एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
8 वर्षांपूर्वीच्या अपहरणकर्त्यांना मुंबईच्या 12 वर्षीय चिमुरडीने ओळखलं
मुंबई : वयाच्या चौथ्या वर्षी अपहरण करुन मुंबईत विकणाऱ्या दाम्पत्याला 12 वर्षांच्या चिमुरडीने ओळखलं आहे. आठ वर्षांपूर्वी यांनीच मध्य प्रदेशातून आपलं अपहरण करुन मुंबई आणलं, असं चिमुरडीने पोलिसांदेखत सांगितलं आहे. 'टाइम्स ऑफ इंडिया'ने यासंदर्भात वृत्त दिलं आहे.
आई-वडिलांपासून दुरावलेल्या लहानगीची तब्बल आठ वर्षांनी पुनर्भेट झाली आहे. शिवशंकर आणि गंगा सिसोदिया या दाम्पत्याने कसं आपल्याला फूस लावून पळवलं, हे अगदी स्पष्टपणे तिने सांगितलं. आरोपींचा चेहरा न विसरता तिने त्यांना ओळखल्याने पोलिसांनाही कौतुक वाटलं.
12 वर्षांच्या चिमुरडीने आपल्या वर्गमैत्रिणीला याबाबत सांगितल्यामुळे हा प्रकार उघडकीस आला. मध्य प्रदेशच्या सतनामध्ये बस स्थानकाजवळ आपल्या आईचं बांगड्यांचं दुकान होतं. तिथे खेळत असताना एका अनोळखी व्यक्तीने आपल्याला बिस्कीट देण्याचं आमिष दाखवलं आणि पळवून नेलं, असं तिने मैत्रिणीला सांगितलं.
मैत्रिणीने ही बाब तिच्या आईच्या कानावर घातल्यानंतर तिने राखी शर्मा नामक सामाजिक कार्यकर्तीला हा प्रकार सांगितला. त्यानंतर अंधेरीतील एमआयडीसी पोलिसात धाव घेतल्यानंतर चिमुरडीची चौकशी करण्यात आली.
मुलीच्या आईने आपण तिला 'कमला' नामक महिलेकडून दत्तक घेतल्याचा दावा केला आहे. कमला या महिलेने आपणच तिची आई असल्याचा दावा केल्याचंही मुलीच्या आईने सांगितलं. अपहरणकर्त्यांनी मात्र आपल्याविरुद्ध कोणतेही सबळ पुरावे नसल्याचा बचाव केला आहे. मुलगी अज्ञान असल्याने चेहऱ्यांमध्ये गैरसमज होऊ शकतात, असं त्यांचं म्हणणं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement