Gadchiroli Rain News: राज्याच्या विविध भागात जोरदार पाऊस (Heavy Rain) कोसळत आहे. यामुळं काही भागात जनजीवन विस्कळीत झालं आहे. गडचिरोली (Gadchiroli) जिल्ह्यात देखील काल रात्रीपासून पावसाला सुरुवात झाली असून दक्षिण गडचिरोली भागात पावसाचा जोर जास्त आहे. अनेक मार्ग बंद  करण्यात आले आहेत. पुरामुळं बंद करण्यात आलेल्या 30 मार्गांपैकी 18 मार्ग सुरळीत सुरु झाले आहेत. तर इतर लहान मोठे 12 मार्ग अजूनही बंद स्थितीत आहेत. दरम्यानस, गोसेखुर्द धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. वैनगंगा नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. 


हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार राज्यात जोरदार पाऊस कोसळत आहे. विशेषत कोकणसह विदर्भात पावसाचा जोर अधिक असल्याचं पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी नदी नाले दुथडी भरुन वाहत आहेत. काही भागाज जनजीवन विस्कळीत झालं आहे. वाहतुकीचे मार्ग देखील बंद करण्यात आले आहेत. तसेच काही भागात शेती पिकांचं नुकसान देखील पाहायला मिळत आहे. दरम्यान, या पावसामुळं धरणांच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ होत असल्याचं पाहायला मिळत आहे. 


पुरामुळे बंद असलेले गडचिरोली जिल्ह्यातील मार्ग 


1) अहेरी देवलमारी मोयाबिनपेठा  रस्ता वट्रा नाला, देवलमारी नाला ता. अहेरी
2) लखमापूर बोरी गणपुर हळदीमाल नाला ता. चोमोर्शी 
3) भाडभिडी रेगडी देवदा रस्ता ता. चामोर्शी 
4) चामोर्शी फराळा मार्कडादेव ता. चामोर्शी 
5) वैरागड देलनवाडी रस्ता ता. आरमोरी 
6) आरमोरी अंतरंगी जोगिसाखरा रस्ता ता. आरमोरी 
7) मानापुर नंदा कलकुली रस्ता ता. आरमोरी  
8) गडचिरोली चामोर्शी राष्ट्रीय महामार्ग शिवणी नाला ता. गडचिरोली 
9) झिंगानुर कल्लेड देचलीपेठा रस्ता ता. सिरोंचा
10) आलापल्ली आष्टी राष्ट्रीय महामार्ग दिना नदी.
11) आलापल्ली भामरागड रस्ता (पर्ल कोटा नदी), (कुडकेली नाला) व (चंद्रा नाला) ता. भामरागड
12) गडचिरोली आरमोरी राष्ट्रीय महामार्ग (पाल नदी) ता. गडचिरोली


आजही राज्यात मुसळधार पावसाची शक्यता


हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, आजही राज्यात जोरदार पावसाची शक्यता आहे. आज मुंबईसह कोकणसह पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आज रायगड आणि सातारा या दोन जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळं या भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. त्याचबरोबर मुंबईसह ठाणे, पालघर, नाशिक, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर पुणे या जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर उत्तर महाराष्ट्रात आज पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे, त्याचबरोबर विदर्भातील चंद्रपूर, नागपूर, वाशिम आणि अमरावती या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. 


महत्वाच्या बातम्या:


राज्यात पावसाचा जोर वाढला, आज मुंबईसह कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात अतिमुसळधार पावसाचा इशारा, जाणून घ्या राज्यातील हवामानाचा अंदाज