नागपूर : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी नागपूर, अकोला आणि बुलडाणा जिल्ह्याच्या दोन दिवसीय दौ-यावर आले आहेत. त्यांचे सकाळी सव्वाअकरा वाजता नागपूर विमानतळावर आगमन झाले. त्यानंतर लगेच ते अकोला येथील कार्यक्रमासाठी रवाना झालेत. विमानतळावर त्यांचे केंद्रीय दळणवळण व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, विभागीय आयुक्त डॉ. माधवी खोडे -चवरे, पोलीस आयुक्त अमितेश कुमार, जिल्हाधिकारी आर. विमला, महानगरपालिका आयुक्त राधाकृष्णन बी, नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती मनोज सुर्यवंशी, विशेष पोलीस महानिरिक्षक डॉ. छेरिंग दोरजे, सहपोलीस आयुक्त अश्वती दोरजे, पोलीस अधीक्षक विजय मगर यांनी स्वागत केले.
नागपूर विमानतळावर आगमन झाल्यानंतर लगेच ते अकोल्याकडे रवाना झाले. यावेळी त्यांच्यासोबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरीही रवाना झालेत.अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात दुपारी साडेबारा वाजता होणाऱ्या दीक्षांत सोहळ्याला ते उपस्थित राहतील. त्यानंतर दुपारी सव्वातीन वाजता ते शेगाव (जि. बुलडाणा)कडे प्रयाण करतील. शेगाव येथील गजानन महाराज मंदिराला दुपारी 4 वाजता ते भेट देतील. त्यानंतर दुपारी साडेचार वाजता शासकीय वाहनाने ते अकोल्याकडे प्रयाण करतील. अकोला येथून सायंकाळी सव्वापाच वाजता राज्यपाल विमानाने नागपूरकडे प्रयाण करतील. राजभवन येथे त्यांचा रात्री मुक्काम आहे. उद्या शुक्रवारला सकाळी आठ वाजता नागपूर येथून विमानाने ते मुंबईकडे प्रयाण करतील.
इतर महत्वाच्या बातम्या