Konkan Land Slide News : गेल्या वर्षी कोकणात अतिवृष्टीनं (Konkan Rain Updates) हाहाकार माजवला होता. या अतिवृष्टीनं गावच्या गावं पाण्याखाली गेली होती. सोबतच काही ठिकाणी दरडी कोसळून जीवितहानी देखील झाली होती. चिपळूणमधील पेढे - कुंभारवाडी परशुराम गावात गतवर्षी अतिवृष्टीत दरड कोसळून तिघांचा मृत्यू झाल्याची दुर्घटना घडली होती. या प्रकरणी  9 अधिकाऱ्यांवर  सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


या घटनेस मुंबई गोवा महामार्ग चौपदरीकरणाचे काम करणाऱ्या कल्याण टोलवेज इन्फ्रट्रक्चर कंपनीच्या संचालकासह राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांवर निष्काळजीपणाचा ठपका ठेवला आहे. या प्रकरणी कंपनीच्या अधिकाऱ्यांसह राष्ट्रीय महामार्गाचे कार्यकारी अधिकारी आणि शाखा अभियंता अशा 9 जणांवर चिपळूण पोलिस स्थानकात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 





गतवर्षी 22 जुलै रोजी अतिवृष्टीमुळे चिपळूणला महापुराचा फटका बसला आणि सारं चिपळूण शहर उध्वस्त झालं. अतिमुसळधार पडणाऱ्या या पावसामुळे तालुक्यातील परशुराम घाटाखालील पेढे कुंभारवाडी येथील घरावर दरड खाली आली आणि यात तिघांचा मृत्यू झाला.मुंबई गोवा महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम गेले काही वर्षे सुरु आहे. यात चिपळूण नजीकचा परशुराम घाटाचे काम चौपदरीकरणाचे काम सुरु झाले. या अर्धवट कामाचा फटका घाटा खाली असलेल्या घरांना बसला.

 

अर्धवट स्थितीत असलेल्या कामामुळे घाटातील दरड पेढे - कुंभारवाडी येथील घरांवर खाली आली आणि घरे क्षणांतच जमीनदोस्त झाली.यात तिघांचा मृत्यू झाला.त्यानंतर गावकऱ्यांनी प्रशासनाकडे वारंवार मागणीही केली. कंपनी आणि ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी करत त्यासाठी गावकरी उपोषणालाही बसले. पण काहीच झाले नाही. नंतर गावकऱ्यांनी मुंबई उच्च न्यायालयाचे ॲड.ओवेस पेचकर यांच्याकडे जाऊन दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा यासाठी धडपड सुरु केली. त्यानंतर ॲड.पेचकर यांनी अशा स्वरुपातील गुन्हा दाखल करण्यासाठीचा मागणी अर्ज चिपळूण न्याय दंडाधिकारी यांच्याकडे देत न्यायालयीन लढा सुरु ठेवला. त्यातून या लढ्याला आज पहिल्याच टप्प्यात मोठं यशही आलं.

 

या घटनेसाठी जबाबदार धरत मुंबई गोवा महामार्ग चौपदरीकरणाचे काम करणाऱ्या कल्याण टोलवेज इन्फ्रट्रक्चर कंपनीच्या संचालकासह राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांवर निष्काळजीपणाचा ठपका ठेवला आहे. या प्रकरणी कंपनीच्या अधिकाऱ्यांसह राष्ट्रीय महामार्गाचे कार्यकारी अधिकारी आणि शाखा अभियंता अशा 9 जणांवर चिपळूण पोलिस स्थानकात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.




इतर महत्वाच्या बातम्या


Maharashtra Mumbai Rain : राज्याच्या विविध भागात पावसाची जोरदार हजेरी, गडचिरोलीत अतिवृष्टीचा इशारा


Maharashtra Mumbai Rain LIVE Updates : गडचिरोली जिल्ह्यात पुढील तीन दिवस अतिवृष्टीचा इशारा, शाळा महाविद्यालयंं बंद