एक्स्प्लोर

Gandhi Godse Ek Yudh : 'गांधी गोडसे एक युद्ध' वादाच्या भोवऱ्यात; राजकुमार संतोषी यांचा टीकाकारांना सल्ला, म्हणाले...

Rajkumar Santoshi : राजकुमार संतोषी (Rajkumar Santoshi) यांचा 'गांधी गोडसे एक युद्ध' हा सिनेमा रिलीज होण्याआधीच वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे.

Gandhi Godse Ek Yudh : 'गांधी गोडसे एक युद्ध' (Gandhi Godse Ek Yudh) हा बहुचर्चित सिनेमा येत्या 26 जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पण आता या सिनेमासंदर्भात नवी अपडेट समोर आली आहे. रिलीजआधीच हा सिनेमा वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. 

'गांधी गोडसे एक युद्ध' या सिनेमाच्या प्रमोशनला निर्मात्यांनी सुरुवात केली आहे. निर्मात्यांना काळे झेंडे दाखवण्यासोबत जोरदार घोषणाबाजी करत प्रमोशनदरम्यानच या सिनेमाला विरोध दर्शवण्यात येत आहे. गांधी विरुद्ध गोडसे या विचारधारेमधील युद्धावर भाष्य करणारा हा सिनेमा आहे. त्यामुळे आता रिलीजआधीच सिनेमाला (Gandhi Godse Ek Yudh Controversy) अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. 

अमर हुतात्मा हिंदू महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे यांनी मागणी केली आहे की, "गांधी गोडसे एक युद्ध' या सिनेमात नथुरामाला खलनायक दाखवल्यास सिनेमागृहात जाऊन या सिनेमाचे शो बंद करण्यात येतील. तसेच गोडसे यांची बाजू योग्य पद्धतीने मांडल्यास हा सिनेमा करमुक्त करावा". 

राजकुमार संतोषी म्हणाले... 

'गांधी गोडसे एक युद्ध' या सिनेमाच्या निषेधाबद्दल भाष्य करताना या सिनेमाचे दिग्दर्शक राजकुमार संतोषी (Rajkumar Santoshi) म्हणाले, "गांधी गोडसे एक युद्ध या सिनेमात महात्मा गांधी किंवा नथुराम गोडसे यांना कमी लेखण्याचा प्रयत्न करण्यात आलेला नाही. सत्यघटनेवर आधारित हा सिनेमा आहे. त्यामुळे विरोधकांनी आधी सिनेमा पाहावा आणि त्यानंतर सिनेमावर टीका करावी. गांधी आणि गोडसे या दोन्ही पात्रांना समान महत्त्व देण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे." 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Chinmay Deepak Mandlekar (@chinmay_d_mandlekar)

'गांधी गोडसे एक युद्ध' प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज!

'गांधी गोडसे एक युद्ध' हा सिनेमा 26 जानेवारी 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा राजकुमार संतोषी यांनी सांभाळली आहे. राजकुमार 9 वर्षांनी या सिनेमाच्या माध्यमातून सिनेसृष्टीत कमबॅक करत आहेत. या सिनेमाला ए.आर.रहमान यांचं संगीत लाभलं आहे. तसेच या सिनेमात दीपक अंतानी (Deepak Antani) महात्मा गांधी यांच्या (Mahatma Gandhi) भूमिकेत तर मराठमोळा अभिनेता चिन्मय मांडलेकर (Chinmay Mandlekar) नथुराम गोडसेच्या (Nathuram Godse) भूमिकेत दिसणार आहे. वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या या सिनेमाची सिने-प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rolta India : अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Israel-Hamas ceasefire in Gaza : इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 08PM TOP Headlines 08 PM 19 January 2024Sachin Tendulkar Interview at Wankhede Stadium : वानखेडेचा सुवर्णमहोत्सव, सचिन तेंडुलकर EXCLUSIVEJOB Majha : डीकेटेड  फ्रेट कोरीडोर कॉपोर्रेशन ऑफ इंडिया लि.मध्ये नोकरीची संधी, कोणत्या पदांवर जागाABP Majha Marathi News Headlines 07PM TOP Headlines 07 PM 19 January 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rolta India : अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Israel-Hamas ceasefire in Gaza : इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
Deepak Kedar : सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
Manoj Jarange Patil : तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
Beed Accident News: पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखाची मदत
पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखांची मदत
Dada Bhuse : नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून पत्ता कट, मंत्री दादा भुसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून पत्ता कट, मंत्री दादा भुसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
Embed widget