Maharashtra News : महाराष्ट्रात नवीन 224 महसूल मंडळात दुष्काळ सदृश्य परिस्थिती घोषित
Drought Condition Declared : नवीन महसूल मंडळापैकी 224 महसूल मंडळांमध्ये देखील दुष्काळ सदृश्य परिस्थिती असल्याचं राज्य शासनाच्या वतीने घोषित करण्यात आलं आहे.
![Maharashtra News : महाराष्ट्रात नवीन 224 महसूल मंडळात दुष्काळ सदृश्य परिस्थिती घोषित drought condition declared in 224 mandals hingoli maharashtra weather marathi news Maharashtra News : महाराष्ट्रात नवीन 224 महसूल मंडळात दुष्काळ सदृश्य परिस्थिती घोषित](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/02/18/4590bfda56128b269a40908695386e7c1708241574639322_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Maharashtra News : महाराष्ट्र मंडळाच्या विभाजनानंतर अस्तित्वात आलेल्या नवीन महसूल मंडळापैकी 224 महसूल मंडळांमध्ये देखील दुष्काळ सदृश्य परिस्थिती असल्याचं राज्य शासनाच्या वतीने घोषित करण्यात आलं आहे. देशासह राज्याच्या हवामानात सातत्याने बदल होत आहे. सरकारने या वर्षीसाठी दुष्काळ घोषित केला आहे. यावर्षी ज्या महसुली मंडळामध्ये जून ते सप्टेंबर 2023 या काळामध्ये सरासरी पावसाच्या एकूण 75 टक्के पेक्षा कमी आणि एकूण पर्जन्यमानाच्या 750 मिलिमीटर पेक्षा कमी झाले आहे, अशा महसुली मंडळामध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती असल्याचं राज्य शासनाच्या वतीने घोषित करण्यात आला आहे.
224 नवीन महसूल मंडळामध्ये दुष्काळ जाहीर
या पद्धतीचा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या वतीने 16 फेब्रुवारीला जारी करण्यात आला आहे, त्यामुळे 224 नवीन महसूल मंडळामध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती घोषित करण्यात आली आहे. याचा थेट फायदा शेतकऱ्यांना होणार आहे या काळामध्ये वेगवेगळ्या सवलती सुद्धा लागू करण्यात येतात.
शासनाकडून सवलती आणि उपाययोजनांचा जीआर जारी
- जमीन महसूलात सूट
- सहकारी कर्जाचे पुनर्गठन
- शेतीशी निगडीत कर्जाच्या वसूलीस स्थगिती
- कृषी पंपाच्या चालू विजबिलात 33.5 टक्के सूट
- शालेय किंवा महाविद्यालयीन विद्यार्थ्याच्या परिक्षा शुल्कात माफी
- रोहयो अंतर्गत कामाच्या निकषात काही प्रमाणात शिथिलता
- आवश्यक तेथे पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी टँकर्सचा वापर
- टंचाई जाहीर केलेल्या गावात शेतकऱ्यांच्या शेतीच्या पंपाची वीज जोडणी खंडीत न करणे.
या सवलती ज्या मंडळामध्ये परिस्थिती शासनाने जाहीर केली आहे, त्या भागातील शेतकऱ्यांना मिळणार आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
मोठी बातमी! दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना दिलासा, पीक कर्ज वसुलीसाठी दिली स्थगिती
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)