Gadchiroli Naxal: महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवर नक्षलवादी-जवानांमध्ये भीषण चकमक; साडेचार वर्षांत C-60चा पहिला जवान शहीद, 1 जखमी
जिल्ह्याच्या छत्तीसगड सीमेवरील भामरागड तालुक्यातील दिरंगी आणि फुलनार गावच्या जंगल परिसरात आज(11 फेब्रुवारी) पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक उडाली .या चकमकीत एक जवान शहीद, तर एक जखमी आहे.

गडचिरोली : जिल्ह्याच्या छत्तीसगड सीमेवरील भामरागड तालुक्यातील दिरंगी आणि फुलनार गावच्या जंगल परिसरात आज(11 फेब्रुवारी) पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक (Naxal Encounter) उडाली. या चकमकीत एक पोलीस जवान शहीद, तर एक पोलीस जवान जखमी झाला असल्याची माहिती पुढे आली आहे. या जखमी जवानावर गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू असून महेश नागुलवार असे शहीद जवानाचे नाव आहे.
पुढे आलेल्या माहितीनुसार, फुलणार आणि दिरंगी गावाच्या जंगलात नक्षलवाद्यांचा (Gadchiroli Naxal) कॅम्प लागल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. सीआरपीएफ आणि गडचिरोली पोलिसांचे 18 सी -60 पथक नक्षल अभियानावर होते. आज सकाळच्या सुमारास नक्षलवाद्यांसोबत चकमक उडाली. दरम्यान दिवसभर ही चकमक चालली असून सुरक्षा दलाच्या संयुक्त पथकाने नक्षल तळ उध्वस्त केला. मात्र एका जवानाच्या पोटाला गोळी लागल्याने ते शहीद झाले. तर दुसऱ्या जवानाच्या पायाला गोळी लागल्याने ते जखमी आहेत.
नक्षलवाद्यांविरोधातील मोहिमेत शहीद होणारा सी- 60 चा पहिला जवान
या कारवाईमधील महत्वपूर्ण बाब म्हणजे शहीद होणारा जवान गडचिरोली पोलिसांच्या सी सिक्सटी पथकाचा असून 14 ऑगस्ट 2020 नंतर नक्षलवाद्यांविरोधात शहीद होणारा गडचिरोलीमधील हा पहिला जवान आहे. गेली साडेचार वर्ष गडचिरोली पोलीस एकही कॅज्युअलटी शिवाय नक्षलवाद्यांशी लढा देत होते. मात्र आज दुर्दैवाने सी- 60चा एक जवान शहीद झाला आहे.
पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे फुलणार आणि दिरंगी गावाच्या जंगलात नक्षल छावणी उभारण्यात आल्याचे कळाले होते. या गोपनीय माहितीच्या आधारे सीआरपीएफ आणि गडचिरोली पोलिसांचे 18 सी -60 पथक अभियानावर होते. आज सकाळच्या सुमारास नक्षलवाद्यांसोबत चकमक उडाली. सुमारे दिवसभर ही चकमक चालली. सुरक्षा दलाच्या संयुक्त पथकाने नक्षल तळाचा भंडाफोड केला असून अनेक साहित्य व सामान पथकाने जप्त केले आहे. C-60 च्या एका जवानाला गोळी लागल्याने त्याला हेलिकॉप्टरने गडचिरोली आणि त्यानंतर नागपूरला हलवले.
छत्तीसगडच्या अरनपूरमध्ये नक्षलवाद्यांकडून आईईडी ब्लास्ट
दुसरीकडे, छत्तीसगडच्या दंतेवाडा जिल्ह्यातील अरनपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एक मोठी बातमी समोर आली आहे. यात नक्षलवाद्यांकडून करण्यात आलेल्या आईईडी (IED) मोठा ब्लास्ट झाला आहे. यात सीआरपीएफ 231 तुकडीच्याच्या एका जवानाचा पाय आईईडीच्या वर आल्याने हा स्पोट झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या ब्लास्टमध्ये एका जवानाचे दोन्ही पाय निकामी, तर एक जवान किरकोळ जखमी झाला आहे. अरनपूर क्षेत्रातील कमलपोस्ट परिसरात नक्षली असल्याच्या माहितीवरून पोलिसांनी सर्च ऑपेरेशन सुरु केले होते दरम्यान ही घटना घडली आहे. यातील जखमी जवानाला तातडीने जिल्हा रुग्णालय दंतेवाडा येथे भरती करण्यात येत आहे. गेल्या रविवारी छत्तीसगडच्या बिजापूर जिल्ह्याच्या इंद्रावती राष्ट्रीय अभयारण्याच्या जंगलात झालेल्या चकमकीत जवानांनी 31 नक्षलवाद्यांना कंठस्नान घातले होते. त्यानंतर नक्षलवाद्यांकडून ही आता मोठा ब्लास्ट केला आहे.
हे ही वाचा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

