एक्स्प्लोर

Hingoli News: 40 तासांपासून बेपत्ता, सगळे शोधून हैराण; अखेर चव्हाण कुटुंबीयांचा शोध लागला, कुंभार्ली घाटात नेमकं काय घडलं?, सगळं सांगितलं!

Hingoli News: तब्बल 40 तास बेपत्ता राहिल्यानंतर ज्ञानेश्वर चव्हाण यांच्या कुटुंबीयांचा आज (28 ऑगस्ट) नऊ वाजून पन्नास मिनिटांनी त्यांचा शोध लागला.

Hingoli News: गणपतीनिमित्त गावी निघालेल्या शिक्षकाचं अख्ख कुटुंब बेपत्ता असल्याचा प्रकार समोर आला होता. हिंगोलीमधील शिक्षक ज्ञानेश्वर चव्हाण (Dnyaneshwar Chavan) त्यांच्या पत्नी आणि दोन मुलांसह कारने प्रवास करत गावी निघाले होते. मात्र या सगळ्यांचा मोबाईल गेल्या 40 तासांपासून बंद होते. त्यामुळे नातेवाईकांनी शोधाशोध सुरू केली होती. परंतु ज्ञानेश्वर चव्हाण यांच्यासह त्यांच्या पत्नी आणि दोन्ही मुलांचा शोध लागला असून सर्वजण सुखरुप आहेत. 

तब्बल 40 तास बेपत्ता राहिल्यानंतर ज्ञानेश्वर चव्हाण यांच्या कुटुंबीयांचा आज (28 ऑगस्ट) नऊ वाजून पन्नास मिनिटांनी त्यांचा शोध लागला. कालपासून बेपत्ता असलेल्या कुटुंबाचा अखेर संपर्क झाला आहे.  गोंदवले महाराज मठ तालुका माण या ठिकाणी ते मुक्कामी होते. ज्ञानेश्वर चव्हाण यांनी स्वत: व्हिडीओद्वारे याबाबत माहिती दिली. तसेच गेल्या 40 तासांत नेमकं काय काय घडलं?, हे देखील ज्ञानेश्वर चव्हाण यांनी सांगितले आहे.

ज्ञानेश्वर चव्हाण व्हिडीओमध्ये काय म्हणाले?

ज्ञानेश्वर चव्हाण एक व्हिडीओ करत म्हणाले की, गणपतीच्या सुट्ट्या असल्यामुळे आम्ही रत्नागिरीहून गावाकडे जात असताना अचानक कुंभार्ली घाटाजवळ मुसळधार पाऊस असल्यामुळे आमचे मोबाईल भिजले. मोबाईल पाण्याने भिजल्यामुळे दोन्ही मोबाईल बंद झाले होते. दरम्यानच्या काळात काय करायचं काय नाही..असं म्हणत नेहमीप्रमाणे आम्ही गोंदवले महाराज मठ तालुका माण या ठिकाणी मुक्कामी थांबलो. यानंतर आम्ही इकडूनचं घरी जायचं ठरवलं होतं. यादरम्यान मोबाईल बंद असल्यामुळे आमचे सर्व नातेवाईक, मित्र आमची काळजी करत होते. कोणाशीच संपर्क न झाल्यामुळे सगळ्यांना त्रास झाला. त्यामुळे मी माफी मागतो. मी आणि माझे कुटुंब सुखरुप आहोत, अशी माहिती ज्ञानेश्वर चव्हाण यांनी दिली. 

संबंधित बातमी:

Hingoli News : गणपतीसाठी गावी निघालेलं शिक्षकाचं कुटुंब अचानक गायब, अखेर 40 तासांनी सुगावा लागला; नेमकं काय घडलं?

About the author माधव दिपके

माधव दिपके
Read More

महत्त्वाच्या बातम्या

RBI ची मोठी कारवाई! 'या' बँकेवर 6 महिन्यांची बंदी, पैसे काढण्यावरही मर्यादा, तुमचे खाते कोणत्या बँकेत?
RBI ची मोठी कारवाई! 'या' बँकेवर 6 महिन्यांची बंदी, पैसे काढण्यावरही मर्यादा, तुमचे खाते कोणत्या बँकेत?
वडाळ्यासह भिवंडीत एफडीएची मोठी कारवाई, विमानाच्या इंधनसह पेट्रोल डिझेलचा आणि सौंदर्यप्रसाधनांचा साठा जप्त 
वडाळ्यासह भिवंडीत एफडीएची मोठी कारवाई, विमानाच्या इंधनसह पेट्रोल डिझेलचा आणि सौंदर्यप्रसाधनांचा साठा जप्त 
PM Narendra Modi: मोबाईलवर अचानक येणारे इमर्जन्सी मेसेज अन् वाजणारे सायरन आता बंद; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट सिस्टिम'ला स्थगिती
मोबाईलवर अचानक येणारे इमर्जन्सी मेसेज अन् वाजणारे सायरन आता बंद; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट सिस्टिम'ला स्थगिती
Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंचं रक्त काढून राज्यातील इतर विभागप्रमुखांना द्या, म्हणजे...; माजी मंत्र्यांचं मुख्य सचिवांना पत्र
तुकाराम मुंढेंचं रक्त काढून राज्यातील इतर विभागप्रमुखांना द्या, म्हणजे...; माजी मंत्र्यांचं मुख्य सचिवांना पत्र

व्हिडीओ

Goras Bhandar FDA Action Wardha: तुकाराम मुंढेंच्या कारवाईला गोरस भंडारचे हायकोर्टात आव्हान
Sudhir Mungantiwar on Opration Tiger : ठाकरेंचे खासदार देशहितासाठी सोबत येत असतील तर स्वागतच - सुधीर मुनगंटीवार
Shahajibapu Patil Solapur: गणेश नाईकांनी शरद पवारांच्या मदतीने सरकार पाडायचा केला होता प्रयत्न
Sanjay Raut Delhi: आई,साईबाबा तर कोणी मुलाची शपथ घेतली; खासदारांनी ठाकरेंना शब्द दिल्याचा दावा
TMC MP Merged With Small Party : आता छोटा पक्ष, नंतर मोठं लक्ष्य | ABP Majha Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मंडोळ्या बांधून नटली नवरीबाई; सुप्रिया सुळेंच्या घरी लगीनघाई, वडिलांची लाडाची लेक लवकरच मांडवात
मंडोळ्या बांधून नटली नवरीबाई; सुप्रिया सुळेंच्या घरी लगीनघाई, वडिलांची लाडाची लेक लवकरच मांडवात
केंद्र सरकारचा मोठा निर्णय, महाराष्ट्र पोलिस दलाच्या आधुनिकीकरणासाठी  733.28 रुपयांचा निधी मंजूर, मुख्यमंत्र्यांनी मानले आभार
केंद्र सरकारचा मोठा निर्णय, महाराष्ट्र पोलिस दलाच्या आधुनिकीकरणासाठी  733.28 रुपयांचा निधी मंजूर, मुख्यमंत्र्यांनी मानले आभार
Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंचं रक्त काढून राज्यातील इतर विभागप्रमुखांना द्या, म्हणजे...; माजी मंत्र्यांचं मुख्य सचिवांना पत्र
तुकाराम मुंढेंचं रक्त काढून राज्यातील इतर विभागप्रमुखांना द्या, म्हणजे...; माजी मंत्र्यांचं मुख्य सचिवांना पत्र
कंगना रणौतचा नवा सिनेमा, 26/11 दहशतवादी हल्ल्याची स्टोरी पुन्हा मोठ्या पडद्यावर; 'भारत भाग्य विधाता' का पाहावा?
कंगना रणौतचा नवा सिनेमा, 26/11 दहशतवादी हल्ल्याची स्टोरी पुन्हा मोठ्या पडद्यावर; 'भारत भाग्य विधाता' का पाहावा?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2026 | मंगळवार
आरोग्यमंत्र्यांच्या मतदारसंघातच चटई अंथरुन रुग्णांवर उपचार; सलाईन नाही अब्रू टांगली, रोहित पवारांकडून फोटो शेअर
आरोग्यमंत्र्यांच्या मतदारसंघातच चटई अंथरुन रुग्णांवर उपचार; सलाईन नाही अब्रू टांगली, रोहित पवारांकडून फोटो शेअर
संविधानकर्ते अन् नेहरुंचीही हिंमत झाली नाही, ते मोदींनी करुन दाखवलं; आर्टिकल 370 वरुन आमदार प्रमोद जठारांचं वक्तव्य
संविधानकर्ते अन् नेहरुंचीही हिंमत झाली नाही, ते मोदींनी करुन दाखवलं; आर्टिकल 370 वरुन आमदार प्रमोद जठारांचं वक्तव्य
Vidhan Parishad Election : आमचा निर्णय मतदानाच्या आधी होईल; शंभुराज देसाईंचं मोठं वक्तव्य, सांगली-सातारा निवडणुकीत महायुतीचा तिढा कायम?
आमचा निर्णय मतदानाच्या आधी होईल; शंभुराज देसाईंचं मोठं वक्तव्य, सांगली-सातारा निवडणुकीत महायुतीचा तिढा कायम?
Embed widget