एक्स्प्लोर
Advertisement
शेतीतला ‘सचिन’, मिरची लागवडीतून 4 महिन्यात 6 लाखांचं उत्पन्न!
तासगावमधील कवठे एकंद गावातील सचिन जाधव या तरुण शेतकऱ्याने भर उन्हाळ्यात मल्चिंग पेपरवरती सिझलिंग हॉट जातीच्या मिरचीची लागवड केली आहे. या मिरचीतून आतापर्यत 14 टनाचे उत्पादन घेत 6 लाखांचा फायदा मिळवला आहे. शेतीच्या नावान नाक मुरडणाऱ्या शेकडो तरुणांसमोर सचिनने आदर्श निर्माण केला आहे.
सांगली : तासगावमधील कवठे एकंद गावातील सचिन जाधव या तरुण शेतकऱ्याने भर उन्हाळ्यात मल्चिंग पेपरवरती सिझलिंग हॉट जातीच्या मिरचीची लागवड केली आहे. या मिरचीतून आतापर्यत 14 टनाचे उत्पादन घेत 6 लाखांचा फायदा मिळवला आहे. शेतीच्या नावान नाक मुरडणाऱ्या शेकडो तरुणांसमोर सचिनने आदर्श निर्माण केला आहे.
तासगाव तालुका हा तसा द्राक्ष बागेसाठी प्रसिद्ध आहे. याच तालुक्यतील कवठे एकंद गावामधील जेमतेम बारावी शिकलेल्या सचिन जाधव या तरुण शेतकऱ्याने द्राक्ष शेतीला पर्यायी पीक घेतलं आहे. घरची 3 एकर ऊस आणि द्राक्षबागेची फायदा कमी तोटाच अधिक असणारी शेती होती. म्हणून आता पीक बदलून बघूया म्हणून त्याने फेब्रुवारी महिन्यात सिझलिंग हॉट जातीच्या मिरचीची एक एकर क्षेत्रावर बेडवर मल्चिंग पेपरद्वारे लागवड केली. एका एकरामध्ये 9 हजार रोपे लावली.
सचिनच्या या मिरची शेतीतल्या प्रयोगला 75 व्या दिवशी फळ मिळालं. मुंबई बाजारपेठमध्ये मिरचीला 50 ते 55 रुपये किलो भाव मिळाला. एक तोडा दहा दिवस चालतो. यासाठी 25 ते 30 महिलांना तो रोजगारही देतो. 32 किलोच्या बॉक्समधून हा माल मुंबईस जातो. 4 महिन्यात त्यांनी सहा लाख रूपयांचे उत्पन्न काढले. अजून दीड महिने मिरचीचा तोडा सुरू राहील. यातून त्याला मिरचीचे उत्पन्न 7 टन मिर्चीतून 4 लाखांचे उत्पन्न मिळणार आहे.
सचिनला कमी वेळात द्राक्षबागेपेक्षा जास्त फायदा हा मिरचीतून झाला आहे. त्याला या उत्पादनात त्यांना कृषी सल्लागार एस सी नरले यांचे मोलाचे मार्गददशन लाभले.
सचिनच्या सिझलिंग हॉट जातीच्या मिरचीची वैशिष्ट्यं आणि अर्थशास्त्र :
- सिझलिंग हॉट जातीच्या मिरचीचे झाड हे साडेचार ते पाच फूट असते.
- भरपूर उंचीमुळे झाडाला मोठ्या प्रमाणावर पीक येते.
- सिझलिंग हॉट जातीची मिरची ही दिसायला लांबलचक आणि आकर्षक दिसते.
- सचिनला या पिकातून 5 महिन्यात निव्वळ 5 लाखांचा नफा मिळाला.
- कमी क्षेत्र, कमी खर्चत जास्त उत्पादन हे या मिरचीचे वैशिष्ट्यं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भविष्य
क्रिकेट
सोलापूर
Advertisement