एक्स्प्लोर

तूर खरेदीसाठी सरकारच्या दोन नव्या अटी, शेतकरी संतप्त

औरंगाबाद : ज्या शेतकऱ्यांच्या सातबारावरील पीक पेऱ्यावर तूरीची नोंद आहे, त्यांच्याकडूनच तूर खरेदी केली जाईल. तसंच उपविभागीय अधिकाऱ्यांनी पंचनामे केल्याखेरीज बाजर समितीतील तूरीची खरेदी न करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. सरकारच्या या दोन नव्या अटींमुळे तूर खरेदी आणखी काही दिवस लांबवण्याची शक्यता आहे. सरकार दरबारी तुरीच्या पेऱ्यामध्ये यंदा 38 हजार हेक्टरवर तूर पेरली गेल्याची नोंद आहे. पण, प्रत्यक्षात जास्त प्रमाणात तूर बाजारात आल्याचा संशय सरकारला आहे. त्यामुळे आता नव्याने तुरीची पडताळणी करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. दरम्यान 22 एप्रिलपर्यंत नोंद केलेल्या शेतकऱ्यांची तूर खरेदी केली जाईल, असा निर्णय सरकारन घेतला होता. मात्र आता त्यामध्ये वारंवार नव्या अटी घातल्या जात आहेत, त्यामुळे सरकारला तूर खरेदी करायची आहे का, की फक्त कागदी घोडे नाचवायचे आहेत, असा संतप्त सवाल शेतकरी करत आहेत. तूर खरेदीसाठी विविध ठिकाणी आंदोलनं तूर खरेदी पुन्हा सुरु करण्यासाठी विविध जिल्ह्यात शेतकऱ्यांसह विरोधी पक्ष रस्त्यावर उतरले आहेत. लातूरमधील खरेदी केंद्रावर जवळपास 75 हजार क्विंटल तूर खरेदीविना पडून आहे. तिथे मनसेने बैलांना तूर खायला घालून आंदोलन केलं. तूर खरेदी सुरु न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा मनसेने दिला आहे. परभणीमध्ये तूर खरेदी पुन्हा सुरू व्हावी यासाठी शेतकऱ्यांसोबत माकपनेही आंदोलन केलं. यावेळी परभणी वसमत महामार्गावर रास्तारोको करण्यात आला. वाशिममध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीने तूर जाळून रास्ता रोको केला. 22 एप्रिलपर्यंत नोंदणी झालेल्या तूर खरेदीचे आदेश सरकारने दिलेत. मात्र बाजार समित्यांमध्ये तुरीचं वजनही होत नसल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. उस्मानाबाद बाजार समितीत 44 पोती तूर चोरीला एकीकडे सरकार अजूनही शेतकऱ्यांच्या तूरीसंदर्भात ठोस निर्णय घेताना दिसत नाही. दुसरीकडे उस्मानाबादच्या वाशी बाजार समितीत 7 शेतकऱ्यांची तब्बल 44 पोती तूर चोरीला गेली आहे. याप्रकरणी अज्ञात आरोपीविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उघड्यावर असलेल्या लाखो क्विंटल तुरीची राखण करत हजारो शेतकऱ्यांनी बाजार समितीत तळ ठोकला आहे. 22 तारखेपर्यंत बाजार समितीत आलेली तूर राज्य सरकारमार्फत खरेदी करण्याचा निर्णय बाजार समित्यात पोहोचला नाही. त्यामुळे आज राज्यातल्या 316 पैकी एकाही समितीत प्रत्यक्षात वजनाला सुरुवात झाली नाही. तूर खरेदीसाठी शेतकरी कोर्टात तूर खरेदी खोळंबल्यामुळे मोठ्या अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांनी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली आहे. शेतकऱ्यांच्या संघटनेकडून दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिकेमध्ये खरेदी न झालेल्या तुरीची आकडेवारी सादर करण्यात आली. ही तूर खरेदी करण्यासाठी सरकारला आदेश देण्यात यावेत, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. या याचिकेची पुढील सुनावणी 2 मे रोजी ठेवण्यात आली आहे. संबंधित बातम्या :

शेतकरी हवालदिल, लातुरात तूर जाळली!

सरकारकडून तूर विक्रीसाठी शेतकऱ्यांना धान्य तारण योजनेचा पर्याय

काहीही करा, पण तूर खरेदी करा, शेतकऱ्याची सरकारला आर्त हाक

तूर खरेदी केंद्रावर शेतकऱ्याला चक्कर, उपचारासाठी 50 हजार रुपये खर्च

तूर खरेदीवर राज्य सरकार तोंडघशी, लाखो क्विंटल तूर खरेदी विना

नाफेडकडून तूरखरेदी बंद, खरेदी केंद्राबाहेर 5 किमी लांब रांगा

महत्त्वाच्या बातम्या

राज ठाकरेंच्या मताशी पुतण्या सहमत; गणेशोत्सावत दंगल वक्तव्यामागचं आदित्य ठाकरेंनी सांगितलं राज'कारण'
राज ठाकरेंच्या मताशी पुतण्या सहमत; गणेशोत्सावत दंगल वक्तव्यामागचं आदित्य ठाकरेंनी सांगितलं राज'कारण'
Video: अन् महिंद्रा स्कॉर्पिओ मालकानं थेट बंगल्याच्या दुसऱ्या मजल्यावर क्रेनने उचलून पार्क केली! कारण ऐकून डोक्याला हात लावायची पाळी
Video: अन् महिंद्रा स्कॉर्पिओ मालकानं थेट बंगल्याच्या दुसऱ्या मजल्यावर क्रेनने उचलून पार्क केली! कारण ऐकून डोक्याला हात लावायची पाळी
धक्कादायक! 15 दिवस फक्त पाणीच घेतलं, 20 किलो वजन कमी केलं, पण महिलेची प्रकृती खालावली, स्मरणशक्तीही गेली
धक्कादायक! 15 दिवस फक्त पाणीच घेतलं, 20 किलो वजन कमी केलं, पण महिलेची प्रकृती खालावली, स्मरणशक्तीही गेली
अंगणवाडीतील निकृष्ट आहाराची तक्रार केली, वरिष्ठांकडून मानिसक छळ; अखेर अंगणवाडी मदतनीसचा राजीनामा
अंगणवाडीतील निकृष्ट आहाराची तक्रार केली, वरिष्ठांकडून मानिसक छळ; अखेर अंगणवाडी मदतनीसचा राजीनामा

व्हिडीओ

Raj Thackeray Thane Speech : अमित ठाकरेंनी पंतप्रधानांचा फोटो हटवला; आता राज ठाकरे इशारा देत म्हणाले
Shahajibapu Patil News : 'अशोक खरातचा सांगोल्यातही धिंगाणा, चित्रपटात याचा समावेश आहे का?'
Dahihandi 2026 Omkar Govinda Pathak Thane 9 Thar: कडक 9 थर रचले, मग टॉपचे 4 थर हवेत; ठाण्यातील थरकाप उडवणारा VIDEO
Dahihandi 2026 Aryans Govinda Pathak 10 Thar: 10 थर बसले, 10 वा उठण्याच्या आधी कोसळले; आर्यन्स गोविंदा पथकाचा 10 थरांचा थरारक VIDEO
Dahihandi 2026: मनसेच्या दहीहंडीत 9 व्या थरावरुन गोविंदा कोसळला; थरारक VIDEO

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: अन् महिंद्रा स्कॉर्पिओ मालकानं थेट बंगल्याच्या दुसऱ्या मजल्यावर क्रेनने उचलून पार्क केली! कारण ऐकून डोक्याला हात लावायची पाळी
Video: अन् महिंद्रा स्कॉर्पिओ मालकानं थेट बंगल्याच्या दुसऱ्या मजल्यावर क्रेनने उचलून पार्क केली! कारण ऐकून डोक्याला हात लावायची पाळी
राज ठाकरेंच्या मताशी पुतण्या सहमत; गणेशोत्सावत दंगल वक्तव्यामागचं आदित्य ठाकरेंनी सांगितलं राज'कारण'
राज ठाकरेंच्या मताशी पुतण्या सहमत; गणेशोत्सावत दंगल वक्तव्यामागचं आदित्य ठाकरेंनी सांगितलं राज'कारण'
'जम्मू आणि काश्मीर, लडाख आमच्या नकाशाप्रमाणेच दिसले पाहिजे, आमच्या सीमा पक्क्या आहेत' नव्या जागतिक नकाशावर भारताचा आक्षेप
'जम्मू आणि काश्मीर, लडाख आमच्या नकाशाप्रमाणेच दिसले पाहिजे, आमच्या सीमा पक्क्या आहेत' नव्या जागतिक नकाशावर भारताचा आक्षेप
अंगणवाडीतील निकृष्ट आहाराची तक्रार केली, वरिष्ठांकडून मानिसक छळ; अखेर अंगणवाडी मदतनीसचा राजीनामा
अंगणवाडीतील निकृष्ट आहाराची तक्रार केली, वरिष्ठांकडून मानिसक छळ; अखेर अंगणवाडी मदतनीसचा राजीनामा
दिल्लीत इमारतीच्या ढिगाऱ्याखाली गाडलेला तरुण जिवंत सापडला, अजून किती चिरडले याचा थांगपत्ता नाही, अनेक गाड्यांचा सुद्धा चक्काचूर, थरकाप उडवणारे 10 फोटो
दिल्लीत इमारतीच्या ढिगाऱ्याखाली गाडलेला तरुण जिवंत सापडला, अजून किती चिरडले याचा थांगपत्ता नाही, अनेक गाड्यांचा सुद्धा चक्काचूर, थरकाप उडवणारे 10 फोटो
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 सप्टेंबर 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 सप्टेंबर 2026 | रविवार
Iran War Live Update: गद्दार कोण? इराण युद्धातील डेटा लीक प्रकरणात अमेरिकी लष्करी अधिकाऱ्यांची चक्क पॉलिग्राफ चाचणी!
गद्दार कोण? इराण युद्धातील डेटा लीक प्रकरणात अमेरिकी लष्करी अधिकाऱ्यांची चक्क पॉलिग्राफ चाचणी!
सप्टेंबरचा अजून पहिला आठवडा सुद्धा पूर्ण झाला नाही तोपर्यंत परदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय बाजारातून तब्बल 7,443 कोटी काढून घेतले!
सप्टेंबरचा अजून पहिला आठवडा सुद्धा पूर्ण झाला नाही तोपर्यंत परदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय बाजारातून तब्बल 7,443 कोटी काढून घेतले!
Embed widget