Jammu Kashmir : PM मोदींच्या दौऱ्यापूर्वी जम्मूमधून मोठी बातमी, दोन दहशतवादी ठार, एक जवान शहीद
Jammu Kashmir : जम्मू शहरातील सुंजवान कॅन्टोन्मेंट परिसरात पहाटे सुरक्षा दलांनी कारवाई सुरू केली, तेव्हा ही चकमक सुरू झाली.
Jammu Kashmir : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या दौऱ्याच्या दोन दिवस आधी जम्मूमध्ये लष्कराच्या आस्थापनाजवळ सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरूच आहे. सुरुवातीच्या गोळीबारात एक सुरक्षा अधिकारी ठार झाला आणि चार जण जखमी झाले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. मिळालेल्या माहितीनुसार, या चकमकीत दोन दहशतवादी मारले गेले. जम्मू शहरातील सुंजवान कॅन्टोन्मेंट परिसरात पहाटे सुरक्षा दलांनी कारवाई सुरू केली तेव्हा चकमक सुरू झाली. जम्मू शहरातील सुंजवान कॅन्टोन्मेंट परिसरात पहाटे सुरक्षा दलांनी कारवाई सुरू केली, तेव्हा ही चकमक सुरू झाली. दहशतवादी शहरात हल्ला करण्याची योजना आखत असल्याची माहिती त्यांच्याकडे असल्याचे पोलिसांनी सांगितले
दोन दहशतवादी ठार, सीआयएसएफच्या एका अधिकारीचा मृत्यू तर दोन जण जखमी
जम्मू आणि काश्मीरचे पोलीस प्रमुख दिलबाग सिंग यांनी सांगितले की, "सुंजवान चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले आहेत. सुंजवानमध्ये लपलेले दहशतवादी मोठ्या हल्ल्याची योजना आखत होते. सुरक्षा दलांना जास्तीत जास्त जीवितहानी करणे हा त्यांचा उद्देश होता."या चकमकीची माहिती देताना जम्मूचे अतिरिक्त पोलीस महासंचालक मुकेश सिंग म्हणाले, "आम्हाला माहिती मिळाली की दहशतवादी येथे लपून काही योजना आखत आहेत. आम्ही रात्रीच्या वेळी परिसराला वेढा घातला. सकाळी गोळीबार सुरू होता. ज्यामध्ये सुरक्षा दलाचा एक जवान शहीद झाला असून चार जण जखमी झाले आहेत. चकमक सुरू आहे." मात्र, सीआयएसएफच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, दहशतवाद्यांनी सकाळी सीआयएसएफच्या बसवर हल्ला केला. ज्यामध्ये 15 सैनिक होते. सीआयएसएफने प्रत्युत्तर देत दहशतवाद्यांना पळून जाण्यास भाग पाडले. या कारवाईत सीआयएसएफचा एक अधिकारी ठार झाला तर दोन जण जखमी झाले.
पंतप्रधान मोदींच्या जम्मू-काश्मीर दौऱ्यापूर्वी चकमक
पंतप्रधान मोदींच्या जम्मू-काश्मीर दौऱ्यापूर्वी ही चकमक झाली. पंतप्रधान मोदी रविवारी जम्मूला जाणार आहेत. येथे पीएम मोदी एका मोठ्या रॅलीला संबोधित करतील. ज्यात पल्ली गावात हजारो पंचायत सदस्य सहभागी होतील. त्यांच्या दौऱ्याच्या अगोदर येथे हाय अलर्ट ठेवण्यात आला असून सुरक्षा दलांकडून चोवीस तास गस्त घातली जात आहे. कलम 370 आणि 35A द्वारे जम्मू-काश्मीरला दिलेला विशेष दर्जा हटवल्यानंतर पंतप्रधान मोदींची ही पहिलीच राजकीय भेट आहे.