Hardik Pandya Natasha Stankovic Divorce: टी-20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यातील अंतिम षटकात टिच्चून मारा करीत भारताला विजय मिळवून देणारा हार्दिक पांड्या (Hardik Pandya) पुन्हा एकदा भारतीयांसाठी हीरो झाला आहे. पण, असे असले तरी हार्दिक पांड्याच्या वैयक्तिक आयुष्यातील वादळ थांबण्याचे नाव घेत नाही. हार्दिक पांड्या आणि त्याची पत्नी नताशा स्टॅनकोव्हिच (Natasha Stankovic) यांच्यात आलबेल नसल्याचे बऱ्याच दिवसांपासून बोलले जात आहे. याचदरम्यान एका तरुणीनं हार्दिक पांड्यासोबत सोशल मीडियावर फोटो टाकल्याने चर्चांना उधाण आले आहे. 


कोण आहे प्राची सोलंकी?


हार्दिक पांड्यासोबत फोटो काढल्यामुळे व्हायरल झालेली मुलगी एक प्रसिद्ध मेकअप आर्टिस्ट आहे. तिचे नाम प्राची सोलंकी असे आहे. प्राची हार्दिकची चाहती असल्याने तिने त्याच्यासोबत फोटोशूट केले. तिने स्वत: हार्दिकसोबतचा व्हिडीओ आणि फोटो शेअर केला आहे. पांड्या कुटुंबियांचे आणि प्राची यांचे चांगले संबंध असल्याचे दिसून येत आहे.






नताशा स्टॅनकोविक कोट्यवधीची मालकीण


नताशा आणि हार्दिक यांचा घटस्फोट झालाच तर हार्दिकची किती संपत्ती नताशाला मिळणार? असंही विचारलं जातंय. या दाम्पत्याचा घटस्फोट होणार का? याबाबत अद्याप कोणतीही स्पष्टता नाही. हार्दिक आणि नताशा या दोघांनीदेखील यावर कोणतंही भाष्य केलेलं नाही. मात्र घटस्फोटाच्या चर्चेमुळे नताशाकडे एकूण किती संपत्ती आहे, असं विचारलं जातंय. खरं म्हणजे नताशा करोडपती असल्याचं सांगितलं जातं. नताशा ही एक सायबेरीयन मॉडेल आहे. हार्दिक आणि नताशा या दोघांनी 2020 साली लग्नगाठ बांधली. नताशा स्टॅनकोविक ही 32 वर्षांची आहे. ती मॉडेलिंग, अभिनयासह अनेक ब्रँड्सची जाहिरातही करते. अनेक जाहिरातींमध्येही तिने अभिनय केलेला आहे. स्पोर्ट तक या क्रीडाविषयक वृत्तसंकेतस्थळानुसार नताशाची एकूण संपत्ती ही 20 कोटी रुपये आहे. नताशा आणि हार्दिक या दोघांची 2018 साली एका पार्टीमध्ये भेट झाली होती. 


हार्दिक पांड्याची संपत्ती किती?


एका अहवालानुसार, हार्दिक पांड्याची एकूण संपत्ती सुमारे 91 कोटी रुपये आहे. त्याची कमाई बहुतांशी क्रिकेट खेळून आणि जाहिरातीतून होते. हार्दिक पांड्या प्रत्येक महिन्याला 1.2 कोटी रुपये कमावतो. जे त्याच्या आधीच्या कमाईपेक्षा खूप जास्त आहे. त्याचा बीसीसीआयशीही करार आहे. बीसीसीआयकडून त्याला दरवर्षी 5 कोटी रुपये पगार मिळतो. हार्दिक पांड्याला 2022 मध्ये गुजरात टायटन्सने 15 कोटी रुपयांना खरेदी केले होते. 2024 च्या या मोसमात मुंबई इंडियन्सने त्याला कर्णधार बनवले आहे आणि त्याच रकमेत त्याला करारबद्ध केले आहे. 


संबंधित बातमी:


Gautam Gambhir गौतम गंभीर मुख्य प्रशिक्षक होताच 5 खेळाडूंचं नशीब चमकणार?; टीम इंडियात आता स्थान पटकवण्याची शक्यता