एक्स्प्लोर

Hingoli News: शिवसेनेच्या आमदाराकडून हिंगोलीतील शस्त्रक्रियेनंतर जमिनीवर झोपवलेल्या डॉक्टरांची पाठराखण; म्हणाले, 'डॉक्टर अतिशय कर्तव्यदक्ष...'

Hingoli News: शिवसेनेच्या आमदाराकडून हिंगोलीतील शस्त्रक्रियेनंतर जमिनीवर झोपवलेल्या डॉक्टरांची पाठराखण करण्यात आली आहे.

हिंगोली: कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रिया केल्यानंतर महिला रुग्णांना जमिनीवर गादी टाकून झोपले होते. या प्रकरणात राजकीय आरोप प्रत्यारोप होत असताना कळमनुरी मतदारसंघाचे आमदार संतोष बांगर यांनी सुद्धा रुग्णालयाला भेट दिली आहे. यावेळी त्यांनी डॉक्टरांची पाठराखण केल्याचं दिसून आलं आहे. तर दुसरीकडे हिंगोलीत शस्त्रक्रिया झालेल्या महिलांना जमिनीवर झोपवल्याने झालेल्या त्रासाच्या घटनेच्या चौकशीचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले असून तत्काळ सुविधा उपलब्ध करून देण्यास सांगितले आहे. यावरून आता अनेक राजकीय प्रतिक्रिया समोर येत आहेत. 

एबीपी माझाशी बोलताना शिवसेना शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांनी डॉक्टरांची पाठराखण केली आहे. आखाडा बाळापूर ग्रामीण रुग्णालयातील ज्या बातम्या येत आहेत हे खरंच चुकीच्या आहेत. येथील डॉक्टर अतिशय कर्तव्यदक्ष आहेत. खूप चांगलं काम या दवाखान्यात होत असतं. हिमायतनगर हदगाव या भागातील पेशंट आमच्याकडे येत असतात आणि इथे ट्रीटमेंट घेऊन जातात. त्यामुळे येथील सीएस येथील डॉक्टर त्याचबरोबर सर्व स्टॉप अतिशय चांगला आहे, रुग्णांना आवश्यक ट्रीटमेंट देत असतात. 120 रुग्णांचे ऑपरेशन पार पडले आहेत. त्यामध्ये 43 ऑपरेशन हे एक्स्ट्राचे ऑपरेशन झाले आहेत. कुटुंब नियोजनच्या ऑपरेशनसाठी आम्ही स्वतः मेडिकल अधिकाऱ्यांना सतत फोन करत असतो. आमच्याकडे बेड कमी आहेत. तर त्या ठिकाणी हॉल साफ करून त्या ठिकाणी गाद्या टाकत तिथे पेशंटला ठेवलं होतं.

या प्रकरणात कुठल्याही प्रकारचे कारवाईचं काम नाही. जे काम डॉक्टरांनी केलेलं आहे, ते खरंच चांगलं काम आहे. तिथे मोठा काही विषय नाही. तिथे फक्त कॉट कमी होते. ते पेशंट ज्या ठिकाणी होते ते अतिशय चांगल्या पद्धतीने स्वच्छ करून ठेवलं होतं. मी मेडिकल अधिकाऱ्यांना सांगून ठेवले तुम्हाला काय करायचे ते करा. या ठिकाणी डॉक्टरांचा काहीही चुकलेलं नाही असंही आमदार संतोष बांगर यांनी म्हटलं आहे. 

नेमकं काय आहे प्रकरण?

हिंगोली जिल्ह्यातील आखाडा बाळापूर ग्रामीण रुग्णालयात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शस्त्रक्रिया झाल्यानंतर 43 महिलांना भर थंडीत जमिनीवरती झोपवण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया झाल्यानंतर या महिलांना थंडीत जमिनीवर ती झोपवल्याची वेळ आली आहे शस्त्रक्रिया नंतर झोपण्यासाठी रुग्णालयात कॉट उपलब्ध नसल्याने महिलांना जमिनीवर झोपण्याची वेळ आली आहे.

काल शुक्रवारी महिलांवरती कुटुंब नियोजनाचे शस्त्रक्रिया पार पडली. त्यानंतर त्यांना जमिनीवरती झोपण्याची वेळ आली आहे नागरिकांनी याबाबत आरोग्य यंत्रणांवर आपला रोष व्यक्त केला आहे. त्याचबरोबर ही शस्त्रक्रिया पार पडल्यानंतर महिलांच्या स्वच्छतेबाबत देखील काळजी घेतली गेली पाहिजे ती घेतली जात नसल्याचा देखील यातून समोर येत आहे. याप्रकरणी रुग्णालयावर आणि संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी आता केली जात आहे.

About the author माधव दिपके

माधव दिपके
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Kerala Government Formation: केरळमध्ये मुख्यमंत्रीपदाबाबत अनिश्चितता अजूनही कायम; काँग्रेसने दावेदारांचे पोस्टर हटवले, आमदारांच्या मनात कोणाला पसंती?
केरळमध्ये मुख्यमंत्रीपदाबाबत अनिश्चितता अजूनही कायम; काँग्रेसने दावेदारांचे पोस्टर हटवले, आमदारांच्या मनात कोणाला पसंती?
किम जोंग उनसाठी उत्तर कोरियाची संविधानात आणि अण्वस्त्र धोरणात जगाला धडकी भरवणारी दुरुस्ती; ' जर देशाच्या नेत्याचं बरं वाईट झालं तर थेट...' इराणपासून घेतला धडा
किम जोंग उनसाठी उत्तर कोरियाची संविधानात आणि अण्वस्त्र धोरणात जगाला धडकी भरवणारी दुरुस्ती; ' जर देशाच्या नेत्याचं बरं वाईट झालं तर थेट...' इराणपासून घेतला धडा
मोठी बातमी! वर्षभर सोनं खरेदी करू नका; नरेंद्र मोदींचे देशवासीयांना 9 आवाहने, पेट्रोलवरही बोलले पंतप्रधान
मोठी बातमी! वर्षभर सोनं खरेदी करू नका; नरेंद्र मोदींचे देशवासीयांना 9 आवाहने, पेट्रोलवरही बोलले पंतप्रधान
Devendra Fandavis: पंतप्रधान मोदींनी जे सांगितलंय 'ते' पाळावे; मुख्यमंत्री फडणवीसांचे जनतेला आवाहन, युद्धपरिस्थितीवर भाष्य
पंतप्रधान मोदींनी जे सांगितलंय 'ते' पाळावे; मुख्यमंत्री फडणवीसांचे जनतेला आवाहन, युद्धपरिस्थितीवर भाष्य

व्हिडीओ

Kerala Politics : सोडलं तर पळतंय..म्हणून केरळचं अडतंय, कोण होणार केरळचे मुख्यमंत्री ? Special Report
Rupali Chakankar SIT Inquiry Ashok Kharat Case Special Report : चाकणकरांची एसआयटीकडून सहा तास चौकशी, कोणते प्रश्न अजूनही अनुत्तरीतच?
Dahanu Water Scarcity Special Report : डहाणूमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी एक किलोमीटर पायपीट, जनावरांसोबतच डबक्यातील पाणी पिण्याची वेळ
Death of Tigress and Cubs in Kanha Tiger Reserve Special Report : पाच वाघांचा मृत्यू, वन विभाग अलर्ट मोडवर, नेमका हा विषाणू कसा पसरतो?
OBC Cast Issue : काना, मात्रा चुकला, आरक्षणाला मुकला, 27 जातींना आरक्षणाची प्रतीक्षा Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kerala Government Formation: केरळमध्ये मुख्यमंत्रीपदाबाबत अनिश्चितता अजूनही कायम; काँग्रेसने दावेदारांचे पोस्टर हटवले, आमदारांच्या मनात कोणाला पसंती?
केरळमध्ये मुख्यमंत्रीपदाबाबत अनिश्चितता अजूनही कायम; काँग्रेसने दावेदारांचे पोस्टर हटवले, आमदारांच्या मनात कोणाला पसंती?
किम जोंग उनसाठी उत्तर कोरियाची संविधानात आणि अण्वस्त्र धोरणात जगाला धडकी भरवणारी दुरुस्ती; ' जर देशाच्या नेत्याचं बरं वाईट झालं तर थेट...' इराणपासून घेतला धडा
किम जोंग उनसाठी उत्तर कोरियाची संविधानात आणि अण्वस्त्र धोरणात जगाला धडकी भरवणारी दुरुस्ती; ' जर देशाच्या नेत्याचं बरं वाईट झालं तर थेट...' इराणपासून घेतला धडा
मोठी बातमी! वर्षभर सोनं खरेदी करू नका; नरेंद्र मोदींचे देशवासीयांना 9 आवाहने, पेट्रोलवरही बोलले पंतप्रधान
मोठी बातमी! वर्षभर सोनं खरेदी करू नका; नरेंद्र मोदींचे देशवासीयांना 9 आवाहने, पेट्रोलवरही बोलले पंतप्रधान
Devendra Fandavis: पंतप्रधान मोदींनी जे सांगितलंय 'ते' पाळावे; मुख्यमंत्री फडणवीसांचे जनतेला आवाहन, युद्धपरिस्थितीवर भाष्य
पंतप्रधान मोदींनी जे सांगितलंय 'ते' पाळावे; मुख्यमंत्री फडणवीसांचे जनतेला आवाहन, युद्धपरिस्थितीवर भाष्य
विजयने मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताच त्रिशाचा कंठ दाटला, अश्रूंना रोखलं; कावरी-बावरी झाली अभिनेत्री
विजयने मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताच त्रिशाचा कंठ दाटला, अश्रूंना रोखलं; कावरी-बावरी झाली अभिनेत्री
पेट्रोल आणि डिझेलचा वापर कमी करा, भारताकडे मोठ्या तेल विहिरी नाहीत, आज वर्क फ्रॉम होम सारख्या उपाययोजनांची गरज : पीएम मोदी
पेट्रोल आणि डिझेलचा वापर कमी करा, भारताकडे मोठ्या तेल विहिरी नाहीत, आज वर्क फ्रॉम होम सारख्या उपाययोजनांची गरज : पीएम मोदी
सूर्यकुमार यादवनं आपल्या लेकीची पहिली झलक दाखवली; चिमुकल्या परीचं नावही सांगितलं!
सूर्यकुमार यादवनं आपल्या लेकीची पहिली झलक दाखवली; चिमुकल्या परीचं नावही सांगितलं!
प.बंगालमध्ये मोदींसोबत काय चर्चा झाली? एकनाथ शिंदेंनी सांगून टाकलं; व्हायरल व्हिडिओवर बोलले उपमुख्यमंत्री
प.बंगालमध्ये मोदींसोबत काय चर्चा झाली? एकनाथ शिंदेंनी सांगून टाकलं; व्हायरल व्हिडिओवर बोलले उपमुख्यमंत्री
Embed widget