एक्स्प्लोर

Horoscope Today 23 September 2024 : आठवड्याचा पहिला दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today 23 September 2024 : सर्व राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या...

Horoscope Today 23 September 2024 : आजचा दिवस काही लोकांसाठी चांगले, तर काहींसाठी वाईट परिणाम आणू शकतो. आज तुमचे ग्रह तुमच्यासाठी अनुकूल आहेत की नाही? आज तुम्हाला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागेल किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात? सर्व 12 राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.

मेष (Aries Today Horoscope)

नोकरी (Job) - आजचा दिवस चांगला जाईल. नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं झालं तर, कामाच्या ठिकाणी तुमच्या प्रयत्नांमुळे तुम्हाला तुमच्या कामात यश मिळेल. काही कामांमध्ये आळस देखील दिसून येईल. 

व्यवसाय (Business) - व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं तर, दुग्धजन्य पदार्थांचा आणि दैनंदिन गरजा असलेल्या गोष्टींचा व्यवसाय असणाऱ्या व्यावसायिकांना चांगला नफा मिळण्याची दाट शक्यता आहे.

विद्यार्थी (Student) - विद्यार्थ्यांनी आपली पुस्तकं, नोट्स आणि इतर साहित्य अतिशय काळजीपूर्वक जपून ठेवावं, हरवण्याची शक्यता संभवते.

आरोग्य (Health) - तुमच्या आरोग्याबद्दल बोलायचं झालं तर, ज्या लोकांना थायरॉईडची समस्या आहे त्यांनी सावध राहून त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी नियमितपणे औषधं घेणं आवश्यक आहे.

वृषभ (Taurus Today Horoscope)

नोकरी (Job) - जोपर्यंत तुम्ही कामाला सुरुवात करत नाही तोपर्यंत कामावर कोणाचा सल्ला घेणं तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार नाही. सध्याची परिस्थिती लक्षात घेता नोकरी करणाऱ्या व्यक्तीला पूर्वनियोजित कामात बदल करावे लागतील.

व्यवसाय (Business) - व्यावसायिकांसाठी आजचा दिवस चांगला असेल. आज तुमची एखादी डील फायनल होऊ शकते.

विद्यार्थी (Student) - तुमची इच्छा नसतानाही आज तुम्हाला प्रवास करावा लागू शकतो. विद्यार्थी कॅम्पस प्लेसमेंटचा भाग बनू शकणार नाहीत.

आरोग्य (Health) - हाय कोलेस्ट्रॉल असलेल्या रुग्णांनी त्यांच्या आरोग्याबद्दल सावधगिरी बाळगली पाहिजे. 

मिथुन (Gemini Today Horoscope)

नोकरी (Job) - बँकिंग क्षेत्राशी संबंधित नोकरदार वर्गासाठी दिवस चांगला असेल. नोकरदारांना नोकरीत बढती मिळण्याची दाट शक्यता आहे.

व्यवसाय (Business) - तुमच्या व्यवसायात नवीन ग्राहक जोडण्यासाठी तुम्ही डिजिटल जाहिरातींची मदत घ्याल. कामात तुमची कार्यक्षमता तुम्हाला नवीन उंचीवर घेऊन जाईल.

विद्यार्थी (Student) - उच्च शिक्षणासाठी प्रयत्नशील असलेल्यांना चांगली बातमी मिळण्याची दाट शक्यता आहे.

आरोग्य (Health) - आज काही कामामुळे तुम्हाला इतका थकवा जाणवेल की तुम्हाला अस्वस्थ वाटू लागेल.

कर्क रास (Cancer Today Horoscope)

नोकरी (Job) - तुमचे अधिकारी तुमच्या कामावर आनंदी राहतील, तुमचा दिवस खूप आनंददायी जाईल.

व्यवसाय (Business) - तुमच्या जोडीदारासोबत व्यवसायाशी संबंधित अनेक मोठे निर्णय घेऊ शकता.   

तरुण (Youth) - तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत कुठेतरी बाहेर जाऊ शकता.

आरोग्य (Health) - वाहन चालवताना जरा सावधगिरी बाळगा अन्यथा अपघात होऊ शकतो. घरातील लहान मुलांच्या आरोग्याबाबत निष्काळजी राहू नका अन्यथा लहान मुलांचे आजार वाढू शकतात. 

सिंह रास (Leo Today Horoscope) 

नोकरी (Job) - तुम्ही तुमच्या कामाच्या ठिकाणी तुमच्या कनिष्ठांच्या चुका माफ करा, त्यांच्या चुका वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत नेऊ नका, तर तुमच्या कर्मचाऱ्यांना समजावून सांगून काम वेळेत पूर्ण करा.

व्यवसाय (Business) - व्यवसायात प्रगती होऊ शकते. तुमच्या मेहनतीनुसार तुमच्या व्यवसायात बरीच प्रगती होऊ शकते. ज्यामध्ये तुम्हाला आर्थिक लाभ मिळू शकतो.

तरुण (Youth) - शेअर मार्केट किंवा सट्टा बाजारात पैसे गुंतवले असतील तर  तुम्हाला त्याचे फायदे मिळू शकतात.  कुटुंबातील सदस्यांमध्ये कोणत्याही प्रकारचा वाद सुरू असेल, तर तो वाद उद्या संपुष्टात येईल.

आरोग्य (Health) - खांदे किंवा पाठदुखीची समस्या उद्या तुम्हाला खूप त्रास देऊ शकते. तुम्ही तुमच्या डॉक्टरांकडून योग्य तपासणी करून घ्या. तुम्हाला लवकरच आराम मिळेल.

कन्या रास (Virgo Today Horoscope)  

नोकरी (Job) - तुमच्या कार्यक्षेत्रात खूप चांगले होईल.

व्यवसाय (Business) - तुमच्या व्यवसायाशी संबंधित काही गोष्टी अंमलात आणाव्या लागतील.  तुम्हाला योग्य निर्णयाचा फायदा होऊ शकतो, अन्यथा तुम्हाला नंतर पश्चात्ताप करावा लागू शकतो.

तरुण (Youth) - आयुष्यात यश मिळविण्यासाठी खूप कष्ट करावे लागतील. उद्या, तुमचे भाऊ आणि मित्र यांच्या मदतीने तुम्ही तुमची काही जुनी प्रलंबित कामे पूर्ण करू शकाल, ज्यामुळे तुम्हाला खूप समाधान मिळेल.

आरोग्य (Health) - आरोग्य पूर्णपणे तंदुरुस्त राहील. तुम्हाला कोणत्याही प्रकारचा शारीरिक त्रास होणार नाही, जर तुम्ही उच्च रक्तदाब किंवा मधुमेहाचे रुग्ण असाल तर तुम्ही तुमची औषधे वेळेवर घेत रहा. वेळोवेळी तुमची तपासणी करून घ्या.

तूळ (Libra Today Horoscope) 

नोकरी (Job) - आजचा दिवस थोडा त्रासदायक ठरू शकतो. नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं झालं तर, तुम्हाला कामाच्या ठिकाणी काही समस्यांना सामोरं जावं लागेल. दुपारनंतर परिस्थिती निवळेल. आज तुम्हाला एखाद्या मोठ्या कंपनीकडून नोकरीची ऑफर मिळू शकते, तुम्ही तुमची नोकरी बदलण्याचा विचार करू शकता. नोकरीत सहकाऱ्यांमध्ये स्पर्धा वाढू शकते.

व्यवसाय (Business) - व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं झालं तर, आज शुक्ल योग, ब्रह्मयोग तयार झाल्यामुळे तुम्हाला व्यवसायात चांगले परिणाम मिळतील, तुम्ही नवीन ठिकाणी आऊटलेट उघडण्याचा विचार करू शकता. तुमच्या उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे.

विद्यार्थी (Student) - वैद्यकीय क्षेत्रातील विद्यार्थ्यांना भविष्यात त्यांच्या प्रयत्नांचं चांगलं फळ मिळेल. तुम्ही अभ्यासाकडे अधिक लक्ष द्यावं.

आरोग्य (Health) - तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं झालं तर, आज आरोग्याबाबत सावध राहा, आरोग्याची काळजी घ्या. तुमच्या दैनंदिन दिनचर्येत काही बदल करणं तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल.

वृश्चिक ( Scorpio Today Horoscope)  

नोकरी (Job) - आजचा दिवस खूप चांगला जाईल. नोकरदार लोकांबद्दल बोलायचं तर, आज तुम्हाला तुमच्या ऑफिसमध्ये प्रगतीच्या चांगल्या संधी मिळू शकतात. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठ तुम्हाला काही कामामध्ये मदत करतील.

व्यवसाय (Business) - व्यवसायाशी संबंधित लोकांना त्यांच्या क्षमतेवर विश्वास ठेवावा लागेल. जर व्यावसायिक कर्ज घेण्याचा विचार करत असतील तर ते घेऊ शकतात, रोजगाराशी संबंधित कर्ज अधिक चांगलं ठरेल. ग्रहांची स्थिती पाहता संध्याकाळची वेळ व्यापारी वर्गासाठी संमिश्र असणार आहे. तुम्ही ना नफा ना तोटा अशा स्थितीत असाल.

विद्यार्थी (Student) - विद्यार्थ्यांनी स्वयंअध्ययनावर लक्ष केंद्रित करणं आवश्यक आहे. यासोबत नोट्सही बनवा. स्पोर्ट पर्सन आज त्यांच्या खेळात कठोर मेहनत घेतील.

आरोग्य (Health) - आज तुमचं आरोग्य अधिक चांगलं राहील. तुम्हाला जास्त चिंता करायची गरज नाही.

धनु (Sagittarius Today Horoscope)

नोकरी (Job) - आजचा दिवस चांगला जाईल. नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलताना, आज कामावर पूर्ण लक्ष केंद्रित करून काम केल्यास तुमचं काम लवकर पूर्ण होऊ शकतं. कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाबद्दल एखादा व्यक्ती शंका घेऊ शकतो.

व्यवसाय (Business) - व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं झालं तर, व्यवसायाचा विस्तार करण्याच्या उद्देशाने कर्ज घेणं व्यावसायिकासाठी अजिबात उचित नाही, कारण कर्जाचा भविष्यावर परिणाम होईल आणि तुमच्या खिशातून अधिकचा पैसा जाईल, यामुळे तुमचा व्यवसाय अडचणीत येईल. शेअर मार्केटमध्ये हुशारीने गुंतवणूक करा.

विद्यार्थी (Student) - तुम्ही अभ्यासात जास्त लक्ष दिलं पाहिजे, अन्यथा तुम्हाला परीक्षेत कमी गुण मिळतील आणि आईवडिलांकडून तुम्हाला फटकारलं जाऊ शकतं.

आरोग्य (Health) - तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं झालं तर, तुमच्या खाण्याच्या सवयींबद्दल काळजी घ्या, अन्यथा अपचनाची समस्या उद्भवू शकते.

मकर (Capricorn Today Horoscope)

नोकरी (Job) - आजचा दिवस चांगला जाईल. नोकरदार लोकांबद्दल बोलायचं तर, शुक्ल, ब्रह्मयोग बनल्याने तुम्ही कामाच्या ठिकाणी एम्प्लॉयी ऑफ द मंथच्या शर्यतीत अव्वल स्थानावर असाल. नोकरदारांसाठी आजचा दिवस चांगला आहे.

व्यवसाय (Business) - व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं तर, व्यावसायिक आज सर्व समस्यांवर मात करून पुढे जातील. व्यावसायिक लोकांना आज एखादा नवीन भागीदार मिळू शकतो.

विद्यार्थी (Student) - विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस आळशीपणाने भरलेला असेल. तुम्हाला तुमच्या करिअरची काळजी वाटू शकते, त्यामुळे तुम्हालाही अडकल्यासारखं वाटू शकतं.

आरोग्य (Health) - तुमच्या तब्येतीबद्दल बोलताना, तुमचं वजन खूप वाढत असेल तर ते कमी करण्यासाठी तुम्ही मॉर्निंग वॉक करा आणि तुमची जीवनशैली सुधारण्यासाठी योगा करून पाहिल्यास चांगलं होईल. 

कुंभ (Aquarius Today Horoscope)

नोकरी (Job) - नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं तर, कामाच्या ठिकाणी तुमच्यावरील जबाबदाऱ्या वाढू शकतात. नोकरदार लोकांनी बॉसच्या इशाऱ्यावर काम करण्यास तयार रहावं, तुमचा संपूर्ण दिवस बॉसच्या इशाऱ्यावर नाचण्यात जाणार आहे.

व्यवसाय (Business) - व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं तर, व्यावसायिकांना व्यवसायात काही चांगल्या संधी मिळू शकतात. व्यावसायिकाला चांगला नफा मिळण्याची दाट शक्यता आहे. आज तुमच्याशी नवीन ग्राहक जोडले जातील.

कौटुंबिक (Family) - आज तुमच्या घरात पाहुण्यांची ये-जा असेल. तुम्ही सर्वांनी एकत्र बसून वेळ घालवा.

आरोग्य (Health) - तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं तर, तुम्ही तुमच्या तब्येतीची थोडी काळजी घ्यावी, फूड पॉयझनिंगची समस्या तुम्हाला भेडसावू शकते, त्यामुळे तुम्हाला खूप त्रासाला सामोरं जावं लागू शकतं. अगदी थोडीशी समस्या असल्यास डॉक्टरांकडे जा, तुम्हाला नक्कीच आराम मिळेल. 

मीन (Pisces Today Horoscope)

नोकरी (Job) - जर आपण नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोललो तर, कामाच्या ठिकाणी तुमचे वरिष्ठ, बॉस आणि टीम मॅनेजमेंटकडून तुमच्या कामाचं कौतुक होईल. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना आज ऑफिसमध्ये मीटिंग अटेंड करावी लागेल.

व्यवसाय (Business) - व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठीही दिवस चांगला राहील. व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं तर, आज व्यवसायात काही अडचणी येऊ शकतात, पण तुम्ही त्या सहज सोडवाल. तुम्ही व्यवसायात गुंतवणूक करण्याची योजना आखू शकता. आज तुम्हाला पैशाशी संबंधित चांगली बातमी मिळू शकते.

विद्यार्थी (Student) - विद्यार्थ्यांबद्दल सांगायचं तर, विद्यार्थ्यांनी आज शिक्षकांचा सल्ला घ्यावा. त्यांना काहीतरी नवीन शिकायला मिळेल, जे त्यांच्या भविष्यात उपयोगी पडेल.

आरोग्य (Health) - तुमच्या तब्येतीबद्दल बोलायचं झालं तर, आज तुम्हाला कोणतीच समस्या जाणवणार नाही. आरोग्य सुधारल्याने कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाला गती मिळेल.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 

हेही वाचा :

Numerology : प्रचंड गर्विष्ठ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; स्वत:लाच समजतात शहाणे, दुसऱ्यांना कमी लेखण्यात सर्वात पुढे

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Malegaon Bajar Samiti :  विधानसभेपाठोपाठ दादा भुसेंचा अद्वय हिरेंना मोठा धक्का; मालेगाव बाजार समितीतील सत्ता खेचली!
विधानसभेपाठोपाठ दादा भुसेंचा अद्वय हिरेंना मोठा धक्का; मालेगाव बाजार समितीतील सत्ता खेचली!
Nashik Encroachment : कुंभ नगरीला अतिक्रमणाचा विळखा, महापालिकेच्या मोहिमेनंतरही परिस्थिती जैसे थे;  नाशिककरांची सुटका कधी?
कुंभ नगरीला अतिक्रमणाचा विळखा, महापालिकेच्या मोहिमेनंतरही परिस्थिती जैसे थे; नाशिककरांची सुटका कधी?
धक्कादायक! पुण्यात स्टील कंपनीच्या मालकावर दिवसाढवळ्या गोळीबार; दुचाकीवरुन आले अन् निघून गेले
धक्कादायक! पुण्यात स्टील कंपनीच्या मालकावर दिवसाढवळ्या गोळीबार; दुचाकीवरुन आले अन् निघून गेले
जिल्ह्यात बीडची लॉबी काम करतेय, मंत्री नितेश राणे संतापले; पत्रकार परिषदेतून थेट इशारा, गाठ माझ्याशी
जिल्ह्यात बीडची लॉबी काम करतेय, मंत्री नितेश राणे संतापले; पत्रकार परिषदेतून थेट इशारा, गाठ माझ्याशी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Eknath Shinde On Naraji : पालकमंत्रिपदाबाबत अपेक्षा ठेवण्यात वावगं काय? नाराजीच्या चर्चांवर एकनाथ शिंदे स्पष्टच बोलले..Mumbai High Court On Akshay Shinde : माझा मुलगा निर्दोष होता..अक्षय शिंदेंच्या आईची प्रतिक्रियाABP Majha Marathi News Headlines 4PM TOP Headlines 04 PM 20 January 2025Rahul shewale On MVA : ठाकरेंच्या शिवसेनेचे 15 आमदार आणि काँग्रेसचे 10 आमदार शिवसेनेच्या संपर्कात-राहुल शेवाळे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Malegaon Bajar Samiti :  विधानसभेपाठोपाठ दादा भुसेंचा अद्वय हिरेंना मोठा धक्का; मालेगाव बाजार समितीतील सत्ता खेचली!
विधानसभेपाठोपाठ दादा भुसेंचा अद्वय हिरेंना मोठा धक्का; मालेगाव बाजार समितीतील सत्ता खेचली!
Nashik Encroachment : कुंभ नगरीला अतिक्रमणाचा विळखा, महापालिकेच्या मोहिमेनंतरही परिस्थिती जैसे थे;  नाशिककरांची सुटका कधी?
कुंभ नगरीला अतिक्रमणाचा विळखा, महापालिकेच्या मोहिमेनंतरही परिस्थिती जैसे थे; नाशिककरांची सुटका कधी?
धक्कादायक! पुण्यात स्टील कंपनीच्या मालकावर दिवसाढवळ्या गोळीबार; दुचाकीवरुन आले अन् निघून गेले
धक्कादायक! पुण्यात स्टील कंपनीच्या मालकावर दिवसाढवळ्या गोळीबार; दुचाकीवरुन आले अन् निघून गेले
जिल्ह्यात बीडची लॉबी काम करतेय, मंत्री नितेश राणे संतापले; पत्रकार परिषदेतून थेट इशारा, गाठ माझ्याशी
जिल्ह्यात बीडची लॉबी काम करतेय, मंत्री नितेश राणे संतापले; पत्रकार परिषदेतून थेट इशारा, गाठ माझ्याशी
युवक काँग्रेसच्या 60 पदाधिकाऱ्यांची उचलबांगडी, पक्षातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर; वरिष्ठ नेत्यांपर्यंत वादाची ठिणगी?
युवक काँग्रेसच्या 60 पदाधिकाऱ्यांची उचलबांगडी, पक्षातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर; वरिष्ठ नेत्यांपर्यंत वादाची ठिणगी?
Kolkata Rape Case : कोलकाता बलात्कार प्रकरणातील 'राक्षसा'ला जन्मठेप, ड्युटीवर असलेल्या महिला डॉक्टरची केली होती हत्या  
कोलकाता बलात्कार प्रकरणातील 'राक्षसा'ला जन्मठेप, ड्युटीवर असलेल्या महिला डॉक्टरची केली होती हत्या  
राजकीय अस्त झाला तरी चालेल पण आम्ही तटकरे फॅमिलीला स्वीकारणार नाही, शिंदे गटाच्या आमदाराचा हल्लाबोल
राजकीय अस्त झाला तरी चालेल पण आम्ही तटकरे फॅमिलीला स्वीकारणार नाही, शिंदे गटाच्या आमदाराचा हल्लाबोल
Jalgaon Crime : माझ्या लेकराला मारलं, त्यांना फाशीचीच शिक्षा व्हावी, मुकेशच्या आईने फोडला टाहो; पोलिसांवरही गंभीर आरोप
माझ्या लेकराला मारलं, त्यांना फाशीचीच शिक्षा व्हावी, मुकेशच्या आईने फोडला टाहो; पोलिसांवरही गंभीर आरोप
Embed widget