Lairaee Temple Stampede: मोठी बातमी! गोव्याच्या शिरगावमधील देवी लईराईच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; 7 जणांचा दुर्दैवी मृत्यू, 70 जण जखमी
Goa Lairai Temple Stampede : गोव्याच्या शिरगाव येथून मोठी बातमी समोर आली आहे. यात शिरगाव मधील प्रसिद्ध श्री लईराईच्या जत्रोत्सवामध्ये रात्री चेंगराचेंगरी झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.

Goa Lairai Temple Stampede : गोव्याच्या शिरगाव येथून मोठी बातमी समोर आली आहे. यात शिरगाव मधील प्रसिद्ध श्री लईराईच्या जत्रोत्सवामध्ये (Lairai Temple) रात्री चेंगराचेंगरी झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेत सात जणांचा मृत्यू झाला असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. तर साधारण 70 जण जखमी झाले आहेत. जखमींवर सध्या गोवा वैद्यकीय महाविद्यालयामध्ये आणि म्हापसा येथील गोवा जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांनी परिस्थितीचा आढावा घेऊन उत्तर गोवा जिल्हा रुग्णालयाला भेट दिली. तसेच त्यांनी बिचोली रुग्णालयाला भेट देऊन जखमींची विचारपूस केली. या घटनेने सर्वत्र एकच खळबळ उडाली असून मृतांचा आकडा वाढण्याचीही शक्यता बळावली आहे. मात्र ही चेंगराचेंगरी नेमकं कशामुळे झाली हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
1000 पोलिस, ड्रोनद्वारे करडी नजर, मुख्यमंत्र्यांकडून खबरदारी तरीही घटना घडली
दरम्यान, चेंगराचेंगरीच्या या घटने मागील कारण अद्याप कळू शकलेलं नाही. शिवाय मंदिर प्रशासन आणि अधिकाऱ्यांनीही या घटनेबाबत अधिकृतपणे दुजोरा दिलेला नाही. परंतु प्राथमिक अहवालानुसार गर्दी आणि योग्य व्यवस्थेच्या अभावामुळे हा अपघात झाल्याचे बोलले जात आहे. शुक्रवारी सुरू झालेल्या श्री देवी लईराईच्या यात्रेदरम्यान चेंगराचेंगरी झाली. त्यात हजारो भाविक सहभागी झाले होते. यात्रेसाठी सुमारे 1000 पोलीस तैनात करण्यात आले होते. तसेच प्रशासन देखील पूर्णपणे सतर्क होतं. गर्दीच्या हालचालींवर हवाई देखरेख ठेवण्यासाठी ड्रोन देखील तैनात करण्यात आले होते. तत्पूर्वी शुक्रवारी मुख्यमंत्री प्रमोद सावंत, त्यांच्या पत्नी, राज्यसभा खासदार सदानंद शेट तनावडे आणि आमदार प्रेमेंद्र शेट आणि कार्लोस फरेरा यांनी ही या ठिकाणी भेट दिली होती. दरम्यान अनेक सतर्कता बाळगल्या नंतरही ही घटना घडल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
Goa: A stampede during the Shirgaon Temple procession in Goa resulted in 6 deaths and 30 serious injuries. Panic spread in the crowded area, and emergency services quickly responded. Preliminary reports suggest overcrowding and lack of proper arrangements as possible causes. Goa… pic.twitter.com/dPlVYlIns2
— IANS (@ians_india) May 3, 2025
गोव्यासह देशातील अनेकांचे श्रद्धास्थान
गोव्यासह देशातील अनेकांचे श्रद्धास्थान असलेल्या लैराई देवीच्या यात्रेसाठी मोठ्या संख्येने भाविक यात्रेसाठी येत असतात. विशेषतः यावेळी काही पूजाविधी देखील केला जातो. दक्षिण गोव्यातील शिरोडा गावात असलेले हे पवित्र स्थान स्थानिक लोकांसाठी आणि जवळच्या भागातील भाविकांसाठी एक महत्त्वाचे आध्यात्मिक केंद्र आहे. या मंदिरामुळे परिसरात दारू आणि अंडी देखील निषिद्ध आहेत. सोबतच गावात कोणत्याही प्राण्याची हत्या देखील केली जात नाही.
हे ही वाचा























