CBSE Class 10th, 12th results : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचा (CBSE) दहावी आणि बारावी बोर्डाचा टर्म 2 परिक्षेचा निकाल कधी जाहीर होणार? याकडे विद्यार्थी आणि पालकांचं लक्ष लागलं आहे. इंडियन एक्स्प्रेसने बोर्डातील अधिकाऱ्याच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, दहावी आणि बारावीच्या टर्म 2 परिक्षेचा निकाल जलै अखेरीस जाहीर होणार आहे. cbse.gov.in आणि cbseresults.nic.in. या संकेतस्थळावर निकाल पाहू शकतात. दहावी आणि बारावीच्या टर्म 2 परिक्षा निकालाबाबात लवकरच घोषणा होईल, असेही सांगण्यात आलेय. दहावी आणि बारावीच्या टर्म-2 चा निकाल वेळेवर जाहीर करण्याची तयारी सुरू आहे. मूल्यांकनाचे काम अंतिम टप्प्यात असून आठवडाभरात काम पूर्ण होईल. सीबीएसईकडून टर्म 2 परिक्षेच्या निकालाची अधिकृत तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. लवकरच याबाबत घोषणा होऊ शकते.  


किती विद्यार्थ्यांनी दिलेली परीक्षा? 
यावर्षी 35 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी CBSE दहावी आणि बारावीची परीक्षा दिली. परीक्षेच्या निकालाची विद्यार्थी आतुरतेनं वाट पाहत आहेत. यावर्षी सीबीएसईनं 26 एप्रिल ते 24 मे दरम्यान दहावीची परीक्षा घेतली होती. त्याचवेळी बोर्डातर्फे 26 एप्रिल ते 15 जून या कालावधीत बारावी वर्गाची परीक्षा घेण्यात आली होती. यावर्षी 35 लाखांहून अधिक विद्यार्थी बोर्डाच्या परीक्षेला बसले होते. त्यापैकी 21 लाख विद्यार्थ्यांनी दहावी आणि 14 लाख विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली. 


कसा पाहाल निकाल? 
सर्वात आधी विद्यार्थ्यांनी सीबीएसईची अधिकृत वेबसाईट cbse.gov.in, cbresults.nic.in भेट द्यावी
त्यानंतर इयत्ता दहावी, बारावी निकालाच्या लिंकवर क्लिक करा. 
आता विद्यार्थ्यांनी आपला रजिस्ट्रेशन नंबर/ रोल नंबर टाकावा. 
त्यानंतर विद्यार्थ्यांना दहावी आणि बारावीचा निकाल स्क्रिनवर दिसेल. 
खाली दिलेल्या डाऊनलोड पर्यायावर क्लिक करुन विद्यार्थी त्यांची गुणपत्रिका डाऊनलोक करु शकतात. 
निकालाची प्रिंटआउट काढा. 


आणखी वाचा :



Education Loan Information:

Calculate Education Loan EMI