन दिवसांपूर्वी अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प हाईट हाऊसमध्ये मीडियाशी बोलता म्हणाले होते की, भारत आणि अमेरिकेच चांगले व्यापारी संबंध आहे. जर भारताने औषधाच्या निर्यातीवरील बंदी हटवली नाही तर आम्ही प्रत्युत्तर देऊ शकतो. याआधी डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी बातचीत करुन कोरोनाशी लढण्यासाठी सहकार्य करण्याची मागणी केली होती. हायड्रॉक्सिक्लोरोक्वीन (Hydroxychloroquine) हे मलेरियाच्या उपचारांसाठी वापरलं जाणारं औषध आहे. कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांवरही हे औषध फायदेशीर ठरत आहे.


कोरोना व्हायरस जगभरात वेगाने पसरत आहे. इटली, स्पेनसारख्या विकसित देशांनीही या व्हायरसमोर गुडघे टेकले आहेत. आता महासत्ता असलेल्या अमेरिकेची नजरही आता भारताकडे आहे. भारताकडून मदत मिळण्याची आस अमेरिकेला आहे. ट्रम्प यांच्यामते कोरोनावरील उपचारांमध्ये हायड्रॉक्सिक्लोरोक्वीन (Hydroxychloroquine) हे औषध परिणामकारक ठरत आहे.


पाहा व्हिडीओ : ट्रम्प यांच्या धमक्यांना भीक घालू नका; पंतप्रधान मोदी आणि संजय राऊत यांच्यात चर्चा



भारत हायड्रॉक्सिक्लोरोक्वीनचा सर्वात मोठा उत्पादक


भारतात दरवर्षी मोठ्या संख्येने मलेरियामुळे मृत्यू होता. त्यासाठी भारतातील औषध कंपन्या मोठ्या प्रमाणात हाइड्रॉक्सिक्लोरोक्वीनचं उत्पादन करतात. आता हे औषध कोरोना व्हायरसशी लढण्यासाठी परिणामकारक ठरत आहे. त्यामुळे याची मागणी वाढत आहे. परंतु कच्च्या मालाच्या तुटवड्यामुळे या औषधाच्या उत्पादनावरही परिणाम झाला आहे. जागतिक लॉकडाऊनमुळे भारतीय औषध उत्पादक कंपन्यांनी यासाठी आवश्यक कच्चा माल एअरलिफ्ट करुन मागवण्याची विनंती सरकारकडे केली आहे.


संबंधित बातम्या : 


Coronavirus | ब्रिटीश पंतप्रधान बोरिस जॉनसन यांची प्रकृती खालावली; आयसीयूमध्ये दाखल


हायड्रॉक्सिक्लोरोक्वीन औषध न दिल्यास प्रत्युत्तर दिलं जाईल, डोनाल्ड ट्रम्प यांची भारताला धमकी


अमेरिकेतील भारतीय वंशाचे पत्रकार ब्रह्म कांचीबोटला यांचा कोरोनामुळे मृत्यू