Kolhapur municipal corporation elections 2022 : निवडणूक आयोगाकडून मुदतवाढ मिळाल्याने कोल्हापूर महानगरपालिकेसाठी अंतिम मतदारयादी 16 जुलै रोजी प्रसिद्ध होणार आहे. हरकतींची संख्या जास्त असल्याने त्या निकालात काढण्याची प्रक्रिया जागेवर जाऊन कराव्या लागतात.
दसरीकडे कोल्हापूर जिल्ह्यावर पुराची टांगती तलवार तसेच हवामान खात्याकडून देण्यात आलेल्या अतिवृष्टीचा इशाऱ्याने राज्य निवडणूक आयोगाकडून मतदार यादी प्रसिद्ध करण्याला मुदतवाढ दिली आहे. यापूर्वी 9 जुलैला अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध करण्यासाठी मुदत घालून देण्यात आली होती.
यापूर्वी महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग रचना प्रसिद्ध झाली आहे. त्याचबरोबर आरक्षण सोडतही काढण्यात आली आहे. 23 जूनला प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. 1 जुलैपर्यंत हरकतींची असणारी मुदतही निवडणूक आयोगाने 3 जुलैपर्यंत वाढविली होती. महापालिकेकडे तब्बल 308 हरकती दाखल झाल्या आहेत. या हरकती निकालात काढण्यासाठी 550 अधिकारी तसेच कर्मचारी नियुक्त करण्यात आली आहे. पंचनामा, जिओ टॅगसह साक्षीदार अशा पद्धतीने तक्रारींचे निरसन केलं जात आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
- Rajesh Kshirsagar : राजेश क्षीरसागर ज्या चंद्रकांतदादांना हिमालयात पाठवू, पाठीत खंजीर खूपसला म्हणत होते, तेच आता एकाच फलकावर झळकले!
- Rajendra Patil yadravkar : राजेंद्र पाटील यड्रावकर म्हणतात, फक्त 'या' कारणाने एकनाथ शिंदेंना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला!
- Kolhapur Shivsena : सुनील मोदी, रविकिरण इंगवले यांच्याकडे कोल्हापूर शहरप्रमुखपदाची जबाबदारी