Indian Prisoner In Pakistan Jail: पाकिस्तानने शुक्रवारी सांगितले की, त्यांच्या तुरुंगात 682 भारतीय कैदी आहेत. भारत आणि पाकिस्तानने एकमेकांकडे बंदिस्त असलेल्या कैद्यांची यादी शेअर केली, तेव्हा ही माहिती समोर आली. 2008 मध्ये झालेल्या करारानुसार तुरुंगात बंद असलेल्या नागरी कैदी आणि मच्छिमारांची यादी दोन्ही देशांनी एकमेकांना सुपूर्द केली. याच यादीच्या देवाणघेवाणीदरम्यान, पाकिस्तानने आपल्या तुरुंगात बंद असलेल्या भारतीय कैद्यांच्या संख्येची पुष्टी केली आहे.


ही यादी वर्षातून दोनदा 1 जानेवारी आणि 1 जुलै रोजी दोन्ही देश एकमेकांना सुपूर्द करतात. पाकिस्तानच्या परराष्ट्र विभागाने एका निवेदनात म्हटले आहे की, पाकिस्तानने येथील भारतीय अधिकाऱ्यांना आपल्या तुरुंगात बंद असलेल्या 682 भारतीय कैद्यांची यादी दिली आहे. ज्यात 49 नागरिक आणि 633 मच्छिमार आहेत.


भारताने पाकिस्तानला ताब्यात असलेल्या कैद्यांची सुटका करण्यास सांगितले 


भारताने शुक्रवारी पाकिस्तानला त्यांच्या ताब्यात असलेल्या 536 भारतीय मच्छिमार आणि इतर कैद्यांची सुटका करण्यास सांगितले. ज्यांनी त्यांची शिक्षा पूर्ण केली आहे आणि त्यांचे नागरिकत्व निश्चित केले आहे. परराष्ट्र मंत्रालयाच्या निवेदनानुसार, पाकिस्तानला त्यांच्या 105 मच्छिमार आणि 20 इतर कैद्यांना तात्काळ कॉन्सुलर प्रवेश प्रदान करण्यास सांगितले आहे. जे पाकिस्तानच्या ताब्यात आहेत आणि ते भारतीय असल्याचे मानले जात आहे.


परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, भारताने 309 पाकिस्तानी नागरिक आणि 95 मच्छिमारांची यादी सुपूर्द केली. जे भारताच्या ताब्यात आहे. त्याचप्रमाणे पाकिस्तानने 49 नागरिक आणि 633 मच्छिमारांची यादी सुपूर्द केली. जे त्यांच्या ताब्यात आहेत. परराष्ट्र मंत्रालयाने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, सरकारने पाकिस्तानला भारतीय संरक्षण कर्मचारी, मच्छिमार, त्यांच्या नागरिकांसह, जे त्यांच्या ताब्यात आहेत, त्यांना लवकरात लवकर सोडण्यास आणि परत पाठवण्यास सांगितले आहे. याशिवाय बोटीही परत करण्यास सांगण्यात आले आहे.


परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की, भारत दोन्ही देशांतील कैदी आणि मच्छिमारांच्या समस्यांसह सर्व मानवतावादी समस्यांचे प्राधान्याने निराकरण करण्यासाठी वचनबद्ध आहे. भारताने पाकिस्तानला 57 पाकिस्तानी कैद्यांच्या नागरिकत्वाच्या स्थितीची पडताळणी करण्यासाठी आवश्यक पावले उचलण्यास सांगितले आहे. ज्यात मच्छिमारांचा समावेश आहे.