Digital India Week : डिजिटल इंडियामुळे भारतीयांचं जीवन सुखकर झालं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी गुजरातमध्ये डिजिटल इंडिया वीक कार्यक्रमाला उपस्थिती लावली. यावेळी या कार्यक्रमातील एक घटना समोर आला आहे. एका हरवलेल्या मुलीची दोन वर्षांनंतर आधार कार्डमुळे तिच्या कुटुंबासोबत भेट झाली. पंतप्रधान मोदी यांनी या कार्यक्रमाला हजेरी लावल्यावर तेथे उपस्थित एका मुलीनं तिची कहानी सांगितली. मुलीनं सांगितलं की, हरवल्यानंतर आधारकार्ड मुळेच दोन वर्षांनंतर तिची घरवापसी शक्य झाली. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.


गांधीनगर येथे आयोजित डिजिटल इंडिया वीक कार्यक्रमात एका मुलीने पंतप्रधानांना तिच्यासोबत घडलेली घटना सांगितली. तिनं सांगितलं की, हरवल्यामुळे कुटुंबापासून दोन वर्ष अनाथ आत्रमामध्ये राहिल्यानंतर आधारकार्डमुळे तिची पुन्हा तिच्या कुटुंबासोबत भेट झाली. 


मुलीनं पंतप्रधान मोदींना काय सांगितलं?
यावेळी मुलीनं पंतप्रधानांना सांगितलं की, आईसोबत नातेवाईकांकडे जात असताना रेल्वे स्टेशनवर ती हरवली. त्यानंतर एका अज्ञात व्यक्तीनं तिला अनाथ आश्रमामध्ये नेलं. ती दोन वर्ष अनाथ आश्रमात राहिली. त्यानंतर तिच्या बारावी बोर्डाच्या परीक्षेसाठी अधिकारी आधार कार्ड बनवण्यासाठी आल्यावर तिची खरी ओळख पटली.






आधार कार्ड अधिकाऱ्यांनी पूर्ण तपास करून याची माहिती अनाथ आश्रम प्रशासनाला दिली. त्यानंतर अनाथ आश्रमाने मुलीच्या कुटुंबियांनी शोधण्यात मदत केली. यामुळे मुलीची दोन वर्षानंतर पुन्हा तिच्या घरी परतली.


महत्त्वाच्या इतर बातम्या