त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी करण्यावर शालेय शिक्षण विभाग ठाम, वेळापत्रक जाहीर; पाठ्यपुस्तके, शिक्षक नाहीत तर मग वेळापत्रकाची घाई का?
Hindi Compulsion in Maharashtra schools : इयत्ता पहिलीपासून तिसरी भाषा म्हणून सर्व साधारण हिंदी भाषेसह वेळापत्रकात तृतीय भाषा म्हणून इतर भारतीय भाषांचा पर्याय वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे.

Hindi Compulsion in Maharashtra schools : राज्यातील शाळांमध्ये पहिलीपासून हिंदी भाषा (Hindi Compulsion) शिकवण्याच्या निर्णयाबाबत एक महत्वाची बातमी समोर आली आहे. इयत्ता पहिलीपासून तिसरी भाषा म्हणून सर्व साधारण हिंदी भाषेसह वेळापत्रकात तृतीय भाषा म्हणून इतर भारतीय भाषांचा पर्याय वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. परिणामी, त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी करण्यावर शालेय शिक्षण विभाग ठाम असल्याचे बघायला मिळाले आहे.
तिसरी भाषा शिकण्यासाठी कलाशिक्षण, आरोग्य व शारीरिक शिक्षण, कार्य शिक्षणाचे तास कमी केल्याची देखील माहिती समोर आली आहे. तर मागील वेळापत्रकातील 45 आणि 60 मिनिटाची तासिका सुद्धा केली 35 मिनिटांची करण्यात आली आहे. राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने शासन निर्णय जाहीर होताच दुसऱ्या दिवशी इयत्ता पहिलीसाठीचे वेळापत्रक जाहीर केलं आहे.
पाठ्यपुस्तके नाही, शिक्षकही नाहीत तर मग वेळापत्रकाची घाई का?
पुढे आलेल्या माहितीनुसार, तिसऱ्या भाषेसाठी अद्याप पाठ्यपुस्तके उपलब्ध करून दिलेली नाही, शिक्षकही नाहीत तर मग वेळापत्रकाची घाई का? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. मराठी माध्यमांच्या शाळांचे वेळापत्रक तयार करत असताना प्रथम भाषा मराठी, द्वितीय भाषा इंग्रजी, तृतीय भाषा हिंदी किंवा त्याला पर्याय म्हणून इतर भारतीय भाषा असेल. गणित, कलाशिक्षण, आरोग्य व शारीरिक शिक्षण, कार्यशिक्षण या विषयांचाही त्यात समावेश असेल. तर इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये प्रथम भाषा इंग्रजी, द्वितीय भाषा मराठी, तृतीय भाषा सर्वसाधारणपणे हिंदी किंवा इतर भारतीय भाषा, गणित,कलाशिक्षण, आरोग्य व शारीरिक शिक्षण, कार्यशिक्षण या विषयांचा समावेश असेल. हे वेळापत्रक इयत्ता पहिलीसाठी लागू होईल, तरी येता दुसरीसाठी नवीन पाठ्यपुस्तके आल्यानंतर हे वेळापत्रक लागू होणार आहे. दरम्यान तिसरी भाषा शिकवण्यासाठी वर्षभरात 103 तास शिकवले जाणार असल्याची ही माहिती आता समोर आली आहे.
हिंदी सक्ती विरोधात विविध शाळांसह गट शिक्षणाधिकारी यांना मनसेचं निवेदन
महाराष्ट्र शासन छुप्या मार्गाने महाराष्ट्रात पहिली पासूनच्या विद्यार्थ्यांवर तिसरी भाषा म्हणून हिंदी लादण्यात आल्याचा आरोप मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केला आहे.त्यास सुरवातीपासून मनसेने विरोध केल्याने शासननिर्णयातील “अनिवार्य” हा शब्द काढून “सर्वसाधारण” असा शब्द घेतला आहे. हा कावा मराठी माणसानं वेळीच ओळखला पाहिजे म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानंतर भिवंडीत मनसे प्रदेश उपाध्यक्ष डी के म्हात्रे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने पंचायत समिती गटशिक्षणाधिकारी कार्यालय गाठून येथील अधिकाऱ्यांना हिंदी सक्ती विरोधात राज ठाकरे यांचे पत्र तसेच स्थानिक पातळीवर हिंदी सक्ती करू नये असा इशारा देणारे निवेदन दिले आहे.
हे ही वाचा
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI
























