एक्स्प्लोर
20 वर्षीय तरुणीची आत्महत्या, भाजपच्या स्थानिक नेत्याला अटक
20 वर्षीय कॉलेजवयीन तरुणीनं गळफास घेऊन आत्महत्या केली. याचप्रकरणी भाजप युवा मोर्चाच्या अध्यक्षासह आणखी एका व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे.
बंगळुरु : कर्नाटकमधील चिकमंगळूर जिल्ह्यातील मुदिगेरे येथे एका 20 वर्षीय तरुणीनं आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी तेथील स्थानिक भाजप युवा मोर्चाच्या अध्यक्षला पोलिसांनी अटक केली आहे. तरुणीला धमकावणं आणि लव जिहादच्या नावाखाली तिची बदनामी करण्याच्या आरोपाखाली पोलिसांनी त्याला अटक केली.
मिळालेल्या माहितीनुसार, 20 वर्षीय कॉलेजवयीन तरुणीनं गळफास घेऊन आत्महत्या केली. याचप्रकरणी भाजप युवा मोर्चाचा अध्यक्ष अनिल याच्यासोबत आणखी एका व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांना तरुणीच्या घरातून एक सुसाइड नोट सापडली आहे. ज्यामध्ये तिने भाजप युवा मोर्चाच्या अध्यक्षासह पाच जणांना आपल्या आत्महत्येसाठी जबाबदार धरलं आहे. सतत धमकावून बदनाम करण्याचा प्रयत्न या लोकांकडून सुरु असल्याचा आरोप तरुणीनं सुसाइड नोटमध्ये केला आहे. दरम्यान, याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भारत
क्रिकेट
राजकारण
Advertisement