एक्स्प्लोर
नाव – हर्षित, वय – 16 वर्षे, शिक्षण – बारावी... पगार 12 लाख रुपये!
हरियाणातील बारावीत शिकणाऱ्या हर्षित शर्माने गगनभरारी घेतली आहे. वयाच्या 16 व्या वर्षीच हर्षितची गूगलमध्ये ग्राफिक डिझायनिंगसाठी निवड झाली आहे. इंटरनेट जायंट मानल्या जाणाऱ्या गूगलमध्ये काम करणाऱ्याचं स्वप्न असंख्य जणांचं असतं, पण हर्षितचं हेच स्वप्न सत्यात उतरलं आहे.
चंदीगड : हरियाणातील बारावीत शिकणाऱ्या हर्षित शर्माने गगनभरारी घेतली आहे. वयाच्या 16 व्या वर्षीच हर्षितची गूगलमध्ये ग्राफिक डिझायनिंगसाठी निवड झाली आहे. इंटरनेट जायंट मानल्या जाणाऱ्या गूगलमध्ये काम करणाऱ्याचं स्वप्न असंख्य जणांचं असतं, पण हर्षितचं हेच स्वप्न सत्यात उतरलं आहे.
हर्षितने हरियाणातील सरकारी मॉडेल सिनियर सेकेंडरी स्कूलमधून (GMSS) बारावीपर्यंतचं शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर आता हर्षित ऑगस्टमध्ये कॅलिफोर्नियाला रवाना होणार आहे. इंटरनेट जायंट गूगलमध्ये काम करण्यासाठी.
ग्राफिक डिझायनिंगमधील स्पेशल प्रोग्रामसाठी गूगलने हर्षितची निवड केली असून, गूगलकडूनच हर्षितला त्यासंबंधी प्रशिक्षण दिले जाणार आहे. विशेष म्हणजे प्रशिक्षणादरम्यान हर्षितला महिन्याकाठी 4 लाख रुपयांचा पगार मिळेल. तर प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर महिन्याकाठी 12 लाख रुपये पगार मिळेल.
हरियाणातील कुरुक्षेत्रमधील मथानाचा रहिवासी असलेला हर्षित इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी विषय घेऊन बारावी उत्तीर्ण झाला आहे.
हर्षितची निवड कशी झाली?
“मी कायमच ऑनलाईन जॉब शोधत असतो. त्यावेळी गूगलच्या जॉबसाठीही अर्ज केला होता आणि त्यासाठी ऑनलाईन मुलाखतही झाली. गेल्या अनेक वर्षांपासून ग्राफिक डिझाईनिंगमध्ये मला रस आहे. एक पोस्टर डिझाईन केलं, ज्याद्वारे माझी गूगलकडून निवड झाली.”, असे हर्षितने सांगितले.
पंतप्रधान डिजिटल इंडिया स्कीमअंतर्गत हर्षितला 7 हजार रुपयांचं बक्षीस मिळालं आहे. शिवाय, हर्षितच्या शाळेला 2016 मध्ये स्मार्ट स्कूलचा दर्जाही मिळाला आहे. हर्षितने त्याच्या शिक्षकांना तंत्रज्ञानासंबंधी अनेक उपक्रमांमध्ये मदत केली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बातम्या
नाशिक
महाराष्ट्र
Advertisement