Agnipath Recruitment Scheme : भारतील सैन्य दलात (Indian Army) भरतीची इच्छा असणाऱ्या तरुणींसाठी खुशखबर आहे. केंद्र सरकारने नव्याने घोषणा केलेल्या अग्निपथ योजनेमध्ये तरुणींनाही संधी मिळणार आहे. अग्निवीर होण्याची तरुणींची इच्छा आता पूर्ण होणार आहे. अग्निपथ योजनेमध्ये 20 टक्के जागा तरुणींसाठी राखीव असणार आहेत. 


केंद्र सरकारच्या अग्निपथ योजनेला देशभरातून विरोध करण्यात येत आहे. परंतु, केंद्र सरकार अग्निपथ योजना राबवण्यावर ठाम आहे. लष्करात अग्निपथ योजनेनुसार भरती प्रक्रिया सुरूवातही झाली आहे. या योजनेमध्ये 2022 च्या पहिल्या बॅचमध्ये 20 टक्के जागा तरुणींसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत.






30 डिसेंबरपासून प्रशिक्षणाला सुरुवात
भारती वायुसेनेसाठी अग्निपथ योजनेअंतर्गत नोंदणी केलेल्या उमेदवारांची 24 जुलै ते 31 जुलै या दरम्यान ऑनलाइन परीक्षा घेतली जाईल. यानंतर  21 ऑगस्ट ते 28 ऑगस्ट दरम्यान शारीरिक चाचणी होईल. त्यापुढे 29 ऑगस्ट ते 8 नोव्हेंबरपर्यंत वैद्यकीय चाचणी होईल. यामध्ये पात्र ठरणाऱ्या उमेदवारांची यादी 1 डिसेंबर रोजी जारी करण्यात येईल. यानंतर 30 डिसेंबरपासून त्यांच्या प्रशिक्षणाला (Training) सुरुवात होईल.


अग्निवीरांसाठी 'या' सुविधा
अग्निवीरांना नियमित सैनिकांप्रमाणेच भत्ता मिळेल. सर्व अग्निवीरांना वर्षातून 30 दिवसांची सुट्टी मिळेल. प्रत्येक अग्निवीरला 48 लाख रुपयांचे विमा संरक्षण मिळेल. याशिवाय सेवेदरम्यान वीरगती आल्यास त्यांच्या कुटुंबीयांना सुमारे एक कोटी रुपयांची मदत दिली जाईल. अग्निवीरांना कॅन्टीन सुविधा देण्याची घोषणाही करण्यात आली आहे. यासोबतच चार वर्षांनंतर निवृत्त होणाऱ्या अग्निवीरांना अनेक सरकारी सेवांमध्ये आरक्षण आणि प्राधान्य देण्यात येणार असल्याचंही वायू दलाने सांगितलं आहे.


योजनेला जनतेचा विरोध, सरकार योजनेवर ठाम


केंद्र सरकारनं नव्याने लागू केलेल्या अग्निपथ योजनेला जनतेनं मोठा विरोध दर्शवला आहे. या योजनेच्या निषेधार्थ देशभरात विविध आंदोलनं ही करण्यात आली. तर काही ठिकाणी हिंसाचार उसळल्याचंही पाहायला मिळालं.


अग्निपथ योजनेविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका


लष्करातील भरतीसाठी अग्निपथ योजनेच्या विरोधात दाखल करण्यात आलेला अर्ज सर्वोच्च न्यायालयाने सुनावणीसाठी स्वीकारला आहे. पुढील आठवड्यात सुट्या संपल्यानंतर सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) या याचिकेवर सुनावणी होणार आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या