Jammu Kashmir Earthquake : अंदमान-निकोबार (Andaman Nicobar) बेटावर आणि पोर्ट ब्लेअरमध्ये तीव्र भूकंपाचा झटका बसला आहे. या भूकंपाची तीव्रता 5.0 होती. याशिवाय जम्मू आणि काश्मीरमध्येही भूकंपाचे झटके जाणवले. येथील भूकंपाची तीव्रता तुलनेनं कमी होती. जम्मू आणि काश्मीरमधील भूकंपाची तीव्रता 3.2 होती. या भूकंपा दरम्यान कोणतीही जीवित किंवा वित्त हानी झाल्याची अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. यासह अफगाणिस्तानमध्येही पुन्हा भूकंपाचे हादरे बसले आहेत.


अंदमान-निकोबारमध्ये 5.0 तीव्रतेचा भूकंप
पोर्ट ब्लेअर आणि अंदमान निकोबारमध्ये सोमवारी 215 किलोमीटरपर्यंत भूकंपाचा झटका बसला. या भूकंपाची तीव्रता 5.0 इतकी होती. राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राने दिलेल्या माहितीनुसार, अंदमान-निकोबारमध्ये मंगळवारी सकाळी 5 वाजून 57 मिनिटांनी भूकंपाचा झटका बसला. 






पोर्ट ब्लेअरमध्ये रात्री 3 वाजता भूकंप
याशिवाय पोर्ट ब्लेअर येथे मंगळवारी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारातस भूकंपाचा धक्का बसला. या भूकंपाची तीव्रता 404 किलोमीटर होती. या भूकंपाचं केंद्र जमिनीपासून 44 किलोमीटर खोल होतं. 






जम्मू आणि काश्मीरमध्ये सोमवारी भूकंप
जम्मू आणि काश्मीरमध्ये सोमवारी म्हणजे एक दिवस आधी भूकंपाचा झटका बसला होता. डोडा जिल्ह्यामध्ये भूकंपाचे धक्के जाणवले होते. या भूकंपाची तीव्रता 3.2 इतकी होती. सोमवारी दुपारी 12 वाजून 12 मिनिटांनी भूकंपाचा झटका बसला. यामध्ये कोणतीही जीवित किंवा वित्त हानी झालेली नाही.