EPFO कडून 23 कोटी खातेधारकांना गिफ्ट; बक्कळ व्याजाची रक्कम जमा, असा चेक करा बॅलन्स
Employees’ Provident Fund Organisation (EPFO) : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना म्हणजेच इपीएफओनं आपल्या पीएफ खातेधारकांना मोठी खूशखबर दिली आहे.
Employees’ Provident Fund Organisation (EPFO) : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना म्हणजेच इपीएफओनं आपल्या पीएफ खातेधारकांना मोठी खूशखबर दिली आहे. आर्थिक वर्ष 2020-2021 च्या व्याजाची रक्कम इपीएफओनं जमा केली आहे. ईएफपीओने ट्वीट करत याबाबतची अधिकृत माहिती दिली आहे. त्यामुळे तुमच्या खात्यात व्याजाची रक्कम जमा झाली की नाही हे लगेच तपासा. दरम्यान, केंद्र सरकारने या वर्षी पीएफ व्याजाची रक्कम ही 8.50 टक्के इतकी निर्धारित केली आहे.
असं चेक करा बॅलेन्स -
आपल्या खात्यावर पैसे जमा झालेत का नाही हे मोबाईलच्या माध्यमातून घरबसल्या चेक करता येते. ईएफपीओकडून बॅलेन्स चेक करण्यासाठी अनेक पर्याय दिले आहेत. त्या माध्यमातून तुम्ही एसएमएस, मिस्ड कॉल, ऑफिशिअल वेबसाईट आणि उमंग अॅपच्या माध्यमातून बॅलेन्स चेक करु शकता.
22.55 crore accounts have been credited with an interest of 8.50% for the FY 2020-21. @LabourMinistry @esichq @PIB_India @byadavbjp @Rameswar_Teli
— EPFO (@socialepfo) December 6, 2021
मोबाईलच्या SMS माध्यमातून चेक करा -
जर तुम्ही ही रक्कम मोबाईल एसएमएसच्या माध्यमातून चेक करणार असाल तर 7738299899 या नंबरवर EPFOHO UAN ENG असं टाईप करा आणि सेंड करा. यातील शेवटचे तीन अक्षर हे भाषेप्रमाणे टाईप करा आणि सेंड करा. त्यासाठी यूएएन वर रजिस्टर असलेल्या मोबाईल नंबरवरुन हा एसएमएस करावा लागणार आहे. ही सुविधा मराठी भाषेतही उपलब्ध आहे.
मिस्ड कॉलच्या माध्यमातून चेक करा -
ईएफपीओवर रजिस्टर असलेल्या मोबाईल नंबरवरून 011-22901406 या नंबरवर मिस्ड कॉल द्या. त्यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाईलवर बॅलेन्सचा मेसेज येईल. या व्यतिरिक्त Umang अॅप आणि ईएफपीओच्या ऑफिशिअर वेबसाईटवरही तुमच्या खात्यासंदर्भात माहिती मिळू शकेल.
EPFO ने 2020-21 या आर्थिक वर्षासाठी 8.5 टक्के व्याजदर कायम ठेवण्याचा निर्णय घेतला होता. हा व्याजदर गेल्या सात वर्षांतील सर्वात कमी आहे. गेल्या आर्थिक वर्षासाठी व्याज दर समान होता. 2019 मध्ये 8.65 टक्के व्याज ईपीएफवर मिळत होतं. त्याचप्रमाणे पूर्वी 2018 मध्ये 8.55 टक्के व्याज देण्यात आलं होतं. यानुसार मागील आर्थिक वर्ष 2019-20 मध्ये, केवायसीमध्ये अडथळा आल्यामुळे, अनेक लोकांना व्याज मिळवण्यासाठी 8-10 महिन्यांची दीर्घ प्रतीक्षा करावी लागली होती.
पीएफ म्हणजे काय?
तुम्ही ज्या संस्थेत काम करता त्या संस्थेच्या वतीने दरमहा EPFO खात्यात पैसे हस्तांतरित केले जातात. ही एक निश्चित रक्कम असते, जी तुमच्या पगारातून कापली जाते आणि पीएफ खात्यात जमा केली जाते. तुमची संस्था देखील या खात्यात समान रक्कम योगदान देते त्याला पीएफ म्हटलं जातं.