Flood Situation : देशातील अनेक राज्यांमध्ये सध्या मुसळधार पाऊस सुरु आहे. काही राज्यांमध्ये अतिवृष्टी आणि पुरामुळं जनजीवन विस्कळीत झालं आहे. अनेक ठिकाणी नदी नाल्यांना पूर आले आहेत. शेती पिकांचंही मोठं नुकसान झालं आहे. महाराष्ट्रात देखील काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. पूर आणि अतिवृष्टीमुळं राज्यात आत्तापर्यंत 76 जणांचा मृत्यू झाला आहे. तर गुजरामध्ये या स्थितीमुळं आत्तापर्यंत 63 जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, देशातील गुजरात, महाराष्ट्र, हिमाचल प्रदेश आणि कर्नाटक या राज्यांमध्ये हवामान विभागानं 'रेड अलर्ट' जारी केला आहे.


पुढचे 72 तास गुजरात, महाराष्ट्र, हिमाचल प्रदेश आणि कर्नाटक या राज्यासाठी महत्वाचे आहेत. कारण या ठिकाणी मुसळदार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. या काळात नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळं काही जिल्ह्यात जनजीवन विस्कळीत झालं आहे. विशेषत: मराठवाडा आणि विदर्भात या अतिवृष्टीचा मोठा फटका बसला आहे. या पूर आणि अतिवृष्टीत आत्तापर्यंत राज्यातील 76 जमांचा मृत्यू झाला आहे. अनेक ठिकाणी नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. नदीकाठच्या गावांना प्रशासनानं सतर्कतेचा इशाराही दिला आहे. अनेक ठिकाणी नागरिकांचे स्थलांतर करण्याचं काम सुरु आहे. महाराष्ट्रातील गडचिरोलीमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. वैनगंगा नदीला पूर आला आहे. त्यामुळं अनेक गावांमध्ये पाणी शिरलं आहे.  तसेच नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. याचा वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. अनेक ठिकाणचे रस्ते वाहून गेले आहेत.




या जिल्ह्यांमध्ये रेड आणि ऑरेंज अलर्ट


महाराष्ट्रातील 6 जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. यामध्ये पालघर, नाशिक, पुणे, रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर यांचा समावेश आहे तर ठाणे, सातारा, सिंधुदुर्ग, औरंगाबाद, जालना, चंद्रपूर आणि गडचिरोली येथेही अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. ठाणे, सातारा, सिंधुदुर्ग, औरंगाबाद, जालना, चंद्रपूर, गडचिरोली या सात जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट. गेल्या 10 दिवसांपासून महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मुसळदार पाऊस कोसळत आहे. 


महत्वाच्या बातम्या: