एक्स्प्लोर

महाराष्ट्रासह 11 राज्यांच्या निवडणुका लोकसभेसोबतच : सूत्र

‘वन नेशन, वन इलेक्शन’च्या दिशेने सरकार एक पाऊल पुढे टाकण्याच्या तयारीत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, आगामी लोकसभा निवडणुकीसोबत महाराष्ट्रासह 11 राज्यांच्या विधानसभा निवडणुका होऊ शकतात.

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात एकत्र निवडणुका घेण्याचं नेहमीच समर्थन केलं. आहे. ‘वन नेशन, वन इलेक्शन’च्या दिशेने सरकार एक पाऊल पुढे टाकण्याच्या तयारीत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, आगामी लोकसभा (मे 2019) निवडणुकीसोबत महाराष्ट्रासह 11 राज्यांच्या विधानसभा निवडणुका होऊ शकतात. ज्या 11 राज्यांच्या निवडणुका लोकसभेसोबत घेतल्या जाऊ शकतात, त्यासाठी घटनादुरुस्तीची गरज नाही. यासाठी निवडणूक आयोग, केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यात एकमत होणं गरजेचं आहे. लोकसभा निवडणुकीच्या सहा महिने अगोदर किंवा सहा महिने नंतर ज्या विधानसभांचा कार्यकाळ संपत आहे, त्या राज्यात निवडणुका होऊ शकतात. कोणत्या राज्यांची निवडणूक शक्य? राज्य                                  विधानसभेचा कार्यकाळ राजस्थान                            डिसेंबर 2018 छत्तीसगड                            डिसेंबर 2018 मध्य प्रदेश                           डिसेंबर 2018 सिक्कीम                               एप्रिल 2019 अरुणाचल प्रदेश                    एप्रिल 2019 तेलंगणा                              मे 2019 ओदिशा                              मे 2019 आंध्र प्रदेश                           मे 2019 लोकसभा सार्वत्रिक निवडणूक   मे 2019 हरियाणा                            सप्टेंबर 2019 महाराष्ट्र                              सप्टेंबर 2019 झारखंड                              नोव्हेंबर 2019 दिल्ली                                जानेवारी 2020 अमित शाहांचं लॉ कमिशनला पत्र देशात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकी एकत्र घेण्याचं समर्थन करत भाजपाध्यक्ष अमित शाह यांनी यामुळे खर्चावर लगाम बसेल, असं म्हटलं आहे. शिवाय संघीय स्वरुप आणखी मजबूत होईल, असं पत्र अमित शाहांनी लॉ कमिशनला पाठवलं आहे. एकत्र निवडणुका घेणं देशाच्या संघीय स्वरुपाविरोधात आहे हा आरोप आधारहीन आहे. एकत्र निवडणुका घेतल्यामुळे संघीय स्वरुप आणखी बळकट होईल, असं अमित शाह यांचं म्हणणं आहे. एकत्र निवडणुकांचा विरोधा हा राजकीय आहे, असं त्यांनी लॉ कमिशनला लिहिलेल्या आठ पानी पत्रामध्ये म्हटलं आहे. एकत्र निवडणुका घेण्यासाठी लॉ कमिशन सध्या विचार करत आहे. आपल्या अहवालाला अंतिम रुप देण्यापूर्वी यावर राजकीय पक्षांचं मतही जाणून घेतलं जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही एक देश, एक निवडणूक याचं समर्थन केलेलं आहे. या मुद्द्यावर भाजपच्या शिष्टमंडळाने लॉ कमिशनची भेट घेतली. शिष्टमंडळामध्ये केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी, भूपेंद्र यादव आणि अनिल बलूनी यांचा सहभाग होता. भाजप लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र घेण्याच्या बाजूने आहे. सततच्या निवडणूक प्रक्रियेचा विकासकामांवर परिणाम होतो. त्यामुळे लोकप्रतिनिधी कायद्यात आवश्यक संशोधन करावं आणि 2024 पर्यंत सर्वांच्या सहमतीने हे संशोधन पारीत करण्यात यावं, असं भाजपचं म्हणणं आहे. एकत्र निवडणुकांचा उद्देश काय? निवडणुकांच्या प्रक्रियेमुळे देशातील कोणत्या ना कोणत्या भागात नेहमीच आचारसंहिता लागू असते. प्रचारासाठी मंत्र्यांना जावं लागतं आणि स्वाभाविकपणे याचा परिणाम विकासकामांवर होतो. शिवाय सततच्या निवडणुकांमुळे आर्थिक खर्चही मोठ्या प्रमाणात होतो. अनेक राजकीय पक्षांनी एकत्र निवडणुका घेण्यासाठी समर्थन दिलेलं आहे. लॉ कमिशनकडून यावर सध्या काम सुरु आहे.

महत्त्वाच्या बातम्या

RBI चा मोठा निर्णय! बँकांसाठी नवीन नियम लागू, तुमच्या खात्यावर परिणाम होणार का? जाणून घ्या सविस्तर माहिती 
RBI चा मोठा निर्णय! बँकांसाठी नवीन नियम लागू, तुमच्या खात्यावर परिणाम होणार का? जाणून घ्या सविस्तर माहिती 
Abhijeet Dipke : हातामध्ये तिरंगा घेऊन निघालेल्या अभिजीत दिपकेंना ताब्यात घेतलं, दिल्लीमध्ये CJP आंदोलनाआधीच मोठा राडा
हातामध्ये तिरंगा घेऊन निघालेल्या अभिजीत दिपकेंना ताब्यात घेतलं, दिल्लीमध्ये CJP आंदोलनाआधीच मोठा राडा
Sanjay Raut: सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्यावरील टिप्पणी प्रकरणी संजय राऊतांना सुप्रीम कोर्टाची नोटीस; नेमकं प्रकरण आहे तरी काय?
सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्यावरील टिप्पणी प्रकरणी संजय राऊतांना सुप्रीम कोर्टाची नोटीस; नेमकं प्रकरण आहे तरी काय?
Asaduddin Owaisi On Elon Musk : मोदींवर टीका करणाऱ्या इलॉन मस्कला ओवैसींचा इशारा, परदेशी व्यक्तीने पंतप्रधानांवर बोललेलं ऐकून घेणार नाही...
मोदींवर टीका करणाऱ्या इलॉन मस्कला ओवैसींचा इशारा, परदेशी व्यक्तीने पंतप्रधानांवर बोललेलं ऐकून घेणार नाही...

व्हिडीओ

Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?
Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी! MPSC परीक्षा पेपरफुटी प्रकरण, चौकशीसाठी निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली आयोगाची स्थापना
मोठी बातमी! MPSC परीक्षा पेपरफुटी प्रकरण, चौकशीसाठी निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली आयोगाची स्थापना
Sanjay Raut: सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्यावरील टिप्पणी प्रकरणी संजय राऊतांना सुप्रीम कोर्टाची नोटीस; नेमकं प्रकरण आहे तरी काय?
सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्यावरील टिप्पणी प्रकरणी संजय राऊतांना सुप्रीम कोर्टाची नोटीस; नेमकं प्रकरण आहे तरी काय?
MPSC New Chairman : मोठी बातमी, MPSC अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार सतीश वाघोले यांच्याकडे, विवेक भीमनवार रजेवर जाताच निर्णय
मोठी बातमी, MPSC अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार सतीश वाघोले यांच्याकडे, भीमनवार रजेवर जाताच निर्णय
Asaduddin Owaisi On Elon Musk : मोदींवर टीका करणाऱ्या इलॉन मस्कला ओवैसींचा इशारा, परदेशी व्यक्तीने पंतप्रधानांवर बोललेलं ऐकून घेणार नाही...
मोदींवर टीका करणाऱ्या इलॉन मस्कला ओवैसींचा इशारा, परदेशी व्यक्तीने पंतप्रधानांवर बोललेलं ऐकून घेणार नाही...
Gopichand Padalkar: 'ही लढाई केवळ एका खुर्चीसाठी किंवा संचालक पदासाठी नाही, तर..' सुप्रीम कोर्टात सांगली जिल्हा बँकेसाठी अर्ज वैध होताच गोपीचंद पडळकर म्हणाले..
'ही लढाई केवळ एका खुर्चीसाठी किंवा संचालक पदासाठी नाही, तर..' सुप्रीम कोर्टात सांगली जिल्हा बँकेसाठी अर्ज वैध होताच गोपीचंद पडळकर म्हणाले..
Tesla Roadster Car Elon Musk: एलन मस्कच्या टेस्लाची हवेत उडणारी कार पाहून चाट पडाल; चार्जिंग, स्पीड, स्पेसशीपसारखा लूक, काय आहेत 'रोडस्टर'ची वैशिष्ट्ये
एलन मस्कच्या टेस्लाची हवेत उडणारी कार पाहून चाट पडाल; चार्जिंग, स्पीड, स्पेसशीपसारखा लूक, काय आहेत 'रोडस्टर'ची वैशिष्ट्ये
Ramdas Kadam On Tejas Thackeray : तेजस ठाकरेंनी राजकारणात यावं, मात्र आदित्यने जसं नाव खराब केलं तसं करू नये; रामदास कदमांकडून वडिलकीचा सल्ला, म्हणाले, 'ते आमच्या मुलांसारखेच...'
तेजस ठाकरेंनी राजकारणात यावं, मात्र आदित्यने जसं नाव खराब केलं तसं करू नये; रामदास कदमांकडून वडिलकीचा सल्ला, म्हणाले, 'ते आमच्या मुलांसारखेच...'
Sandeep Deshpande : तुम्ही सत्तेत असताना फेल ठरलाय, आम्हाला तुमची सत्ता नकोय, आम्ही मतदानाद्वारे बदल करणार, संदीप देशपांडेंचं भाजपला प्रत्युत्तर
तुम्ही अपयशी ठरलाय,आम्हाला तुमची सत्ता नकोय, आम्ही मतदानाद्वारे बदल करणार, संदीप देशपांडेंचं भाजपला प्रत्युत्तर
Embed widget