एक्स्प्लोर

Prakash Amte : कर्करोगावर मात करून डॉक्टर प्रकाश आमटे हेमलकसात परतले; प्रकल्पवासियांकडून उत्साहात स्वागत

डॉक्टर प्रकाश आमटे तीन महिन्यांच्या दीर्घ कालावधीनंतर हेमलकसा प्रकल्पात परतले. यावेळी बिरादरीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोषात त्यांचं स्वागत केलं.

Prakash Amte : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम हेमलकसाचे आदिवासी उत्थानासाठी उभारलेल्या लोक बिरादरी प्रकल्पाचे प्रमुख डॉक्टर प्रकाश आमटे तीन महिन्यांच्या दीर्घ कालावधीनंतर प्रकल्पात परतले. यावेळी बिरादरीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोषात त्यांचं स्वागत केलं. यंदाच्या जून महिन्यात पुणे प्रवासादरम्यान त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने पुण्याच्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 

चाचण्यादरम्यान त्यांना कर्करोगाचे निष्पन्न झाल्यानंतर मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरू केले होते. याच दरम्यान उपचार कक्षात फिरत असताना कोसळल्याने त्यांचे हाताच्या हाड देखील मोडले होते. या दोन्ही संकटांवर मात करत डॉक्टर प्रकाश आमटे दीर्घ कालावधीनंतर लोक बिरादरी प्रकल्पात परतताच डॉक्टर प्रकाश आणि डॉक्टर मंदा आमटे यांचे प्रकल्पातील शाळेच्या विद्यार्थ्यांनी पारंपरिक लेझीमच्या तालावर जल्लोषात स्वागत केले. 

यावेळी 650 विध्यार्थी व शिक्षक कर्मचारी उपस्थित होते. डॉक्टर प्रकाश यांनी देखील प्रकल्पातील कार्यकर्ते आणि शालेय विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधला. या कठीण समयी प्रकल्प आणि आमटे कुटुंबीयांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणाऱ्या सर्वांचे आमटे कुटुंबीयांनी आभार व्यक्त केले आहेत. डॉक्टर प्रकाश यांना थकवा जाणवत असून काही दिवसात ते आपली दैनंदिनी सुरू करतील अशी माहिती प्रकल्पाच्या वतीने देण्यात आली आहे.

फेसबुक पोस्ट करत व्यक्त केला आनंद

6 जून 2022 ते 6 सप्टेंबर 2022....3 महिन्यांनी...रक्ताच्या कर्करोगावर यशस्वी मात करून...फायनली पोहोचले बाबा स्वतःच्या कर्मभूमी मध्ये लोक बिरादरी प्रकल्प हेमलकसा येथे आज संध्याकाळी साडेचार वाजता. अतिशय आनंद झाला सर्वांना. शाळेतील विद्यार्थ्यांनी, शिक्षकांनी, कार्यकर्त्यांनी जोरदार स्वागत केले. आनंदी आनंद गडे...जिकडे तिकडे चोहीकडे...अनुभुती आली... खूप खूप आभार दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल पुणे येथील सर्व तज्ञ डॉक्टर्स आणि स्टाफ यांचे. खूप खूप आभार ज्यांनी या अडचणीत मदत केली आणि ज्यांनी खूप खूप शुभेच्छा दिल्या. सध्या थकवा आला आहे प्रवासाचा...अश्यक्तपणा आहे..., अशी पोस्ट करत अनिकेत आमटे यांनी आनंद व्यक्त केला आहे. 

आदिवासींसाठी महत्वाचं योगदान
आदिवासींना मुख्य प्रवाहात आणावं, त्यांची पिळवणूक थांबावी आणि त्यांना माणूस म्हणून जगण्याची संधी मिळावी डॉ. प्रकाश आमटे यांनी त्यांच्या हेमलकसाच्या ‘लोकबिरादरी प्रकल्पा’तून अनेक वर्षे करत आहेत. त्यांच्या या कार्यात त्यांची पत्नी डॉ. मंदाताई देखील सामील झाल्या. आमटे कुटुंबियांची चौथी पीढी या प्रकल्पाच्या माध्यमातून आदिवासींना सेवा देत आहेत. सामाजिक कार्यासाठी ‘रेमन मॅगसेसे’ (Ramon Magsaysay) हा जागतिक पातळीवरचा पुरस्कार डॉ. प्रकाश आमटे यांना देण्यात आला आहे. दुर्गम भागात गेली चार दशकं सुरु असलेल्या नि:स्वार्थ कामाची ही ओळख संस्मरणीय तर ठरतेच पण आबालवृद्धांना प्रेरणाही देते.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त, पिंपरी चिंचवड येथील घटना
महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त
माज आणि मुजोरी! पुण्यात नशेखोर युवकानं भररस्त्यात पोलिसाला केली मारहाण 
माज आणि मुजोरी! पुण्यात नशेखोर युवकानं भररस्त्यात पोलिसाला केली मारहाण 
Team India: मोहम्मद शामी टीम इंडियात, इंग्लंडविरुद्ध भारताचा 15 जणांचा संघ जाहीर
Team India: मोहम्मद शामी टीम इंडियात, इंग्लंडविरुद्ध भारताचा 15 जणांचा संघ जाहीर
बीड बदनाम आपोआप होत नाही, तुम्ही भावा-बहिणीने बदनाम केलं; पंकजा मुंडेंवर संतापल्या दमानिया
बीड बदनाम आपोआप होत नाही, तुम्ही भावा-बहिणीने बदनाम केलं; पंकजा मुंडेंवर संतापल्या दमानिया
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vile Parle Redevelopment | 360 च्या बदल्यात 1400 स्क्वेअर फुटचं घर Special ReportRajkiya Shole Beed MCOCA | देशमुख हत्येप्रकरणी 8 जणांना मकोका, अडकणार 'आका' Special ReportRajkiya Shole on MVA | ठाकरेंच्या सेनेच्या स्वबळाचा नारा, मविआचं ब्रेकअप? Special ReportSantosh Deshmukh Case | संतोष देशमुखांच्या हत्येच्या आधी काय घडलं? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त, पिंपरी चिंचवड येथील घटना
महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त
माज आणि मुजोरी! पुण्यात नशेखोर युवकानं भररस्त्यात पोलिसाला केली मारहाण 
माज आणि मुजोरी! पुण्यात नशेखोर युवकानं भररस्त्यात पोलिसाला केली मारहाण 
Team India: मोहम्मद शामी टीम इंडियात, इंग्लंडविरुद्ध भारताचा 15 जणांचा संघ जाहीर
Team India: मोहम्मद शामी टीम इंडियात, इंग्लंडविरुद्ध भारताचा 15 जणांचा संघ जाहीर
बीड बदनाम आपोआप होत नाही, तुम्ही भावा-बहिणीने बदनाम केलं; पंकजा मुंडेंवर संतापल्या दमानिया
बीड बदनाम आपोआप होत नाही, तुम्ही भावा-बहिणीने बदनाम केलं; पंकजा मुंडेंवर संतापल्या दमानिया
काळी जादू, अंड्यातून खिळा काढला, 8 लाखांना मृतदेह विकत घेतला; महिलेस गंडवणाऱ्या भोंदूबाबाला बेड्या
काळी जादू, अंड्यातून खिळा काढला, 8 लाखांना मृतदेह विकत घेतला; महिलेस गंडवणाऱ्या भोंदूबाबाला बेड्या
वाल्मिकचा सहकारी पैसे नेतानाचा फोटो समोर, 140 यंत्र मालकांचे 11 कोटी; परत मागितल्यास दिली धमकी
वाल्मिकचा सहकारी पैसे नेतानाचा फोटो समोर, 140 यंत्र मालकांचे 11 कोटी; परत मागितल्यास दिली धमकी
जिल्हा परिषदेच्या आदिवासी शाळेतील विद्यार्थ्यांची कमाल, फाडफाड इंग्लिश बोलणं, दोन्ही हातांनी लिखाण, टॅलेंट पाहून तुम्हीही थक्क व्हाल!
जिल्हा परिषदेच्या आदिवासी विद्यार्थ्यांची कमाल, फाडफाड इंग्लिश बोलणं, दोन्ही हातांनी लिखाण, टॅलेंट पाहून तुम्हीही थक्क व्हाल!
Ajit pawar: बारामतीत अजित पवारांनी रिबीन कापली, सुप्रिया सुळेंनी टाळ्या वाजवल्या; पण दादा-ताईंचा अबोला कायम
बारामतीत अजित पवारांनी रिबीन कापली, सुप्रिया सुळेंनी टाळ्या वाजवल्या; पण दादा-ताईंचा अबोला कायम
Embed widget