एक्स्प्लोर
सरकारकडून तूर विक्रीसाठी शेतकऱ्यांना धान्य तारण योजनेचा पर्याय
मुंबई : एकीकडे नाफेड आणि बाजार समित्यांनी तूर विक्रीची दारं बंद केल्यानंतर सरकारने शेतकऱ्यांना नवा उपाय सांगितला आहे. व्यापाऱ्यांना तूर न देता शेतमाल तारण कर्ज योजनेचा लाभ घेण्याचा सल्ला पणन मंत्री सुभाष देशमुख यांनी दिला आहे.
नाफेडने तूर खरेदी थांबवल्याने तूर उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहेत. राज्यात जवळपास 316 तूर खरेदी केंद्र आहेत. सद्यस्थितीत प्रत्येक केंद्राबाहेर अंदाजे 20 हजार क्विंटल तूर विक्रीसाठी शेतकऱ्यांनी आणलेली आहे. अजूनही तुरीची आवक सुरुच आहे. त्यामुळे लवकरात लवकर तूर खरेदी सुरु करावी, असे पत्र राज्यातील बाजार समित्यांनी सरकारला पाठवले आहेत.
काय आहे धान्य तारण योजना?
शेतकऱ्याला आर्थिक गरजेपोटी स्थानिक पातळीवर शेतमाल साठवणुकीच्या पुरेशा सुविधा नसल्यामुळे शेतमालाच्या काढणी हंगामात मोठ्या प्रमाणात शेतमाल बाजारपेठेत विक्रीसाठी येतो.
शेतमालाचे बाजारभाव खाली येतात. शेतमाल साठवणूक करुन काही कालावधीनंतर बाजारपेठेत विक्रीसाठी आणल्यास त्या शेतमालाला जादा बाजारभाव मिळू शकतो. म्हणून शेतकऱ्यांना त्याच्या शेतमालासाठी योग्य भाव मिळावा यासाठी 1990-19 सालापासून शेतमाल तारण कर्ज योजना सुरु करण्यात आली.
या योजनेमध्ये तूर, मूग, उडीद, सोयाबीन, सूर्यफूल, चना, भात (धान), करडई, ज्वारी, बाजरी, मका, गहू, काजू बी, बेदाणा आणि हळद या शेतमालाचा समावेश करण्यात आलेला आहे.
या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना बाजार समितीच्या गोदामात तारणात ठेवलेल्या शेतमालाच्या एकूण किंमतीच्या 75 टक्क्यांपर्यंत रक्कम 6 महिने कालावधीसाठी 6 टक्के व्याजदराने तारण कर्ज देण्यात येतं.
कृषी तारण योजना बाजार समित्यांमार्फत राबवली जाते. सहा महिन्यांच्या आत तारण कर्जाची परतफेड करणाऱ्या बाजार समित्यांना 3 टक्के व्याज सवलत देण्यात येते.
शेतमालनिहाय कर्जवाटप
सोयाबीन, तूर, मूग, उडीद, चणा, भात (धान), करडई, सूर्यफूल, हळद + एकूण किमतीच्या 75 टक्के रक्कम
ज्वारी, बाजरी, मका आणि गहू + एकूण किमतीच्या 50 टक्के रक्कम (किमान आधारभूत किंमत किंवा प्रचलित बाजारभाव प्रति क्विंटल यापैकी कमी असणारी रक्कम)
काजू बी + एकूण किमतीच्या 75 टक्के रक्कम (50 रुपये प्रतिकिलो अथवा प्रत्यक्ष बाजारभावाची किंमत यापैकी कमी असेल ती रक्कम)
बेदाणा + एकूण किमतीच्या कमाल 50 टक्के किंवा जास्तीत जास्त 50 हजार रुपये प्रति मेट्रिक टन यातील कमी असणारी रक्कम
तारण कर्जाच्या अटी आणि व्याजदर काय?
- शेतमाल तारण कर्ज योजनेअंतर्गत फक्त उत्पादक शेतकऱ्यांचाच शेतमाल स्वीकारला जातो. व्यापाऱ्यांचा शेतमाल या योजनेअंतर्गत स्वीकारला जात नाही.
- प्रत्यक्षात तारण ठेवलेल्या शेतमालाची किंमत ही त्या दिवसाचे बाजारभाव किंवा शासनाने जाहीर केलेली खरेदी किंमत यापैकी जी कमी असेल ती ठरवण्यात येते.
- तारण कर्जाची मुदत 6 महिने (180 दिवस) आहे. तारण कर्जाचा व्याजाचा दर 6 टक्के आहे.
- बाजार समितीकडून कृषी पणन मंडळास 3 टक्क्यांप्रमाणे कर्ज व्याजाची परतफेड होते. (उर्वरित 3 टक्के व्याज बाजार समितीस प्रोत्साहनपर अनुदान). मुदतीत कर्ज परतफेड न केल्यास व्याज सवलत नाही.
- 6 महिन्याच्या मुदतीनंतर सहा महिन्यांपर्यंत 8 टक्के व्याजदर आणि त्याच्या पुढील सहा महिन्यांकरिता 12 टक्के व्याजदराची आकारणी केली जाते.
- तारण ठेवलेल्या शेतमालाची साठवणूक, देखरेख आणि सुरक्षा बाजार समिती विनामूल्य करते.
- तारणातील शेतमालाचा विमा उतरवण्याची जबाबदारी संबंधित बाजार समितीची राहते.
काहीही करा, पण तूर खरेदी करा, शेतकऱ्याची सरकारला आर्त हाक
तूर खरेदी केंद्रावर शेतकऱ्याला चक्कर, उपचारासाठी 50 हजार रुपये खर्च
तूर खरेदीवर राज्य सरकार तोंडघशी, लाखो क्विंटल तूर खरेदी विना
नाफेडकडून तूरखरेदी बंद, खरेदी केंद्राबाहेर 5 किमी लांब रांगा
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement