Satara Lok Sabha Constituency: सातारा : गेल्या अनेक दिवसांपासून साताऱ्याच्या (Satara Lok Sabha Election 2024) जागेवरुन महायुती (Mahayuti) आणि महाविकास आघाडीमध्ये (Maha Vikas Aghadi) खलबतं सुरू आहेत. अशातच आता साताऱ्याबाबत एक मोठी बातमी समोर येत आहे. सातारा लोकसभेसाठी छत्रपती उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांची भाजपकडून (BJP) उमेदवारी निश्चित करण्यात आली आहे. अशी माहिती भाजपचे विद्यमान खासदार रणजीत नाईक निंबाळकर (Ranjit Naik-Nimbalkar) यांनी दिली आहे. उदयनराजेंची उमेदवारी निश्चित करण्यात आली असून उद्याच घोषणा होण्याची शक्यता असल्याची माहितीही रणजीत नाईक निंबाळकरांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे. दरम्यान, भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबत झालेल्या भेटीनंतर निंबाळकरांनी ही माहिती दिली आहे. 


भाजपचे विद्यमान खासदार रणजीत नाईक निंबाळकर बोलताना म्हणाले की, "सातारा लोकसभेसाठी छत्रपती उदयनराजे भोसले यांची भाजपकडून उमेदवारी निश्चित करण्यात आली आहे. उद्या घोषणा होण्याची शक्यता आहे. पश्चिम महाराष्ट्र महायुतीच्या प्रचाराचा नारळ माढा लोकसभेतील माळशिरस येथे फुटणार आहे." तसेच, यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सर्व सहयोगी पक्षाचे नेते उपस्थित राहणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. यानंतर उपमुख्यमंत्री आपले कुलदैवत असणाऱ्या निरा नरसिंहपूर येथे जावून नरसिंहाचं दर्शन घेणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. 


साताऱ्यात झळकले उदयनराजेंचे पोस्टर्स 


उद्या उदयनराजेंचा साताऱ्यात भव्य स्वागत सोहळा पार पडणार आहे. शिरवळपासून साताऱ्यात ठिकठिकाणी स्वागत केलं जाणार आहे. अद्याप उदयनराजेंना पक्षाकडून उमेदवारी जाहीर करण्यात आलेली नाही. अशातच तिकीट जाहिर होण्या आगोदरच उदयनराजेंच्या स्वागताची जय्यत तयारी सुरू आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. भाजपकडून ग्रीन सिग्नल मिळाल्याची माहिती मिळाली असल्याचं कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे. 


सातारा सोडतो, नाशिक आम्हाला द्या; अजित पवार गटाची मागणी 


साताऱ्यात उद्या उदयनराजेंचा भव्य सत्कार केला जाणार आहे, असे पोस्टर्स फिरू लागले आहेत. तर दुसरीकडे राष्ट्रवादीला बारामती, रायगड, शिरूर, नाशिक आणि परभणी या पाच जागा मिळणार अशी माहिती मिळत आहे. म्हणूनच, राष्ट्रवादीने साताऱ्यावरील आग्रह सोडला का?  असा प्रश्न निर्माण होत आहे. दुसरीकडे सातारा लोकसभा भाजपला सुटत असेल तर बदल्यात नाशिक आम्हाला सोडा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस भाजपकडे करत असल्याचंही समोर आलं आहे. 


नाशिक लोकसभेत भाजपचे तीन आमदार आहेत. राष्ट्रवादीचे दोन आमदार तर काँग्रेसचा एक आमदार आहे. त्यामुळे ही जागा आम्हाला मिळाली पाहिजे, अशी भाजपची मागणी आहे. दुसरीकडे सातारा लोकसभा भाजपला सुटत असेल तर बदल्यात नाशिक आम्हाला सोडा, अशी राष्ट्रवादीची भूमिका आहे. यामध्ये एकनाथ शिंदेंची मात्र मोठी अडचण झाली आहे. नाशिकमध्ये तुमची ताकद नाही त्यामुळे ती जागा आम्हाला सोडा अशी भाजप आणि राष्ट्रवादीची भूमिका आहे. पण हेमंत गोडसे हे शिवसेनेचे विद्यमान खासदार असताना आम्ही नाशिक लोकसभा सोडणार नाही, अशी शिंदेंची भूमिका आहे.  


पाहा व्हिडीओ : Satara Lok Sabha : सातारा लोकसभेचा आग्रह राष्ट्रवादीनं सोडला? शिंदे गटाची अडचण? : ABP Majha



महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Mahayuti Seat Sharing : राष्ट्रवादीनं साताऱ्यावरील आग्रह सोडला? "सातारा सोडतो पण त्या बदल्यात..."; राष्ट्रवादीच्या प्रस्तावानं महायुतीत नवा तिढा