नागपूरः जिल्ह्यातील ग्रामीण भागातील नागरिकांच्या आरोग्यासाठी दोन नवीन प्राथमिक आरोग्य केंद्र व पाच उपकेंद्रांना जिल्हा परिषदेच्या आरोग्य समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. हिंगणा तालुक्यातील निलडोह व वडधामना येथे नवीन प्राथमिक आरोग्य केंद्र उभारण्यात येणार आहे. याबाबतचा प्रस्ताव तालुका स्तरावरील आरोग्य अधिकाऱ्यांनी आरोग्य उपसंचालकांनी आरोग्य उपसंचालकांकडे मंजुरीकरिता पाठविला जाणार आहे. या प्रस्तावाला आरोग्य समितीने मंजुरी दिल्याची माहिती आरोग्य सभापतींनी दिली.


नागपूर जिल्ह्यातील लोकसंख्या विचारात प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रांची संख्या कमी आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात सध्या 53 प्राथमिक आरोग्य केंद्र, 316 उपकेंद्र, 58 अॅलोपॅथी व आयुर्वेदिक रुग्णालये आहेत. नागपूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील लोकसंख्या 30 लाख आहे. याचा विचार करता प्राथमिक आरोग्य केंद्रांची संख्या कमी आहे.


आरोग्य सेवांना प्राथमिकता


* जिल्ह्यातील नागरिकांना चांगल्या दर्जाची आरोग्य सेवा उपलब्ध व्हावी. यासाठी सुविधा उपलब्ध केल्या जात आहेत.
* वडधामना व निलडोह प्राथमिक आरोग्य केंद्रासोबतच रामटेक तालुक्यातील करवाही सिदेवाही, हिवरा बाजार पवनी, मनसर, शितलावाडी व परसोडा आदी ठिकाणी उपकेंद्र उभारण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली.
* स्थायी समिती व सर्वसाधारण सभेच्या मंजुरीनंतर हा प्रस्ताव नियोजन समितीकडे अंतिम मंजुरीसाठी पाठविला जाणार आहे.


जिल्ह्याची स्थिती


* जिल्ह्यात पूर्वी 49 प्राथमिक आरोग्य केंद्र होते. कोरोना काळात चार नवीन केंद्र सुरु करण्यात आले. तसेच चार केंद्राच्या इमारतींचे बांधकाम सुरू आहे.
*ते लवकरच पूर्ण होणार असल्याची माहिती आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी दिली.
* याशिवाय हिंगणा तालुक्यातील दोन नवीन प्राथमिक आरोग्य केंद्रांना मंजुरी देण्यात आली.
* यामुळे काही महिन्यात जिल्ह्यातील आरोग्य केंद्रांची संख्या 57 पर्यंत जाणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.


इतर महत्वाच्या बातम्या


Nagpur : व्यापक जनजागृती नाही, तरीही आजपासून प्रतिबंधित प्लास्टिक संदर्भात धडक कारवाई


Nagpur Crime : तीन दिवसानंतर उघडकीस आली गोळीबारची घटना; आरोपी यश शर्मा तुरुंगात, आनंद ठाकूरवरही गुन्हा दाखल