एक्स्प्लोर

28 November In History : महात्मा फुलेंची पुण्यतिथी, मुंबई दहशतवादी हल्ल्यात मेजर उन्नीकृष्णन यांना वीरमरण; आजच्या दिवशी काय काय घडलं?

28 November in history : आजच्या दिवशी इतिहासात कोणकोणत्या महत्वपूर्ण घटना घडल्या होत्या यांची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.

On This Day In History : आजच्या दिवशी इतिहासात काय काय घडलंय? हे जाणून घेण्याची इच्छा सर्वांनाच असते. अनेकांची दिवसाची सुरुवात ही दिनविशेष वाचनाने होते.  अनेक चांगल्यावाईट घटनांनी इतिहासातील तारखा नोंदलेल्या असतात. दिग्गजांचा जन्म-मृत्यू या नोंदींसह इतिहासात आज काय घडलं याची आपल्या सर्वांना उत्सुकता असते. आज म्हणजे 28 नोव्हेंबर रोजी देखील भारतात आणि जगात खूप महत्वाच्या घटना घडल्या होत्या.   क्रांतिकारक विचारवंत महात्मा ज्योतिबा फुले यांची आज 104  वी पुण्यातिथी आहे. त्याशिवाय आजच्याच दिवशी मेजर उन्नीकृष्णन यांना वीरमरण आले होते. ताज हॉटेलमध्ये दहशतवाद्यांशी लढताना त्यांना वीरमरण आले होते. तर न्यूझीलंडमध्ये आजच्या दिवशी पहिल्यांदा महिलांनी मतदानाचा हक्क बजावला होता. यासह इतिहासात अनेक घटना घडल्या आहेत. आजच्या दिवशी इतिहासात कोणकोणत्या महत्वपूर्ण घटना घडल्या होत्या यांची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. तसंच, आजच्या दिवशी असणारे दिग्गजांचे जन्मदिवस आणि निधन झालेल्या महत्वपूर्ण व्यक्तींबद्दल थोडक्यात जाणून घेणार आहोत.

महात्मा फुलेंची 132 वी पुण्यतिथी (mahatma jyotiba phule death anniversary)-
समाजातील श्रमजीवी वर्गाच्या शोषणाची व सामाजिक दास्याची मीमांसा करणारे क्रांतिकारक विचारवंत म्हणजे महात्मा जोतिबा फुले यांची आज पुण्यातिथी आहे. 28 नोव्हेंबर 1890 रोजी महात्मा फुले यांचं निधन झालं होतं. महात्मा फुलेंनी समाजातील अनिष्ठ रूढी , प्रथा, परंपरांविरोधात कंबर कसली. आणि या कुप्रथा कायमच्या हद्दपार होतील यासाठी प्रयत्न केले. पण फक्त समाजसुधारणा ऐवढ्यापुरतेच महात्मा फुले मर्यादित राहिले नाहीत. तर एक उद्योजक म्हणून पुण्याच्या उभारणीमध्येही महत्वाची भूमिका बजावली. महात्मा फुले लेखक, विचारवंत आणि समाजसुधारक होते. त्यांनी सत्यशोधक समाज नावाच्या संस्थेची स्थापनाही केली होती. सामाजिक समतेचे पुरस्कर्ते, स्त्रीशिक्षणाचे प्रणेते, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतीबा फुले यांनी बहुजन समाजाला शिक्षणाचे महत्व पटवून सन्मानाने जगण्याचा मार्ग दाखवला. स्त्रीयांसाठी शिक्षणाची दारे खुली करुन त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणले. अज्ञान, अंधश्रद्धा, अस्पृश्यता, जातीभेद, धर्मव्यवस्थेच्या गुलामगिरीतून समाजाला बाहेर काढून वैचारिक, सामाजिक क्रांती घडवली. राज्यकर्त्यांनी शेतकरी, बहुजन समाजाला केंद्रस्थानी ठेवून धोरणं आखली पाहिजेत हा विचार दिला. क्रांतीसूर्य महात्मा ज्योतीबा फुले यांच्या विचारांमध्ये राज्याला, देशाला विकासाच्या वाटेवर पुढे घेऊन जाण्याची ताकद आहे.

मेजर उन्नीकृष्णन यांना वीरमरण (Sandeep Unnikrishnan)-
26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याला नुकतीच दहा वर्ष पूर्ण झाली.  पाकिस्तानातून आलेल्या दहा दहशतवाद्यांनी मुंबई हादरवून टाकली होती. या हल्ल्यात मेजर संदीप उन्नीकृष्णन यांना प्राणाची आहुती द्यावी लागली होती. या दहशतवाद्यांच्या या हल्ल्यात शेकडो लोक मृत्यूमुखी पडले, तर कित्येक लोकांनी आपलं सर्वस्व गमावलं. आजही दहा वर्षानंतर या हल्ल्याच्या जखमा ताज्या आहेत. याच हल्ल्यात मेजर संदीप उन्नीकृष्णन यांना वीरमरण आलं.  आजच्याच दिवशी मेजर उन्नीकृष्णन यांचं निधन झालं होतं. मेजर संदीप उन्नीकृष्णन यांनी मुंबईतील ताज हॉटेलवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात अनेकांचे प्राण वाचवले आणि त्यातच त्यांना त्यांचा जीव गमवावा लागला.
सिक्युरिटी गार्डसचे कमांडो मेजर असलेल्या संदीप यांनी ताज हॉटेलवरील  दहशतवादी हल्ल्यात प्राणांची पर्वा न करता अनेक नागरिकांचे प्राण वाचवले. तसेच सहकारी कमांडोंनाही सुरक्षित बाहेर काढले. मात्र या लढाईत संदीप यांना प्राणांची आहुती द्यावी लागली.  कारगिल युद्धात पाकिस्तानचा अगदी समोरून भयावह गोळीबार सुरू असतानाही त्यांनी केवळ सहा जवान हाताशी धरून पाकिस्तानी फॉरवर्ड चौकीच्या अगदी समोरच फक्त 200 मीटर अंतरावर पाकिस्तान्यांच्या नाकावर टिच्चून भारतीय चौकी उभारून सर्वांची वाहवा मिळवली होती.
26/11 चा दहशतवादी हल्ला हा भारतावरील सर्वात भीषण हल्ला होता. 26 नोव्हेंबर, 2008 रोजी शस्त्रास्त्रांसह पाकिस्तानातील दहा दहशतवादी कराचीहून समुद्रामार्गे बोटीने मुंबईत घुसले होते. या अतिरेक्यांनी दहशतवाद्यांनी छत्रपती शिवाजी रेल्वे टर्मिनस, ताजमहल हॉटेल, ट्रायडंट हॉटेल आणि नरिमन हाऊसवर हल्ला केला होता. दहशतवाद्यांनी सुमारे 60 तास धुमाकूळ घातला आणि या हल्ला 166 पेक्षा जास्त निरपराध लोकांचा मृत्यू झाला होता तर 300 हून अधिक लोक जखमी झाले होती. मृतांमध्ये 28 परदेशी नागरिकांचा समावेश होता.

भालजी पेंढारकर यांची पुण्यतिथी (Bhalji Pendharkar Death Anniversary) -
भालजी पेंढारकर यांनी सिनेसृष्टीत पाच दशकाहून अधिक काळ सिने-दिग्दर्शक, निर्माते, पटकथालेखक, संवादलेखक म्हणून काम केलेय. मूकपट ते बोलपट आणि कृष्णधवल ते रंगीत सिनेनिर्मिती करण्यात भालजी पेंढारकर यांचा मोलाचा वाटा होता. 26 नोव्हेंबर 1994 रोजी त्यांनी जगाचा निरोप घेतला होता. 

भालजी पेंढारकरांनी त्यांच्या करिअरच्या सुरुवातीला 'बहु असोत सुंदर', 'आकाशवाणी', 'पार्थकुमार', 'कालियामर्दन', 'सावित्री' हे बोलपट केले. त्यानंतर 1939 सालानंतर त्यांनी सिनेमांत वेगवेगळे प्रयोग करायला सुरुवात केली. पुढे त्यांनी 'नेताजी पालकर', 'थोरातांची कमळा', 'वाल्मिकी', 'मीठभाकर', 'छत्रपती शिवाजी', 'गाठ पडली ठका ठका', 'मोहित्यांची मंजुळा', 'साधी माणसं', 'गनिमी कावा', 'शाब्बास सूनबाई' असे पंचेचाळीस सिनेमे सिनेसृष्टीला दिले. भालजी पेंढारकरांनी जयप्रभा स्टुडिओची स्थापना केली. या स्टुडिओच्या माध्यमातून त्यांनी अनेक सिनेमांची निर्मिती केली. दिग्दर्शन, कथा, पटकथा, संवाद गीते अशा वेगवेगळ्या माध्यमातून सिनेसृष्टीत काम करण्यासोबतच समाज प्रबोधनाचे महत्त्वाचे कार्य केलेय. त्यामुळेच त्यांच्या कार्याची दखल घेत भारत सरकारने त्यांना मानाच्या दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित केलेय
 
न्यूझीलंडमध्ये पहिल्यांदा महिलांनी मतदान केलं
आजच्याच दिवशी न्यूझीलंडमध्ये महिलांनी मतदान केले होते. 28 नोव्हेंबर 1893 रोजी न्यूझीलंडमधीन निवडणुकीत महिलांनी मतदान केलं. महिलांना मतदानाचा हक्क मिळावा यासाठी तब्बल 110  वर्ष संघर्ष करण्यात आला. जगात सर्वात आधी महिलाना मतदानाचा हक्क न्यूझीलंडमध्ये मिळाला होता. भारतामध्येही महिलांना मतदानाचा अधिकार देण्यास परंपरावाद्यांकडून विरोध झालेला. पण स्वातंत्र्य लढ्यातील आधिनिक विचारांच्या नेत्यांनी समतेच्या मुल्याला प्राधान्य देत आणि भेदभाव टाळत महिलांना मतनाचा अधिकार दिला. 

नासाचे मरीनर यान अंतराळात रवाना -
28 नोव्हेंबर 1964 रोजी नासाचे मरीनर-४ हे अंतराळयान मंगळाच्या मोहिमेवर रवाना झालं होतं. 260.8 किलो वजनाचं हे यानं होतं. तीन वर्षांपर्यंत हे यानं अंतराळात होतं. २१ डिसेंबर१९६७ रोजी या यानासोबत अखेरचा संपर्क झाला होता. 

एअरबस ए ३०० ला कंमाड देणारी पहिली महिला -
१९९६ मध्ये कॅप्टन इंद्राणी सिंह एअरबेस ए- ३०० ला कमांड देणारी पहिली महिला आहे. एयरबस ए-320 च्या आशियामधील पहिली महिला कमर्शियल पायलट राहिली आहे. त्याशिवाय लिटरेसी इंडियाची फाऊंडर सेक्रेटरी होती.  इंद्रायणीनं दिल्लीमधून शिक्षण पूर्ण केलेय.  

मायकल होल्डिंगचं कसोटीमध्ये पदार्पण -
आजच्याच दिवशी १९७५ मध्ये वेस्ट विंडिजचे दिग्गज क्रिकेटपटू मायकल होल्डिंग यांनी कसोटीमध्ये पदार्पण केले होते. मायकल होल्डिंग यांनी ६० कसोटी सामन्यात २४९ विकेट घेतल्या. तर १४२ एकदिवसीय सामन्यात १४२ विकेट्स घेतल्या आहेत.

अभिनेत्री ईशा गुप्ताचा जन्म
बॉलिवूड अभिनेत्री आणि मॉडेल ईशा गुप्ता हिचा जन्म आजच्याच दिवशी 1985 मध्ये झाला होता. ईशा गुप्तानं ‘मिस इंडिया इंटरनॅशनलचा’ किताब आपल्या नावावर केलाय. ईशाला बॉलिवूडची बोल्ड आणि बिनदास्त ‘अँजेलिना जोली’ म्हणून ओळखले जाते. ईशानं अनेक बॉलिवूड चित्रपटामध्ये काम केलेय. 

प्रतिक बब्बरचा जन्म -
बॉलिवूड अभिनेता प्रतिक बब्बर याचा १९८६ मध्ये जन्म झाला. वडील आणि आईप्रमाणे प्रतिकला बॉलिवडूमध्ये आपलं स्थान निर्माण करता आलं नाही. पण त्यांनं अनेक चित्रपटात महत्वाच्या भूमिका केल्या आहेत.

यामी गौतमचा जन्म -
18 नोव्हेंबर 1988 मध्ये यामी गौतमचा जन्म झाला. विकी डोनर या चित्रपटातून यामी गौतमनं बॉलिवूडमध्ये पदार्पण केलेय.  यामीने तेलगु चित्रपटातही भूमिका केल्या आहेत. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

गारठाही अन् उकाडाही! राज्यात येत्या 2 दिवसांत तापमानाचा अंदाज काय? मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात..
गारठाही अन् उकाडाही! राज्यात येत्या 2 दिवसांत तापमानाचा अंदाज काय? मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात..
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
Saif ali khan Attack: सैफ अली खानवर हल्ला करणारा सापडला, ठाण्यातील  लेबर कॅम्पला पोलिसांनी घेरलं, आरोपी मोहम्मद अलियानला अलगद जाळ्यात पकडलं
सैफ अली खानवर हल्ला करणारा सापडला, ठाण्यातील लेबर कॅम्पमध्ये सापळ रचून मोहम्मद अलियानच्या मुसक्या आवळल्या
Kolhapur Crime : कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 18 January  2024Special Report Saif Ali Khan : करिनाचा जबाब, कोणते धागेदोरे? करिनाने सांगितला हत्येचा घटनाक्रमBeed Santosh Deshmukh Accuse CCTV : संतोष देशमुख यांच्या आरोपींचे तिरंगा हॉटेल येथिल CCTV पोलिसांच्या हातीABP Majha Marathi News Headlines 10 PM TOP Headlines 10 PM 18 January  2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
गारठाही अन् उकाडाही! राज्यात येत्या 2 दिवसांत तापमानाचा अंदाज काय? मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात..
गारठाही अन् उकाडाही! राज्यात येत्या 2 दिवसांत तापमानाचा अंदाज काय? मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात..
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
Saif ali khan Attack: सैफ अली खानवर हल्ला करणारा सापडला, ठाण्यातील  लेबर कॅम्पला पोलिसांनी घेरलं, आरोपी मोहम्मद अलियानला अलगद जाळ्यात पकडलं
सैफ अली खानवर हल्ला करणारा सापडला, ठाण्यातील लेबर कॅम्पमध्ये सापळ रचून मोहम्मद अलियानच्या मुसक्या आवळल्या
Kolhapur Crime : कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
Morocco to cull 3 million stray dogs : 30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
Walmik Karad Property: कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
Embed widget