एक्स्प्लोर
हंदवाडामध्ये लष्कर-ए-तोयबाच्या दोन दहशतवाद्यांचा खात्मा
हंदवाडा (जम्मू काश्मीर) : जम्मू-काश्मीरच्या हंदवाडामधील वारीपोर परिसरात रविवारी दहशतवादी आणि सुरक्षा दल यांच्यात जोरदार चकमक झाली. या चकमकीत सुरक्षा दलाच्या गोळीबारात 'लष्कर ए तोयबा'चे दोन दहशतवादी ठार झाले.
दहशतवादी या परिसरात लपल्याची माहिती सुरक्षा दलाला मिळाली होती. ही माहिती मिळताच सुरक्षा दलाने या परिसराला घेराव घालून शोधमोहिम हाती घेतली.
सुरक्षा दलाने शोधमोहिम सुरू करताच लपलेल्या दहशतवाद्यांनी सुरक्षा दलाच्या दिशेने गोळीबार सुरू केला. सुरक्षा दलानेही त्याला जोरदार प्रत्युत्तर दिले. सुरक्षा दलाच्या गोळीबारात दोन दहशतवादी ठार झाले.
गुप्त माहितीच्या आधारे सुरक्षा यंत्रणांना हंदवाडा परिसरात दहशतवादी असल्याची माहिती मिळाली होती. माहिती मिळताच जवानांनी शोधमोहिम सुरु केली.
सैन्याच्या एका अधिकाऱ्याच्या माहितीनुसार, उत्तर काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यात सुरक्षा यंत्रणांसोबत चमकम झाली असून, यावेळी दहशतवाद्यांचे शस्त्र जप्त करण्यात आले आहेत. या भागात अद्यापही सैन्याकडून शोधमोहिम सुरु आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement