एक्स्प्लोर
Advertisement
वऱ्हाडासह नवरदेव शेतकरी आंदोलनात सहभागी
बारामती: शेतकरी संपाला पाठिंबा दर्शवण्यासाठी राज्यभर बंद, रास्ता रोको करण्यात येत आहेत. आज बारामती तालुक्यातल्या कोऱ्हाळे बुद्रूक येथील शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केलं.
यावेळी लग्नासाठी निघालेल्या वऱ्हाडातील अतुल भोईटे या नवरदेवानं उत्स्फूर्तपणे या आंदोलनात सहभागी होत घोषणाबाजी केली.
अतुल भोइटे हे वाघोली येथील रहिवासी आहेत. त्यांचा विवाह बारामती तालुक्यातल्या माळेगाव येथे होतोय. माळेगावला जात असताना त्यांनी कोऱ्हाळे येथे थांबून आंदोलनात सहभागी होत शेतकऱ्यांविषयी आत्मियता दाखवून दिली.
https://twitter.com/abpmajhatv/status/871633481876381696
राज्यभरात बंद
शेतकऱ्यांच्या संपाला पाठिंबा दर्शवत आज राज्यात बहुतांश ठिकाणी बंदची हाक देण्यात आली आहे. बीड, परभणी, अमरावती, बुलडाणा, धुळे, पंढरपूरमध्ये आज बंद पाळण्यात आला आहे.
बीडमधील अंबाजोगाई, परळी, आष्टीसह इतर शहरांमध्ये सकाळपासून व्यापाऱ्यांनी दुकानं बंद ठेवली आहेत.
परभणीतही राज्यव्यापी बंदला जिल्ह्यात मोठा प्रतिसाद मिळताना दिसतोय. गंगाखेड शहरात आठवडी बाजार सुरू होताच शेतकरी संघटनांनी बाजार बंद करण्याचं आव्हान दिलं, मात्र यावेळी व्यापारी आणि संघटनेत गोंधळ उडाला, भाजीपाला फेकून देण्यात आला, त्यानंतर संघटनेनं बाजारच उधळून लावला.
तर तिकडे अमरावती जिल्ह्यातील वरूडमध्ये आणि बुलडाण्यातील संग्रामपूर जानेफळ आणि लाखनवाडा तसंच मोताळा तालुका शेतकऱ्यांच्या संपाला पाठिंबा देण्यासाठी व्यापाऱ्यांनी बंद ठेवला.
शिवाय धुळे जिल्ह्यातील साक्री आणि पिंपळनेरसह इतर सर्व बाजार समित्या बंद ठेवण्यात आल्या आहेत. तर तिकडे पुणतांब्यातही मार्केटमध्ये शुकशुकाट आहे.
शेतकरी सुकाणू समिती
शेतकरी आंदोलनाची पुढची दिशा ठरवण्यासाठी शेतकऱ्यांची नवी सुकाणू समिती नेमण्यात आली आहे. या आंदोलनातील नावांवर नजर टाकली तर ज्येष्ठ शेतकरी नेते शरद जोशींच्या शिष्यांचा यामध्ये प्रामुख्यानं समावेश आहे. राजू शेट्टींपासून बच्चू कडू, गिरधर पाटील, विजय जावंधिया यांच्यासह अनेक शेतकरी चळवळीतले नेते यामध्ये एकत्र आले आहे.
या समितीतर्फे आता शेतकरी आंदोलनाची पुढची दिशा ठरवली जाणार आहे.
संबंधित बातम्या
LIVE UPDATE : राज्यातील शेतकऱ्यांचा महाराष्ट्र बंद
शेतकरी आंदोलनासाठी 21 जणांची नवी सुकाणू समिती
आम्ही शेतकरी संपात सहभागी नाही: माथाडी नेते
नाशिकमध्ये उत्स्फूर्त बंद, सलग पाचव्या दिवशी व्यवहार ठप्प
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
महाराष्ट्र
Advertisement