गडचिरोली : राज्यातील बहुमतांश भागात पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. मुंबईसह, उपनगराताही पावसाने जोरदार हजेरीला लावली आहे. तसेच, कोल्हापूर, पुणे, लोणावळ्यातही अनेक ठिकाणी पाणीच पाणी झाल्याचं दिसून येत आहे. विदर्भातील गडचिरोली (Gadchiroli), चंद्रपूर जिल्ह्यातही काही नद्यांना पूर आला आहे. याच पुराच्या पाण्यात एनडीआरएफचे (NDRF) जवान अनेकांसाठी देवदूत बनल्यासारखे मदतीला धावून येत आहेत. गरोदर असलेल्या कलावती (वय 20) ह्या मूळच्या आशिफाबाद, राज्य तेलंगणा येथील असून मौजा, चिक्याला, ता. सिरोंचा येथे नातेवाईकांकडे वास्तव्यास आल्या होत्या. या दरम्यान, एकीकडे पाऊस (Rain) सुरू असताना रात्री पोटात दुखायला लागल्याने स्थानिक महसूल/आरोग्य पथकाने वेळीच चिक्याला ते परसेवाडा येथील PHC टेकडा येथे भरती केले. त्यामुळे, मध्यरात्री 1.45 वाजता त्यांची नॉर्मल प्रसूती झालेली आहे.
जिल्ह्यातील बाधीत/दुर्गम भागातील गर्भवती स्त्रियांची यादी मान्सूनपूर्व तयार करुन त्यानुसार नियमित पाठपुरावा सुरू आहे. तथापि ही महिला ह्या परराज्यातील असून संबंधित भागातील PHC अंतर्गत नियमित नोंदणीकृत नसल्याने माहिती नव्हती. मात्र, माहिती प्राप्त होताच तात्काळ उपचार करण्यात आले. दरम्यान, या महिलेस रुग्णालयात नेण्यासाठी पाण्यातून मार्ग काढावा लागला. त्यावेळी, एनडीआरएफच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न केले. दुसऱ्या घटनेत कल्पना सचिन परसे (वय 32) रा. माडेमूल, ता. गडचिरोली यांना आज सकाळी सर्पदंश झालेच्या संशयावरुन त्या महिलेला सुरक्षित रित्या बाहेर काढण्यात आले. त्यानंतर तिला सामान्य रुग्णालय, गडचिरोली येथे उपचार सुरू असून महिला सुरक्षित आहे. तसेच, पायल गावडे, वय 23 वर्ष, मौजा वेंगणुर, ता. मूलचेरा इथे एका गर्भवती स्त्री ह्यांना छातीत दुखण्याबाबत स्थानिक आशा वर्कर ह्यांच्याकडून कळाले. त्यानंतर त्या महिलेला स्थानिक मूलचेरा/एटापल्ली येथील सयूंक्त आरोग्य/महसूल पथकाद्वारे सुखरुपरित्या बाहेर काढुन पुढील उपचारार्थ PHC रेगडी ह्या सरकारी इस्पितळात भरती करण्यात आले आहे.
गडचिरोली ते आरमोरी राष्ट्रीय महामार्गावर पाल नदीवर पुलावरील पाण्यात पाण्याचा अंदाज न आल्याने एक ट्रकचालक वाहनासह अडकल्याची माहिती मिळताच स्थानिक तहसीलदार/पोलीस निरीक्षक गडचिरोली, SDRF/पोलीस पथक ह्यांच्या साहाय्याने सदर वाहनचालक राजकुमार कृष्णमूर्थी, जिल्हा एलियार, राज्य तामिळनाडू ह्यांना सुखरूपरित्या बाहेर काढण्यात आले. या कामी एनडीआरएफच्या जवानांकडून स्थानिक नागरिकांना मोलाची मदत केली जात आहे. त्यामुळे, एनडीआरएफचे जवानच या ग्रामस्थांसाठी देवदूत बनल्याचं पाहायला मिळत आहे.
हेही वाचा
मनोज जरांगे अन् श्याम मानव एकच अजेंडा चालवतात, भाजपला पराभूत करा; चित्रा वाघ संतापल्या