Gadchiroli News गडचिरोली : एकीकडे लोकसभा निवडणुकीची (Lok Sabha Election 2024) धामधूम सुरु आहे. तर दुसरीकडे काँग्रेस (Congress) पक्षाला एका मागे धक्के बसत आहेत. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी काँग्रेसला सोडचिट्ठी देत भाजपात प्रवेश केला. मिलिंद देवरा (Milind Deora) यांनी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेची वाट धरली. त्यानंतर बाबा सिद्दिकी (Baba Siddique) यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश केला. यापाठोपाठ आता गडचिरोली काँग्रेसला एक मोठा धक्का बसला आहे.
गडचिरोलीतील काँग्रेसचे नेते महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे महासचिव आणि आदिवासी काँग्रेस अध्यक्ष माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला आहे. गडचिरोली चिमूर लोकसभा मतदारसंघ निवडणुकीत तिकीट न दिल्याने ते नाराज आहेत.
डॉ. नामदेव उसेंडी 2008 पासून काँग्रेसमध्ये कार्यरत
डॉ. नामदेव उसेंडी (Dr Namdeo Usendi) हे 2008 पासून काँग्रेसमध्ये कार्यरत असून 2009 मध्ये ते आमदार म्हणून निवडून आले होते. त्यानंतर 2014 आणि 2019 मध्ये काँग्रेसतर्फे त्यांनी लोकसभेची निवडणूक लढवली होती. मात्र त्यांना दोन्ही वेळा पराभवाचा सामना करावा लागला होता. यंदाच्या निवडणुकीतही डॉ. नामदेव उसेंडी इच्छुक होते. मात्र गोंदिया जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष डॉ. नामदेव किरसान (Dr Namdeo Kirsan) यांना काँग्रेसने उमेदवारी जाहीर केली. यामुळे डॉ. नामदेव उसेंडी यांनी पक्षाच्या पदाचा राजीनामा देल्याचे बोलले जात आहे. तसेच काँग्रेस (Congress) पक्ष सोडण्याचेही त्यांनी संकेत दिले आहेत.
याआधी वडेट्टीवारांच्या कट्टर समर्थकांचा भाजपात प्रवेश
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच भाजपने (BJP) गडचिरोली काँग्रेसला मोठा धक्का दिला होता. गडचिरोली जिल्ह्यातील काँग्रेस नेते डॉ. नितीन कोडवते (Dr Nitin Kodwate) व त्यांच्या पत्नी डॉ. चंदा कोडवते (Dr Chanda Kodwate) यांनी भाजपमध्ये प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांच्या उपस्थितीत पक्षात प्रवेश केला होता. डॉ. कोडवते दांपत्य हे राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांचे कट्टर समर्थक मानले जात होते. मात्र त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने विजय वडेट्टीवार यांनादेखील मोठा धक्का बसला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
राजू शेट्टी यांनी पाठिंबा न घेतल्यास उमेदवार देणार, हातकणंगले लोकसभेसाठी मविआची स्ट्रॅटेजी ठरली!