एक्स्प्लोर

Santosh Bangar : नाटकं करू नका ती गाडी सोडून द्या, संतोष बांगर यांची आरटीओ अधिकाऱ्याला शिवीगाळ, कॉल रेकॉर्डिंग व्हायरल

Santosh Bangar : हिंगोलीतील कळमनुरीचे आमदार संतोष बांगर यांचं कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झालं आहे. त्यामध्ये आरटीओ अधिकाऱ्याला ते गाडी सोडण्यास सांगत असल्याचं दिसून येतं.

हिंगोली : कळमनुरीचे शिवसेना (Shivsna) आमदार संतोष बांगर (Santosh Bangar) नेहमीच त्यांच्या वादग्रस्त वक्तव्य आणि शिवीगाळ पद्धतीने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चर्चेत राहतात. मारहाण आणि शिवीगाळ हे आमदार बांगर यांना काही नवीन नाही, अशा वक्तव्यामुळे आमदार बांगर यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा अनेक वेळा समज दिली. परंतु, मुख्यमंत्र्यांचा ऐकतील ते बांगर कसले? आमदार बांगर आरटीओ अधिकाऱ्याला शिवीगाळ करतानाची एक कॉल रेकॉर्डिंग आता समाज माध्यमांवर व्हायरल होत आहे. कॉल रेकॉर्डिंग मधील संभाषणानुसार संबंधित आरटीओ अधिकारी हे यवतमाळ जिल्ह्यातील पुसद येथे कर्तव्य बजावत असताना त्यांनी एक गाडी पकडली होती. ती गाडी सोडून द्या असं आमदार बांगर यांचे म्हणणं होतं. परंतु, आपण कारवाई करतोय त्यासाठीच ही गाडी पकडली आहे, असे आरटीओ अधिकारी या संभाषणामध्ये सांगत आहेत. आमदार बांगर यांनी मात्र त्या आरटीओ अधिकाऱ्याला शिवीगाळ केली आहे. आरटीओ अधिकारी आणि आमदार बांगर यांच्या मधील काय संभाषण झालं आहे ते देत आहोत. मात्र,त्या अगोदर एक महत्त्वाची सूचना एबीपी माझा या ऑडिओ रेकॉर्डिंग ची पुष्टी करत नाही. 

आमदार संतोष बांगर: कोण आरटीओ का ?

आरटीओ अधिकारी: हो बोलतोय साहेब

आमदार संतोष बांगर : आमदार बांगर बोलतो

आरटीओ अधिकारी: साहेब नमस्कार बोला ना साहेब

आमदार संतोष बांगर :अरे पकडू नका गाड्या अशा लहान लहान लोकांच्या, गरीब लोकांच्या, जरा मोठ्या लाईनच्या गाड्या पकडायच्या आपण, आपल्याला एक सांगायची आवश्यकता पडली नाही पाहिजे, आरटीओ साहेब.

आरटीओ अधिकारी: नाही नाही साहेब, कसं आहे थेंबा थेंबाने तळं साचतंय म्हणाल्या सारखं आहे

आमदार बांगर : थेंबा थेंबाने कशाच #@ उपटायचं तळ साचात का हो, गोरगरिबाच्या गाड्या पकडता, लाईनच्या गाड्या लाईनच्या कुठं गाड्या #@ उपटायला पकडता का तुम्ही हुशाऱ्या ##@@# थेंबा थेंबा न कशाचा @#@ #&#-#&&& तळ साचायले का?  होय रे थेंबा थेंबा न तळे साचणार वाल्या हो रे गोरगरिबाला लुटायचं करायचं आणि चांगल्या लाईनच्या गाड्या सोडायच्या, मलिदा तिकडून मिळाला की विषय क्लोज गोरगरिबाच्या @#@ #&# लावायचे का? हा धंदा आहे का तुमचा 
 
आरटीओ अधिकारी : असं बोलल्यावर मी काय बोलणार साहेब

आमदार बांगर: पीएचडी आहे या धंद्यात, आरटीओच्या धंद्यामध्ये मला सांगायची आवश्यकता नाही. थेंबा थेंबाने तळ साचतं तर या गरीबाच्या थेंबाने तळे साचवता का तुम्ही? चांगल्या लाईनच्या गाड्या पकडता का तुम्ही त्यांच्याकडे तर तुमची पर्ची देता तुमची,आगाऊ नाटकं करू नका ती गाडी सोडून द्या. 

आरटीओ अधिकारी : साहेब गाडी त्या शेतकऱ्याची नाही.

आमदार बांगर: काय शेतकऱ्याची नाही म्हणता, शेतकऱ्याची गाडी आहे म्हणूनच त्यानं लावून दिला ना त्यांनी फोन, शेतकऱ्याची गाडी आहे. गाडी सोडून द्या, इकडे ऐका आरटीओ साहेब गाडी सोडून द्या,नाहीतर मला तुम्हाला सांगतो  26 तारखेपर्यंत बिझी आहे. मी 27-28 तारखेला मला पुसदला यायला वेळ लागणार नाही आणि गाड्या लावायला टाईम लागणार नाही. जेवढ्या गाड्या लागतील तेवढ्या गाड्या लावेल,  मला माहिती आहे आरटीओ ची काय परिस्थिती असते ते

दरम्यान, या कॉल रेकॉर्डिंगची पुष्टी आम्ही करत नसून संभाषणावरुन कॉल रेकॉर्डिंग नेमक्या कोणत्या महिन्यातील आहे हे त्यावरुन स्पष्ट होत नाही. 

संतोष बांगर यांचं कॉल रेकॉर्डिंग

इतर बातम्या : 

Jitesh Antapurkar: मोठी बातमी: काँग्रेसचे आमदार जितेश अंतापूरकरांचा राजीनामा, भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता

मुंबईच्या म्हाडाच्या सोडतीबाबत मोठी अपडेट, फॉर्म भरणाऱ्यांना घर मिळालं की नाही हे कधी समजणार?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Tips For Car Driving: घाटात गाडी चालवताना काय काळजी घ्यायची?
Tips For Car Driving: घाटात गाडी चालवताना काय काळजी घ्यायची?
पुण्यात निवृत्त PSI च्या घरी गुंडांचा धुडगूस; किरकोळ कारणावरुन 8 ते 10 जणांकडून कुटुंबीयांना मारहाण
पुण्यात निवृत्त PSI च्या घरी गुंडांचा धुडगूस; किरकोळ कारणावरुन 8 ते 10 जणांकडून कुटुंबीयांना मारहाण
Crime News: रत्नागिराच्या चिमुकलीचा गोव्यात गेला जीव! खून की नरबळी? घराच्या परिसरात गाडलेल्या अवस्थेत सापडला मृतदेह अन्...पोलीस तपास सुरू
रत्नागिराच्या चिमुकलीचा गोव्यात गेला जीव! खून की नरबळी? घराच्या परिसरात गाडलेल्या अवस्थेत सापडला मृतदेह अन्...पोलीस तपास सुरू
Beed Crime : खोक्या भाईने मारहाण केलेल्या ढाकणे पिता-पुत्रावर विनयभंग अन् अ‍ॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल, मुला-मुलीला शेतात बोलावलं अन्...
खोक्या भाईने मारहाण केलेल्या ढाकणे पिता-पुत्रावर विनयभंग अन् अ‍ॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल, मुला-मुलीला शेतात बोलावलं अन्...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Budget Session 2025 | महायुतीचा बजेट मांडताना अजितदादांसमोर कोणती आव्हानं? ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 01.00 PM TOP Headlines 01.00 PM 10 March 2025Chhagan Bhujbal on Onion : कांदा प्रश्नावरून भुजबळ विधानसभेत आक्रमक, उपमुख्यमंत्र्यांनी कांदाप्रश्न केंद्रांसमोर मांडावाABP Majha Marathi News Headlines 12.00 PM TOP Headlines 12.00 PM 10 March 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tips For Car Driving: घाटात गाडी चालवताना काय काळजी घ्यायची?
Tips For Car Driving: घाटात गाडी चालवताना काय काळजी घ्यायची?
पुण्यात निवृत्त PSI च्या घरी गुंडांचा धुडगूस; किरकोळ कारणावरुन 8 ते 10 जणांकडून कुटुंबीयांना मारहाण
पुण्यात निवृत्त PSI च्या घरी गुंडांचा धुडगूस; किरकोळ कारणावरुन 8 ते 10 जणांकडून कुटुंबीयांना मारहाण
Crime News: रत्नागिराच्या चिमुकलीचा गोव्यात गेला जीव! खून की नरबळी? घराच्या परिसरात गाडलेल्या अवस्थेत सापडला मृतदेह अन्...पोलीस तपास सुरू
रत्नागिराच्या चिमुकलीचा गोव्यात गेला जीव! खून की नरबळी? घराच्या परिसरात गाडलेल्या अवस्थेत सापडला मृतदेह अन्...पोलीस तपास सुरू
Beed Crime : खोक्या भाईने मारहाण केलेल्या ढाकणे पिता-पुत्रावर विनयभंग अन् अ‍ॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल, मुला-मुलीला शेतात बोलावलं अन्...
खोक्या भाईने मारहाण केलेल्या ढाकणे पिता-पुत्रावर विनयभंग अन् अ‍ॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल, मुला-मुलीला शेतात बोलावलं अन्...
Nitesh Rane : मोठी बातमी : आता मटण दुकानांना मल्हार सर्टिफिकेट,  हिंदू खाटीकांसाठी नितेश राणेंचं नवं धोरण
मोठी बातमी : आता मटण दुकानांना मल्हार सर्टिफिकेट, हिंदू खाटीकांसाठी नितेश राणेंचं नवं धोरण
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना फेब्रुवारी - मार्चचे मिळून 3000 रुपये कधीपर्यंत मिळणार? आदिती तटकरेंनी अपडेट सांगितली
लाडक्या बहिणींना फेब्रुवारी - मार्चचे मिळून 3000 रुपये कधीपर्यंत मिळणार? आदिती तटकरेंनी अपडेट सांगितली
Raj Thackeray Kumbh Mela: राज ठाकरेंना फक्त हिंदू धर्म दिसतो, बकरी ईदला मोहम्मद अली रोडवर वाहणारं लाल पाणी दिसत नाही; नितेश राणे कडाडले
राज ठाकरेंना फक्त हिंदू धर्म दिसतो, बकरी ईदला मोहम्मद अली रोडवर वाहणारं लाल पाणी दिसत नाही; नितेश राणे कडाडले
Chhagan Bhujbal : कांद्याचा प्रश्न ताबडतोब सोडवा, छगन भुजबळ विधानसभेत आक्रमक, पणनमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय; म्हणाले...
कांद्याचा प्रश्न ताबडतोब सोडवा, छगन भुजबळ विधानसभेत आक्रमक, पणनमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय; म्हणाले...
Embed widget