Gadchiroli Rain : राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस सुरु आहे. राज्यातील काही जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. गडचिरोलीत देखील पावसानं धुमाकूळ घातला आहे. जिल्ह्यातील आलापल्ली शहराला पूर आला आहे. त्यामुळं तेथील काही गावांचा संपर्क तुटला आहे. त्यामुळं तेथील जनजीवन विस्कळीत झालं आहे. काही गावातही पाणी शिरलं आहे. त्यामुळं नागरिकांमध्ये भितीचं वातावरण निर्माण झालं आहे. दरम्यान, प्रशासनानं नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.

  
गडचिरोली जिल्ह्यातील आलापल्ली शहराला पूर आला आहे. अनेक घरे पाण्याखाली गेली आहेत. शहरातील नागेपल्ली, बजरंग चौक, सावरकर चौक, FDCM कॉलनी, गोंडमोहल्ला, मन्नेवार कॉलनी या परिसरातील अनेक घरात मध्यरात्री पाणी शिरलं होतं. त्यामुळं जनजीवन विस्कळित झालं आहे. सद्या पुराचं पाणी उतरु लागलं आहे. शहरालगत असलेल्या नाल्यांना पूर आल्यानं शहरात पुराचं पाणी शिरलं होत. सद्या पुराचं पाणी ओसरु लागल्यानं आलापल्ली चंद्रपूर मार्गावरील वाहतूक संथ गतीनं सुरु झाली आहे.




पुढील 2 दिवस रेड अलर्ट 


गडचिरोलीला पावसाचा जोरदार तडाखा बसलाय. दरम्यान, पुढील 2 दिवस गडचिरोलीत रेड अलर्ट देण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडून खबरदारीचे उपाय करण्यात येत आहेत. पुढील 3 दिवस शाळा आणि कॉलेजला सुट्टी देण्यात आली आहे. तसंच अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकानं बंद राहणार आहेत. मात्र, शासकीय कार्यालयं सुरु राहणार आहेत. गडचिरोलीच्या भामरागड-आलापल्ली मार्गावरील अनेक नदी नाल्यांना पूर आलाय. त्यापैकी तुमर्गुंडा नाल्यावर पर्यायी रस्ता वाहून गेल्यानं ग्रामस्थांना अडचणीचा सामना करावा लागतोय. या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. पर्यायी रस्ताच वाहून गेल्यानं जीव मुठीत घेऊन प्रवास करण्याची वेळ इथल्या ग्रामस्थांवर आली आहे.  या पावसाच्या पार्श्वभूमीवर शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे. अधिकाऱ्यांना देखील मुख्यालयात राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच NDRF ची टीम आणि SDRF च्या टीमला देखील सूचना देण्यात आल्या आहेत. 


महत्त्वाच्या बातम्या: