नागपूरः लक्ष्मीनारायण इन्सिटट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (एलआयटी)च्या विद्यार्थ्यांनी एलआयटी तसेच शहराचे नाव देशभरात उंचवले आहे. मात्र शिक्षकेतर व तांत्रिक कर्मचाऱ्यांच्या रिक्त पदे भरण्याबाबत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ अनेक वर्षांपासून उदासिन असल्याने अखेर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला विद्यापीठाला आदेश द्यावे लागले. पुढील सात दिवसात आवश्यक कारवाई करा असे आदेश हायकोर्टाने दिले.


एलआयटीमधील रिक्त पदांबाबत माजी विद्यार्थी संघटनेच्या प्रसन्न सोहळे यांनी  जनहित दाखल केली आहे. त्यावर न्यायमूर्तीद्वय सुनील शुक्रे व गोविंद सानम यांच्यासमक्ष सुनावणी झाली. दरम्यान न्यायालयाने एलआयटीमधील रिक्त पदे व इतर समस्यांची गंभीर दखल घेऊन हा आदेश दिला. तसेच एलआयटीमध्ये सध्या कोणत्या विभागातील किती पदे रिक्त आहेत. याची माहिती येत्या 6 जुलैपूर्वी सादर करण्यास सांगितले. या आदेशाची अंमलबजावणी करण्यात अपयश आल्यास जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशाराही दिला. याशिवाय विद्यापीठाच्या कुलसचिवांना पुढील सुनावणीवेळी न्यायालयात प्रत्यक्ष उपस्थित राहण्याचे निर्देश दिले.


विद्यापीठाचे दुर्लक्ष


ही याचिका प्रलंबित असताना एलआयटीमधील प्रश्नांचा अभ्यास करणे व त्यावर उपाय सुचविण्यासाठी डॉ. गणपती यादव समिती स्थापन केली होती. समितीने सादर केलेल्या अहवालानुसार त्यावेळी एलआयटीमध्ये शिक्षकांची 245 पदे रिक्त होती. 31 शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची गरज असताना केवळ 9 कर्मचारी कार्यरत होते. याशिवाय अनेक महत्वाची पदे भरणे आवश्यक होते. परंतु, परिस्थितीत अद्यापही समाधानकारक परिवर्तन झालेले नाही. परिणामी संस्थेचे विद्यार्थी गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळण्यापासून वंचित राहतात असे याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे.


इतर महत्वाच्या बातम्या


Eknath Shinde : शिवसेनेची मोठी कारवाई, एकनाथ शिंदेंना शिवसेना नेतेपदावरुन हटवले


Plastic Ban : 93 प्रतिष्ठानांवर कारवाई; 4.80 लक्ष रुपयांचा दंड वसूल


Nagpur : विभागातील 6 जिल्ह्यातील एकुण 70 शासकीय वसतिगृहासाठी प्रवेशप्रक्रिया सुरू


Nagpur ZP : जिल्ह्यात दोन नवीन प्राथमिक आरोग्य केंद्र व पाच उपकेंद्र उभारणार